"दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी!"
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
In reply to धाडसी प्रतिसाद by आळश्यांचा राजा
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
In reply to जनलोकपाल विधेयक दु:खांचा अंत आणि सुखांची बरसात नाही हे खरे! by सुधीर काळे
आपण दिलेल्या यादीतील प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट, एव्हिडन्स अॅक्ट, आयपीसी, सीआरपीसी हे सारे करायला हवेच. हे जर सरकारने केले तर अण्णांच्या आंदोलनाची गरजच उरणार नाहीं. पण जर लोकपाल विधेयकाचे घोंगडेच ४०+ वर्षे भिजत पडले असेल तर या सर्व अॅक्ट्स करायला किती पिढ्या लागतील? आणि ते करण्यात स्वतःच भ्रष्ट असलेल्या सांसदांना काय आणि कशासाठी interest असेल? त्यांना 'जैसे थे' परिस्थितीच नाहीं का आवडणार? हे सर्व अॅक्ट्स इतक्या वर्षात झाले नाहींत तर त्यात दोष कुणाचा? आणि ते झाले नाहींत म्हणून जनलोकपाल विधेयकही होऊ नये हे कांहीं पटण्यासारखे नाहीं.हे वाचून असे वाटले की आपल्याला असे वाटते, की विधेयके "यायची" आहेत. असे वाटत असेल, तर तसे नाही. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्ट, एव्हिडन्स अॅक्ट, आयपीसी, सीआरपीसी हे सारे ऑलरेडी अस्तित्वात आहेत. (त्यामुळे, आपणच म्हणता तसे "अण्णांच्या आंदोलनाची गरजच उरणार नाहीं". असो.) बाकी केजरीवाल, अण्णा हजारे यांच्यासोबत इतर अनेक इच्छुक आरटीआय चे श्रेय घेण्याच्या लायनीत उभे आहेत असे ऐकून आहे.
In reply to काळे साहेब by आळश्यांचा राजा
In reply to जनलोकपाल विधेयक दु:खांचा अंत आणि सुखांची बरसात नाही हे खरे! by सुधीर काळे
सध्या भ्रष्टाचार ज्या पातळीवर पोचला आहे तिकडे पहाता असा कायदा झाला नाहीं तर इथेही चोरांचे/गुंडांचे राज्य व्हायला वेळ लागणार नाहीं (खरं तर आता ते कांहींसे झालेही आहे).कुणी सांगितलं हे तुम्हाला? हे असं काही नाहीये. भ्रष्टाचार आहे, तो पूर्वीही होता. त्यावर मात करण्याची बोलबच्चनगिरी सारेच करत असतात हे बहुसंख्यांना माहिती आहे. त्यावर इथला मतदार वेळोवेळी मते देत आलेला आहे. त्यानं सरकारं बदलली आहेत, भल्याभल्यांना आस्मान दाखवलं आहे. त्याच्या हाती त्यापेक्षा अधिक अधिकार यावेत, असं तुम्ही म्हणत असाल तर ते मान्य आहे. ते त्यालाही कळतं. तो त्याला पाठिंबा देईलही. तो हे असं करत असूनही भ्रष्टाचार थांबलेला नाही. तो असा-तसा थांबणार नाही. तो थांबणं हे एका कायद्याचं काम नाही. तो माणसाच्या 'नियत'चा मामला आहे. त्याला याचं भान नाही असं नाही. अण्णांच्या आंदोलनात काही कचकडे उभे राहिले, त्यांचा उल्लेख तुम्ही कुठं तरी केला आहे. आमीर खान वगैरे. मराठी नटमंडळींनी भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली वगैरे वावदूक गोष्टीही झाल्या. यांच्यापैकी एकानंही मी यापुढं सारं काही मानधन चेकनंच घेईन, असं म्हटल्याचं दिसलेलं नाही. पहायचं आहे, तिथंपर्यंत हा मुद्दा जातो का ते... चेकनं वकीलफी घ्यायचा कायदा महाराष्ट्रात येऊ पाहतो तेव्हा त्याला विरोध करणारे वकील अण्णांच्या आंदोलनात उतरले तर भ्रष्टाचारमुक्त असतात का? वकिलांच्या विरोधाची वेगळी कारणमीमांसा आहे, आणि तिच्यावरचे उत्तरही आहे. तो स्वतंत्र विषय आहे. हे सारं जेव्हा सामान्य माणूस पाहतो ना, तेव्हा त्याला कळतंच सगळं. म्हणूनच या आंदोलनात एक कोटी लोक उतरले असतील, बाकी शंभर कोटी होतेच. त्यांचा रोजचा व्यवहार आंदोलनाशिवाय सुरू होता. इतका की, पुणे जिल्ह्यात तलाठ्याने लाचेच्या घेतलेल्या नोटा गिळल्यादेखील याच काळात. तेव्हा, ती भीती मनातून काढून टाका. किमान तिचा अशा सार्वजनिक संस्थळांवरचा उच्चार थोडा अधिक संयमानं होऊ द्या. तुमच्या प्रतिमेत तो बसत नाही.
