Skip to main content

छायाचित्रण

ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 01/03/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची. भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.) या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.

तेजोनिधि लोहगोल - छायाचित्रे

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 28/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज हे दिनमणि व्योमराज कोटि कोटि किरण तु़झे अनलशरा उजळिती अम्रुतकण परि सेवुनि अणु रेणु उधळिती तेचातच जनन मरण तेजातच नविन ध्यास ज्योर्तिमय मुर्ती तुझी नभमंड्ल दिव्यसभा दाहक परि संजिवक तरुणारुण किरणप्रभा होव जिवन विकास वसुधेची राख लाज हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज. हे गाणं दररोज सकाळी ऐकुन माझ्या दिवसाची सुरुवात करतो, काही फार जास्त महत्वाचं काम असेल दिवसभरात तर लगेच ' गगन सदन तेजोमय' ऐकुन घेतो, सगळी कामं झटपट होतात माझी. मागच्या आठवड्यात एका डोंगरावर गेलो होतो, म्हणजे हापिसातर्फे ट्रेनिंग होतं, त्या अंतर्गत डोंगरावर चढवलं होतं, अगदि सकाळि सकाळी.

गीर - सिंहांच्या देशात

लेखक Manish Mohile यांनी शनिवार, 26/02/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात पर्यटन विभागाची रेडीयो मिर्ची वरील अमिताभ बच्चन च्या धीर गंभीर आवाजातील गीर ची जाहीरात ऐकून माझ्या पुण्याच्या मेव्हण्याने कल्पना पुढे मांडली - गीरला जाण्याची. ताबडतोब फोनाफोनी झाली आणि संक्रांतीला जोडून आलेल्या रविवार आणि सोमवारी जाण्याचे नक्की झाले. नेटवर हॉटेल बुकिंग झालं, लायन सफारी बुकिंग झालं. गीर पासून जवळ ४० कि,मी. वर आहे सोमनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ६० कि. मी वर आहे दीऊ. आम्ही दीऊला आधी जाऊन आलो होतो म्हणून या वेळी फक्त गीरला जायचं ठरलं.

मुंब्रा देवी आणि परिसर

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 26/02/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुंब्रा देवी मंदिर पायर्‍या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला.

रतनगड - एक सुखद अनुभव

लेखक गणेशा यांनी बुधवार, 23/02/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरुन संध्याकाळी ६:३० ला गोदावरी गाडी ने नाशिक रोड ला उतरलो. सिन्नर चा माझा मित्र ह्रषिकेश यमाहा १३५ वर मला न्ह्यायला आलाच होता(मीच बोलावले होते, बिच्चारा मॅच सोडुन आला) .. नाशिक मधील जुने कलीग त्यांच्या फॅमीली बरोबर रात्री "छान" मध्ये जेवुन , जाताना मी चिकन खाल्ले म्हणुन २ शब्द मित्राकडुन उगाच ऐकुन आम्ही सिन्नर ला निघालो... रतनगड ला तसे नाशिक वरुन ही जाता आले असते पण सकाळी डबा घ्यायचा असल्याने नाशिक च्या मित्राला सोडुन आम्ही सिन्नर ला गेलो. रतनगड ला ही बाकीचे कॅन्सल झाल्याने आम्ही दोघेच जाणार होतो.. सकाळी लवकर उठुन .. २ ब्यागा भरण्यात आल्या.. डबा .. कांदे..

सिंहगडवरचा सुर्यास्त

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 23/02/2011 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
शिवजयंतीला सिंहगडावर गेलो होतो . तिथे सुर्यास्ताला घेतलेली काही छायाचित्रे .. गडावर पोहोचेपर्यंत सूर्याने क्षितिजावरून कल्टी मारली होती. सूर्य मावळला होता पण अजून त्याच्याकडून क्षितिजावर विस्कटलेले रंग आवरायचे राहिलेच होते. आम्ही जमेल तेवढे रंग आमच्या कॅमेऱ्यात भरून घेतले.