Skip to main content

छायाचित्रण

सुरंगी

लेखक जागु यांनी सोमवार, 21/03/2011 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका ओळखिच्या व्यक्तिकडून सुरंगिच्या झाडाचा पत्ता लागला. आणि त्याच व्यक्तीची ओळख काढून होळीच्या सकाळीच सुरंगीचे झाड पहाण्याचा मुहुर्त ठरविला. सकाळी ७ वाजताच या नाहीतर सगळ्या कळ्या काढून नेतील ही सुचना मिळाल्याने सुट्टीच्या दिवशीही सकाळी उठुन व नवरोबांची सकाळ लवकर उजाडून आम्ही सुरंगीचे झाड पाहण्यास गेलो आणि जवळ जवळ १ तास त्या झाडाखाली रमलो. झाडावर कळ्या काढण्या साठी दोन माणसे चढलेलीच होती. मिस्टरांच्या ओळखीची असल्याने त्यांनी आमचे झाडावरुनच स्वागत केले. आणि सुरंगीची त्यांना माहीत माहीती दिली. साधारण चिकु, आंब्या सारखे मोठे असते.

गड्या गाव बरा

लेखक मॅक यांनी गुरुवार, 17/03/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती.... त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो ......... बघा आवडले तर......... १) पेरू २) भुईमुग शेंग

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.

निसर्गवेड्यांसाठी नवी भेट - पुण्याचे पक्षीवैभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 16/03/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

दुनिया फुलांची

लेखक Manish Mohile यांनी सोमवार, 07/03/2011 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
फुलांची छायाचित्रे - काही ओळखीची तर काही अनोळखी. जास्वंद : - जास्वंद परागतंतू : - सदाफुली : - निळी गोकर्ण : -

जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 06/03/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात मारलेला एक फेरफटका. जे काहि उरले सुरले प्राणी/पक्षी आहेत ते आत्ताच पाहुन घेणे योग्य नंतर कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील.