ह्या वर्षी अल्बनी ट्युलिप फेस्टिवलचे ६३ वे वर्ष होते. गेल्यावर्षी पाऊस पडत असल्याने जाता आले नव्हते. ह्या वर्षी मात्र दोन्ही दिवस जाऊन मनसोक्त ट्युलिप्स पाहून घेतले.
थोडा इतिहास. जुलै १, १९४८ साली तत्कालीन मेयर Erastus Corning दुसरा ह्याने city ordinance द्वारे ट्युलिप हे अल्बनीचे अधिकृत फूल म्हणून घोषित केले. इतकेच नव्हे तर नेदरलँडची तत्कालीन राणी Wilhelmina of the Netherlands हिला विनंती केली की एखाद्या ट्युलिपला अल्बनीचे नाव द्यावे. तिनेही ह्या विनंतीला मान देत "Orange Wonder" ह्या ट्युलिपला अल्बनी ट्युलिप असे नाव दिले. ह्या प्रकारची ट्युलिप १८ इंच उंच वाढतात.