त्यामुळे अण्णांचे आंदोलन आणि हे विधेयक पास होणे ही काळाची गरज आहे असे मला तरी वाटतेहे तुमचे मत आहे, त्याचा आदर आहे.
आदर्श परिस्थिती एका हप्त्यात (instalment) आणता आल्यास सर्वात उत्तम पण कदाचित् लोकशाहीत ते अशक्य आहे. म्हणून पावला-पावलाने आणणे जरूर असेल तर तसेच आणायला हवे.ही पावले घटनेने आखून दिली आहेत. त्यांना फाट्यावर मारायला कोण निघालं होतं? मी आणि माझेच विधेयक, आज-आत्ता-ताबडतोब धर्तीच्या मागण्या आणि म्हणून उपोषण, हे 'टीम अण्णा'नं केलं.
बिगर काँग्रेसी सरकारांना या विधेयकाबाबत आस्था होती पण काँग्रेसी सरकारांना नव्हती असे दिसते.भ्रष्टाचारासंदर्भातील निखळ घटनेच्या चौकटीतील कायद्याविषयी पक्षीय चर्चा आणणे हेच मूर्खपणाचे आहे. या शब्दाबद्दल माफ करा. पण हे स्पष्ट बोलणं भाग आहे. हा शब्द वृत्तीला उद्देशून आहे. हा मूर्खपणा अशासाठी आहे की, 'ज्यांना असे विधेयक करण्यात रस नव्हता त्या पक्षाची सरकारे आली याचा अर्थ मतदारांना ते मान्य आहे. ज्यांना करावयाचे होते, ते निवडणुका हरत गेले याचा अर्थ मतदारांचा त्या विधेयकाला विरोध आहे,' असा याचा अर्थ काढता येतो. आपण काय बोलतोय याचं भानही या बोलक्या बाहुल्यांना राहिलेलं नाही. भारतीय संसदेविषयी असाच एक एसएमएस किंवा मेल फिरतो. अमूक खासदार अमूक प्रकारचे आरोप वगैरे. संसदेचं वर्णन कंपनी असं केलं गेलं आहे त्यात. हेही भान नाही की ही आपली संसद आहे. हे कोण करतंय? हा उर्मटपणा आहे, या काही गोष्टी हाती असलेल्या बोलक्या लोकांचा. काही मूर्ख माध्यमं, काही नवी दुधारी आयुधं, आणि बराचसा तमाशा (खरं तर तमाशाचा तरी का अवमान करावा?) करण्याची तयारी ठेवली, त्याला राष्ट्रप्रेम वगैरे डूब दिली की झालं आंदोलन उभं असली भयंकर स्थिती या आंदोलनानं आणून ठेवली. ही जर राज्यव्यवस्थेची जाण असेल तर या वर्गापेक्षा माझ्यासारखे मूळचे अराजकवादी बरे.
either all perfect or nothing ही प्रणाली लोकशाहीत लागू पडत नाहीं.हे आणि हेच सांगायचे आहे समग्र अण्णाविरोधकांना. पण ते केलं, की ऐदर यू आर विथ अस ऑर अगेन्स्ट अस, पद्धतीचे वर्तन टीम अण्णाने केले आहे.
