Skip to main content

चारोळ्या

माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

लेखक फटू यांनी रविवार, 08/06/2008 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे दिसत असलो मी हसत खेळत तरीही माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे
Taxonomy upgrade extras

अंधार

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 05/06/2008 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
यानामधून फिरणा-याला अंधार कधी चुकणार नाही, स्वतःची ओळख विसरला त्याला देव कधी दिसणार नाही.

नाते पावसाचे

लेखक चेतन यांनी गुरुवार, 05/06/2008 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाते पावसाचे पावसाचा शिडकावा अन् मायेचा ओलावा , मातीचा गंध आणि ह्रुदयाचा हा बंध वार्‍याची साद हेलावणारी ती हाक, चमकणारी विजं अन् प्रेमाचे हे बिजं पावसाचे अन् प्रेमाचे नाते तरी काय? सागराचे उधाण अन् कल्पनांचे आसमान चेहर्‍यावर उडणार्‍या तुषारांचे नसते भान हेलकावणार्‍या लाटा अन् भिजलेल्या वाटा, भिरभिरते विचार आणतं असतात मनातं पावसाचे अन् मनाचे नाते तरी काय? पडुन गेल्यावरही पाउस मनाला उफाळतो, वेलींना नटवतो आणि भावनांना ओघळवतो नदितले ते भोवरे भिरभिरतात
Taxonomy upgrade extras

घर.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 05/06/2008 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
घर..... तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठी बारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !" मी म्हणालो, " मी बारा माणसांचं दोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !"

पृथ्वी वरच्या पाककृती

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 03/06/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वी वृत्त -- तंत्र जनास समरा जनास समरा यमाचा ल ग १७ अक्षरे, ८ यती. वृत्त जुळवण्या साठी ह्रस्व दिर्घाला काही ठीकाणी नजरेआड केले आहे, तरी भासासुद्दी वाल्यांनी क्श्मा करावी. पृथ्वी वरील पाककृती श्रीखंड- मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी निथाळुनि जळा.........समग्र गठडी............पुरी दाबुनी पराति शर्करा............चक्का मिसळुनी.......अहा फेटले इलायचि.................सुगंध घालुनि..........श्रिखंड हे वाटले भजी पिठात चिरले......
Taxonomy upgrade extras

"जीवन-मरण"

लेखक शा॑तेच कारट यांनी रविवार, 01/06/2008 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
'जीवन-मरण' दोन भाऊ.. एक आयुष्याची सुरवात....एका शेवटाकडे. एक आयुष्याचा अ॑त.........पुन्हा नव्या सुरवातीकडे..
Taxonomy upgrade extras

सहज

लेखक चेतन यांनी मंगळवार, 27/05/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी | शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी || कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || ~X( सहज सहज करताकरता हे काय झाले? शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T सहज चेतन
Taxonomy upgrade extras

"थेंब"

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/05/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे || थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे || थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे || थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे || थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे || थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे || (थेंबाथेंबांत ल
Taxonomy upgrade extras