Skip to main content

छायाचित्रण

मर्कट फोटोग्राफीचा एक प्रयत्न

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 27/04/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
शरद व स्पा यांच्या धाग्यामुळे मीहि खूप प्रभावित झालो, आणि नुकतेच माथेरानला काही काढलेले फोटो उकरून बघितले... ;) त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत.. डकवतोय बघा आवड्तायेत का? माथेरानच्या लुईझा कडेटोकावर बसलेले हे मर्कट, उन्हातान्हाचे वैतागलेले, उदास भाव असलेले. हे एक छोटे कुटुंब. दंगा चालला होता यांचा.

पोर्ट्रेट फोटोग्राफिचा एक प्रयत्न.

लेखक येडाखुळा यांनी मंगळवार, 26/04/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री शरद यांचा "मिपावरील छायाचित्रे ... एक निरिक्षण" हा लेख वाचला आणि मला माझ्याकडे असलेली काही पोर्ट्रेट अपलोड करायचा मोह झाला. ही काही फार सुंदर छायाचित्र आहेत असं नाही म्हणता येणार पण त्या क्षणी मला जे कॅमेर्यात पकडावस वाटलं ते इथे मांडतोय. सासवड-जेजुरी च्या परिसरात फिरत असताना हा धनगर दिसला. यांची पागोटे घालण्याची पद्धत खूप मस्त असते.

बहावा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 24/04/2011 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारचे दीड वाजले . उन मी म्हणत होते. ही काय फोटो काढायची वेळ आहे का ? असं मनाशी म्हणत मी गाडीला स्टार्टर मारला. रस्ता वळणा वळणाचा होता. शेवटच्या वळणावर पोहोचल्यावर मात्र सगळे विसरून मी पहातच राहिलो. आकाशातून पडणारा तीव्र प्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडे पर्यंत कोवळा होऊन जात होता.

सुंदर माझा गाव !!!

लेखक परदेश् वासी तरिहि घाटी यांनी गुरुवार, 21/04/2011 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपा कर, मी एक नवीन मिपा कर आहे. सध्या व्हर्जिनिया टेक या अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ वॉशिंगटन डीसी पासून ३०० मैलावर ब्लॅकस्‍बर्ग या छोट्याश्या गावात आहे. विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. नुकतेच मी काही फोटो घेतलेत. ते इथे सादर करत आहे. आशा करतो कि मिपा कर चांगला प्रतिसाद देतील. फोटोंवर प्रतिक्रिया दिल्यास अति उत्तम.

निमंत्रण - इंक्रेडीबल फोर्टस ऑफ इंडिया !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 19/04/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी टिपलेल्या देशभरातील दुर्गांच्या छायाचित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरवात होत आहे. येत्या २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील दुर्गम किल्ल्यांच्या छायाचित्रांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यांतील किल्ल्यांची चारशेहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

पोपटाची सदिच्छाभेट

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 15/04/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या परिसरात पोपट बहरले आहेत. माझ्या आणि रामदासशेठच्या घरादरम्यान असलेल्या वृक्षराजीत सकाळी सकाळी पोपटांचे थवेच्या थवे इकडुन तिकडे उडत असतात. आमच्या इमारतीच्या परिसरातील लाल तुर्‍यांच्या फुलांच्या झाडावर या पोपटांची नजर असते, त्यांना ही फुले खायला विशेष आवडत असावीत. फांदीवर बसुन उलटे लटकत चोचीने फुले खुडणारे पोपट रोज पाहावयास मिळतात.