In reply to धन्यवाद by श्रावण मोडक
In reply to अशी परिस्थिती आहे काय? by सुधीर काळे
तिसरा विकल्प सुचविल्यासया तीन शब्दांतून अपुरेपणाच दिसतो आहे. हे विकल्प होते, आहेत. संसदीय स्थायी समितीसमोर सरकारी विधेयक होते... अरूणा रॉय यांचे आले. जयप्रकाश नारायण यांचे आले. इतरही काही मसुदे पुढे गेले. तसाच जनलोकपालाचाही नेता आला असता. पण... असो. तिसरा विकल्प नसेल तर 'अगेन्स्ट अस', या पद्धतीचा विचार हा अपुरेपणाचा परिणाम असेल. तसे असेल तर अधिक माहिती घ्या. एरवी हा झापडबंद विचार आहे.
In reply to जनलोकपाल विधेयक दु:खांचा अंत आणि सुखांची बरसात नाही हे खरे! by सुधीर काळे
In reply to जातीभेद, वर्णभेद, वगैरे by रामदास
In reply to जातीभेद, वर्णभेद, वगैरे by रामदास
In reply to शरद पवारांच्या पेक्षा देशमुख जरा जास्त स्वच्छ? by सुधीर काळे
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
In reply to श्रामो, आरा, परा by चिंतामणी
मी अण्णांचा आंधळा भक्त नाही की विरोधक नाही. या विधेयकामुळे सर्व भ्रष्टाचार चुटकीसारखा संपेल असे मानणारा नाही. परन्तु या निमीत्ताने देशातील सामान्य माणूस आंदोलनाला पाठींबा दाखवायाच्या निमीत्ताने कोशातुन बाहेर पडला हे महत्वाचे.जो बाहेर पडला तो नक्की सामान्य माणूसच होता ? मूळात हे आंदोलन भ्रष्टाचारा विरुद्ध आहे, ह्याशिवाय किती लोकांन आणि काय माहिती होती ? आणि एक जुने पण छान वाक्य आहे, 'गर्दीचे रुपांतर मतदानात होते का?' त्या धर्तीवर असे विचारावेसे वाटते की 'ह्या गर्दीचे रुपांतर ह्या गर्दीतल्याच ५०% लोकांकडून तरी सरळ मार्गाने जाण्यात होईल काय ? ह्या गर्दीतले किती लोक उद्या रेशनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स साठी लाच देणार नाहीत ? ह्यातले कीती लोक उद्यापासून काळ्या बाजारातून सिलेंडर आणणार नाहीत ? मनमोहन सिंगाकडे जादूची छडी नाही पण मग अण्णांकडे तरी आहे का ?
स्वातंत्र्याचे आंदोलन आणि आणिबाणी विरोधी आंदोलनानंतर प्रथमच एव्हढा समाज एखाद्या आंदोलान उतरला. आपण काहिही केले तरी चालेल असा उद्दामपणा बाळगणा-या सत्ताधा-यानी यातुन थोडासा धडा जर शिकले असतील निदान काही प्रमाणात तरी व्यवस्थेत बदल होइल अशी आशा बाळगता येइल. नाहीतर आत्ता शांततेत झालेले आंदोलन कदाचीत उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उतरला का उतरवला ? रोज सकाळ संध्याका़ळ गर्दी जमवून रस्ते बंद पाडायचे, गाड्यांवरुन ट्रिपल सिट कर्कश्श आवाजात टोप्या घालून हिंडायचे ह्याला आंदोलन अथवा आंदोलनाला पाठिंबा म्हणतात ? नो सर ! २/४ वर्षाच्या चिमुरड्यांचे फोटो पहिल्या पानावर झळकतात, त्याला आंदोलन म्हणतात ? सॉरी आम्ही ह्याला बालमजुरी म्हणतो. फेसबुक वर दोन कॉज जॉइन केले, ४ पोस्ट लाईक केल्या आणि अण्णांचा फोटो लावला की आपण क्रांती केल्याचा आव आणायचा ह्याला आंदोलन म्हणतात ? आणि उग्र आंदोलन म्हणजे ? लिबिया सारखे ? नक्की लोकांकडून अपेक्षा काय आहेत ? आज अण्णांच्या नावानी मोर्चे काढा आणि नाहीच जमले तर मग 'जय भवानी जय शिवाजी ' आणि उचला दगड?? असो... लिहायला खूप आहे, पण संध्याकाळची घंटा वाजलेली आहे ;)
In reply to मी अण्णांचा आंधळा भक्त नाही by परिकथेतील राजकुमार
In reply to मी इथे अल्पमतात आहे असे दिसते by सुधीर काळे
In reply to >>>> मी इथे अल्पमतात आहे असे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे आकडे खरे आहेत काय by रामदास
तूर्तास तरी विजय मिडीयाचा झाला आहे.अगदी. आणि इथे हा विषय संपतो.
