Skip to main content

छायाचित्रण

विरंगुळा - ऑनलाईन चित्रपट

लेखक सहज यांनी शनिवार, 19/02/2011 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ - इतिहास, संस्थळचर्चा इ इ एक चित्रपट अधुन मधुन वेगवेगळ्या चॅनेल्सवर लागतो आजकाल. म्हणले तर जुना म्हणले तर नवा आहे. नाव बहुतेक 'अभी तक पचपन्न' का कायसेसे आहे. त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. चित्रपट व कथा काल्पनिक आहे संबध लावायला गेलात तर चक्रवाल! एन्जॉय करा. सिनेमाची सुरवात दाखवली आहे साल १९४७. मुद्दाम ब्लॅक एन्ड व्हाईट दृश्य आहे. सेठ मोहनदासजी एक मोठ्या बिझनेस सामाज्याचे मालक आहेत. पण त्यांनी आता धंद्यात लक्ष कमी केले आहे.

"सिंगिंग इन द रेन"

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/02/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच बातमी ऐकली की उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि मला एका पाऊस-गाण्याची आठवण झाली. गाण्याबरोबर आठवला ते गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट आणि त्याचे अप्रतिम, देखणं सादरीकरण. या माझ्या एका आवडत्या हॉलिवूडपटाची - म्युझिकलची मिपाकरांना ओळख करुन द्यायचा छोटासा प्रयत्न! १९५२ साली एका हॉलीवूड चित्रपटाचा मूकपट ते बोलपट प्रवास गमतीशीर पद्धतीने सांगणारा हा एक चित्रपट निघाला होता.

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 11/02/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण. कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, - हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे. दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५. जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे अगदी मोबाईल नंबर सहित.

भटकंती

लेखक फास्टरफेणे यांनी रविवार, 06/02/2011 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
२४ जानेवारीला बायको माहेरी गेली आणि गेलं १ वर्ष झोपी गेलेला माझ्यातला भटक्या जागा झाला. २६ जानेवारीची सुट्टी कुठे सत्कारणी लावावी हा प्रश्न नव्हताच, उत्तर तयार होतं - वीर धरण. मागच्या वर्षी सकाळमधे "बार हेडेड गूज"ची बातमी वाचून एकदा वीर धरणाची वारी झाली होती. पण तेव्हा फक्त पाच-सहाच बदकं दिसली होती. तेव्हाच ठरवलं होतं, परत यायचं... पहाटे ५ ला निघायचं ठरवून ८ वाजता निघालो. एकटाच. पाठीला सॅक, सॅकमधे पाण्याची बाटली आणि कॅमेरा (कॅनन SX 110). हडपसर ते सासवड अंतर जेमतेम ३०-४० मिनीटांत कापलं. वाटेत बरेच पक्षी दिसत होते.

मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 04/02/2011 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे. मित्रहो, अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.

नेवाळी ?

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/02/2011 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
ही वेल गेली अनेक वर्षे आहे. छाटणीमुळे विस्तार मर्यादीत असला तरी खोड बोटभर जाड झालेल. रोप आणल्यावरच काय जी फुले आली असतील ती. त्या नंतर मात्र जवळपास ५ वर्षांत फुले आली नाहीत; किंबहुना या वेलीली फुले येतात याचा विसर पडला. आणि अचानक गेल्या आठवड्यापासुन वेल बहरली. हा वेल कुंदाचा नक्कीच नाही. बहुधा नेवाळीचा असावा. कुठलाका असेना? त्यावर फुललेल्या फुलांनी खुश करुन टाकले. सकाळी जग आल्यावर प्रथम त्या फुलांवरच नजर जाते आणि मग दिवस सुरू होतो. आपल्याला आनंद देणार्‍या या छोट्या गोष्टी. बहर संपायच्या आत फुले चित्रबद्ध केली.