मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

व्हॅलेंटाईन्स डे....

प्राजु ·
लेखनविषय:
मंडळी, १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो. या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा.. कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का? एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत. ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.

प्रिय प्राजुस....

स्वाती राजेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय प्राजुस, काल पासून तु मिसळपाव वर दिसत नव्हतीस. मला वाटले तुला काही नविन रेडिओ प्रोग्रॅम ची तयारी करावराची असेल पण, आत्ताच तुझी प्रतिक्रिया वाचली. तू मिसळ्पाव वर चारोळ्या लिहिणार नाहीस म्हणून वाईट वाटले. पण असे करू नकोस आम्ही तुझ्या चारोळ्या, गुंफलेल्या विणी खूप खूप ऍन्जोय करतो. कोणा एका विक्रुत माणसापायी आम्ही एका चांगल्या कवियित्रीला मुकणार नाही निदान मिसळ्पाव वर तरी.. तु परत लिहायला चालू कर... आम्ही वाट पाहात आहोत..... तुझ्या प्रेरणेमुळे तर मी मिसळ्पाव वर लिहायला चालू केले आहे.. कित्येक जण कविता करायला लागले... तुझ्यामुळे...

मी शब्द ओठि रोखले...

छत्रपति ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रोखले नयनात आसु, मी शब्द ओठी रोखले... पाहिले नाही तिला मी, नजरेस माझ्या रोखले... सांगुच का संयमाला...., मी असा का सोसला? होती मला जाणीव.... मजला इन्कार नसता सोसला... कविता माझी नहिये... कुठेतरी सापडलिये..... पण आवडलिये........

धागा धागा जोडित्..(धागा-४)

प्राजु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
विनायक आणि ऋषिकेश यांच्या सांगण्यावरून.. हा नवा धागा आपल्याला अर्पण.. - प्राजु

आयुष्य तेच आहे

सनिल पांगे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आयुष्य तेच आहे कळण्यातच सरलं आहे आतास कुठे कळू लागलं पण, शेवटी किती उरलं आहे @सनिल

नवी रेशमी वीण..

प्राजु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मंडळी, मागे ऋषिकेश यांनी चारोळीचा सुंदर गोफ विणला होता. आपण सर्वांनी त्यात खूप मदत केली होती. आता या नव्या वीणीमध्येही मदत कराल अशी आशा आहे. पण ही थोडी वेगळी आहे. यात २ नियम आहेत. १. चारोळी ही चारच ओळींची असावी. पाचोळी नको. २. चारोळी लिहिताना त्यामध्ये आधीच्या चारोळीतील एक शब्द आलेला असावा... कृपया नियम मोडू नका.

काही "दारोळ्या"

छोटा डॉन ·
लेखनप्रकार
मिसळपावच्या वाचकांसाठी काही "दारोळ्या ..............." प्रत्येक तळीराम पिताना सांगतॊ मी दारू सॊडणार आहे दारू म्हणते़ तुझा संकल्प मीच ऊद्या मॊडणार आहे *************************************** दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत *************************************** माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रूसण्यावर जाऊ नका एकदा प्यायला बसलॊ की माझ्या असण्यावर जाऊ नका *************************************** मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा कुणीही पिताना दिसला॰॰॰ की आशेने पहाणारा *************************************** घराभॊवती कु