In reply to सारांश by श्रावण मोडक
In reply to हे आकडे खरे आहेत काय by रामदास
In reply to असहमत ईथे कुठलं वाक्य बरोबर by चेतन
एकीकडे अण्णा आणि टिमला उर्मट म्हणायचं आणि मिडियाचा विजय म्हणायचा हे दुट्ट्प्पी वाटतंकसं काय, हे जाणून घेऊ इच्छितो. कारण, दोन्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. :)
तुम्ही टि आर् पी साठी म्हणत असाल तर मिडियाकडे असे बरेच विषय असतात.अच्छा? हे विषय कोणते ते जाणून घ्यायला आवडेल. माझा त्यातला अभ्यास कमी आहे, हे स्पष्ट आहे. :)
In reply to अच्छा by श्रावण मोडक
अच्छा? हे विषय कोणते ते जाणून घ्यायला आवडेल. माझा त्यातला अभ्यास कमी आहे, हे स्पष्ट आहे.विषय :- १) अपने बेटे के शादी मे नही जायेंगे दाउद इब्राहीम. २) नागलोक में जाने का गुप्तद्वार. ३) मौत के बाद का जिवन... आज शाम फलाना फलाना बजे. ४) बंदरोने हायवे पे मचाई उधम. क्या रिश्ता है बंदरोका इस पुराने हायवे से. ५) पाकिस्तान के अण्वस्त्र कितने सुरक्षित ? क्या पोहोच गये है वो ओसामा के पास? ६) ओसामा मरा नही. राज खुलेगा आज शाम सात बजे. ७) मंबई पुन्हा एकदा दहशतवादाच्या विळख्यात शिरते आहे का ? ८) रेव्ह पार्टी आणि पुण्यातली तरुणाई ? ९) 'एस्कॉर्ट' के धंदे मे अब बॉलिवूड की मशहूर अदाकारे शामिल. १०) रेल्वे घसरली.. घातपाताची शक्यता. ११) १२ दिनोंमे पॄथ्वी टकरायेगी एक अंतरिक्ष के खतरेसे ? क्या विनाश नजदीक आ गया है ? बात किजिये एलियन्ससे. इत्यादी इत्यादी... ह्यात राजकारणाच्या, खूनाच्या, चोरीच्या बातम्या टाळल्या आहेत. (उदा :- लोकसभेतली मारामारी, जात-पात-पुतळा, तरुणीचा खून आणि मग तिच्या भावापासून घराखालच्या किराणा मालाच्या दूकानदारापर्यंतचे इंटरव्यू, ती ज्या कालेजात जायची त्याच्या परिसराचे चित्रण आणि ती ज्यावर बसायची तो वर्गातला बाक इ..)
In reply to धाडसाबद्दल धन्यवाद. by राही
In reply to अण्णा.. अण्णा रिलोडेड !! by अर्धवटराव
कालच्या पेक्षा आज बरा आहे हा अनुभव असावा आणि आजच्या पेक्षा उद्या बरा असेल अशी आशा असावी .+1 नुसतेच 'काहीही होणार नाही' म्हणत हातवर हात धरुन बसण्यापेक्षा काहीतरी कृती आवाश्यक आहे आणि ती अण्णांनी केली. त्याला जमेल तसा लोकांनी पाठिंबा दिला. त्यामागची भावना हीच असावी, निदान माझीतरी अशीच होती. संसदेच्या अस्मीतेचा मुद्दा: ज्यांनी संसदेवर 'हिंसक' हल्ला केला त्यांचे काय झाले? त्यांना तर आता माफीही मिळु शकेल. कुठे गेली अस्मिता (संसदेची) ? घटनेच्या सर्वोच्चतेचा मुद्दा: अगणित वेळा घटना पायदळी तुडवली गेली - जात आहे, वाकवली गेली - जात आहे तेव्हा घटना सर्वोच्च नव्हती ? - (आशावादी) सोकाजी
In reply to एक मुद्दा राहिलाच !! by अर्धवटराव
In reply to मी मिपावर जरी अल्पमतात असलो तरी जनतेचे मत बरेचसे माझ्या बाजूने? by सुधीर काळे
In reply to मी मिपावर जरी अल्पमतात असलो तरी जनतेचे मत बरेचसे माझ्या बाजूने? by सुधीर काळे
In reply to काही निरीक्षणे by सुनील
In reply to मी मिपावर जरी अल्पमतात असलो तरी जनतेचे मत बरेचसे माझ्या बाजूने? by सुधीर काळे
अण्णा-राहुल निवडणूक झाली तर राहुलला फक्त १७ टक्के तर अण्णांना ७८ टक्के मते मिळतील असे नीलसेनचे भाकित आहे (मतदारसंघाचे नांव त्यात नाहीं.)याविषयीचे अण्णांचे मत काय आहे हे कुठं आलंय का?
