Skip to main content

चारोळ्या

व्हॅलेंटाईन्स डे....

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/02/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो. या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा.. कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का? एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत. ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.

भास

लेखक गिरीशमित्र यांनी गुरुवार, 31/01/2008 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
होतीस तू साथ द्याया हाती होता तुझा हात मोडलास डाव कसा आज हा नुसता भास की आभास ? ----गिरीश __
Taxonomy upgrade extras

प्रिय प्राजुस....

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 20/01/2008 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय प्राजुस, काल पासून तु मिसळपाव वर दिसत नव्हतीस. मला वाटले तुला काही नविन रेडिओ प्रोग्रॅम ची तयारी करावराची असेल पण, आत्ताच तुझी प्रतिक्रिया वाचली. तू मिसळ्पाव वर चारोळ्या लिहिणार नाहीस म्हणून वाईट वाटले. पण असे करू नकोस आम्ही तुझ्या चारोळ्या, गुंफलेल्या विणी खूप खूप ऍन्जोय करतो. कोणा एका विक्रुत माणसापायी आम्ही एका चांगल्या कवियित्रीला मुकणार नाही निदान मिसळ्पाव वर तरी.. तु परत लिहायला चालू कर... आम्ही वाट पाहात आहोत..... तुझ्या प्रेरणेमुळे तर मी मिसळ्पाव वर लिहायला चालू केले आहे.. कित्येक जण कविता करायला लागले... तुझ्यामुळे...

मी शब्द ओठि रोखले...

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 15/01/2008 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
रोखले नयनात आसु, मी शब्द ओठी रोखले... पाहिले नाही तिला मी, नजरेस माझ्या रोखले... सांगुच का संयमाला...., मी असा का सोसला? होती मला जाणीव.... मजला इन्कार नसता सोसला... कविता माझी नहिये... कुठेतरी सापडलिये..... पण आवडलिये........
Taxonomy upgrade extras

आयुष्य तेच आहे

लेखक सनिल पांगे यांनी सोमवार, 07/01/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य तेच आहे कळण्यातच सरलं आहे आतास कुठे कळू लागलं पण, शेवटी किती उरलं आहे @सनिल
Taxonomy upgrade extras

नवी रेशमी वीण..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 05/01/2008 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मागे ऋषिकेश यांनी चारोळीचा सुंदर गोफ विणला होता. आपण सर्वांनी त्यात खूप मदत केली होती. आता या नव्या वीणीमध्येही मदत कराल अशी आशा आहे. पण ही थोडी वेगळी आहे. यात २ नियम आहेत. १. चारोळी ही चारच ओळींची असावी. पाचोळी नको. २. चारोळी लिहिताना त्यामध्ये आधीच्या चारोळीतील एक शब्द आलेला असावा... कृपया नियम मोडू नका.
Taxonomy upgrade extras

काही "दारोळ्या"

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 26/12/2007 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या वाचकांसाठी काही "दारोळ्या ..............." प्रत्येक तळीराम पिताना सांगतॊ मी दारू सॊडणार आहे दारू म्हणते़ तुझा संकल्प मीच ऊद्या मॊडणार आहे *************************************** दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत *************************************** माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रूसण्यावर जाऊ नका एकदा प्यायला बसलॊ की माझ्या असण्यावर जाऊ नका *************************************** मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा कुणीही पिताना दिसला॰॰॰ की आशेने पहाणारा *************************************** घराभॊवती कु