In reply to फजिती by नितिन थत्ते
In reply to एक प्रश्न... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांनी कोणत्याच प्रश्नावर संघटीत होऊन कोणत्याच विषयावर व्यवस्थेविरुद्ध आंदोलने करु नयेत असे आपल्याला म्हणायचं आहे काय ?माझ्यापुरते स्पष्टीकरण: असा काही अर्थ निघत असेल तर हा माझ्या लेखनाचा दोष. मला असे काहीही म्हणावयाचे नाही. माझी मते अशी आहेत - अण्णांनी केलेल्या उपोषणाचे ध्येयच मुळी अव्यवहारी होते. साध्य तर जवळपास काहीही झालेले नाही. अशा स्थितीत जे दिसले त्याला आंदोलन मानण्यास मी तयार नाही, किंवा तो साऱ्या भारतदेशाचा उद्गार होता, असेही नाही. तो भारताचा उद्गार नाही, असे मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा संबंध केवळ वर्गीय संदर्भात नाही. हा वर्गही उठलाच पाहिजे. पण त्याचा आत्ता झालेला उठाव आशयाविनाच होता. कारण, जो आशय दाखवला जात होता तो फसवा आहे. तो एक भ्रम आहे. जनलोकपाल म्हणजे जणू भ्रष्टाचाराचे निर्मूलन असे काहीसे वातावरण तयार केले गेले. या भ्रमाचा भोपळा फुटल्यावर काय? त्याचा विचार अण्णांनी, प्रामुख्याने त्यांच्या भोवतीच्या कोटरीने (टीम अण्णा कसली, ती तर काही कोटरीच होती) केला आहे? नाही. या बोलक्या समुदायानेही तो केलेला दिसत नाही. तेव्हा उठाव जरूर करावाच. पण, तपशिलात जावे लागेल. वर अर्धवटराव म्हणतात, "... (त्यांच्यालेखी पर्यायहीन स्थितीत) आंदोलनाचा वैचारीक पातळीवर पूर्ण आढावा वगैरे घेण्या आगोदर आमचे पाय आपोआप तिकडे वळतीलच ना..." हे बोलके आहे. बुडबुडा असे मी का म्हणतोय त्याचे कारण हे. यापलीकडे जनलोकपाल, त्याची उभारणी, ती करण्याची पद्धत, संसदेची सर्वोपरिता, न्यायपालिकेचा समावेश, पंतप्रधानांचा समावेश, जनलोकपाल यशस्वी होण्यासाठी आवश्यक इतर कायद्यांची स्थिती वगैरे मतभेदांचे मुद्दे अलाहिदा. या उपोषणाच्या आधीची स्थिती आणि आज, आत्ताची स्थिती यातील फरक काय आहे? संसदेचा अभिप्रायात्मक ठराव, जो बंधनकारक नसतो. अधिक काही असेल तर जरूर दाखवा. मला वाटतं यातील बहुतांशी मतांशी नितिन थत्ते, सुनील सहमत होतील. स्वतंत्र मुद्दा: भारतातील भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि त्यासाठी कायदा किंवा तत्सम व्यवस्था असावी, असे एखादा अट्टल दोषी भ्रष्टाचारी म्हणत असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. कारण त्याचा मूळ मुद्दा बरोबर आहे. चर्चा म्हणून स्वतंत्रपणे मात्र मी त्याच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला (ज्याचा त्याच्या मूळ मागणीशी संबंध नसेल) तर ते वावगे? अरविंद केजरीवाल यांच्या संस्थेविषयी असे आक्षेप घेतले गेले की तेथे पारदर्शकतेचा अभाव आहे. त्याची उत्तरे स्वतंत्रपणे त्यांनी दिली पाहिजेतच. पण ते ती देत नाहीत म्हणून त्यांची भ्रष्टाचार निर्मूलनाची मागणी अपात्र ठरत नसते. याच संदर्भात मी वर वकील वर्ग, आमीरखान यांचा उल्लेख केला. आंदोलन प्रक्रियेतील आशय हा असतो, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. इथं दिसतो तो आशय काय आहे? याच दृष्टीने केजरीवाल यांच्यावर आत्ता होत असलेल्या कारवाईचाही विचार केला पाहिजे. त्या कारवाईचा सामना त्यांनी त्यातील तथ्यात्मक मुद्यांच्या आधारेच करावा. आपण केलेल्या आंदोलनामुळे ही कारवाई होते आहे, असे म्हणू नये. कारण तो कांगावा ठरतो.
In reply to दोष by श्रावण मोडक
In reply to >>याच दृष्टीने केजरीवाल by अन्या दातार
सरकारला आत्ताच कशी काय जाग आली बुवा?स्वतंत्र मुद्दा आहे. सरकारला जागे केल्याचे श्रेयही केजरीवाल घेऊ शकतात. माझी हरकत नाही.
इतके वर्ष जी संस्था/संघटना चालतेय, त्यावर आधीही कारवाई करता आली असती; स्पष्टीकरण मागता आले असते.इथे संस्थेचा/संघटनेचा काहीही संबंध नाही. तशी कोणतीही कारवाई सुरू झाल्याचे माझ्या प्रतिसादात मी लिहिलेले नाही. तुम्हाला दिसले असेल तर तो वैयक्तीक प्रश्न आहे तुमचा.
सरकारच्या विरोधात गेल्यानंतरच सरकारला जाग येत असेल तर "आपण केलेल्या आंदोलनामुळे ही कारवाई होते आहे" हा कांगावा कसा ठरतो बरे? शंकेला जागा ठेवताच कामा नये ना. इतक्या सार्या यंत्रणा आधीच का नाही राबल्या?कारवाईच्या मुद्यांवर भर असावा, इतकेच माझे म्हणणे आहे. त्याविषयी केजरीवाल यांनी काही स्पष्टीकरणे केली, ज्याविषयीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते नेमके प्रश्नच त्यांनी हाताळावेत. बाकी मुद्दे स्वतंत्रपणे लढण्याचे आहेत. कारवाई रोखण्यासाठी तसे मुद्दे काढणे याला कांगावाच म्हणतात. कांगाव्याची तुमची व्याख्या वेगळी असेल तर भाग अलाहिदा. :) असो. तुमचे मुद्दे इतर संदर्भात रास्त असले तरी, इथे कामाचे नाहीत. सबब, एवढ्यापुरता हा अंतिम प्रतिसाद.
In reply to अंतिम by श्रावण मोडक
In reply to प्रतिसाद वाचत असताना by मराठी_माणूस
In reply to दोष by श्रावण मोडक
In reply to फजिती by नितिन थत्ते
In reply to राहुलने म्हणे समोसे वाटले निदर्शकांना.....! by सुधीर काळे
In reply to पाठिंब्याचे प्रमाण by नितिन थत्ते
In reply to विचार by नितिन थत्ते
In reply to स्वातंत्र्य पुर्व काळात ज्या by मराठी_माणूस
In reply to >>स्वातंत्र्य पुर्व काळात by नितिन थत्ते
In reply to खरंच मिपावर येवढी धोरणी आणि by परिकथेतील राजकुमार
खरंच मिपावर येवढी धोरणी आणि दिग्गज मंडळी असताना सरकारने त्या विलासरावांना कशाला पाठवले असावे मध्यस्थीला.:-) संकेतस्थळांवर दोन प्रकारचे लोक आढळतात - मुरलेले पोरकट आणि उरलेले हलकट. ;)
In reply to लेखा ऐवजी चर्चा आवडली !! by अजातशत्रु
In reply to +१ by स्मिता.
In reply to +१ टु अजातशत्रु, नक्की मॅच by ५० फक्त
In reply to इतिहासाच्या अभ्यासकांना विनंती by सुधीर काळे
In reply to आमच्या गावाकडे by Nile
In reply to प्रतिसाद मला कळला नाहीं by सुधीर काळे
श्री. सुधीर काळे,