Skip to main content

चारोळ्या

त्रिवेणीचा प्रयत्न :

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न : आज कधी नव्हे ते मला खरंच यशाची किल्ली मिळाली आहे.. अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! ****************************** यशाकडे जाणारा मार्ग दिसत असतो...पण नेहमीच अंडर कन्स्ट्रकशन असतो.. - प्राजु (कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)

आत्मक्लेश४

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी बुधवार, 24/09/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
निवार्‍यासाठी पावसानं माझंच घर शोधलं, मग स्वागतासाठी त्याच्या मी अंथरलं पातेलं. डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. ढगाच्या सावलीला डोंगर समजला डाग, पेटून उठला वणवा जेव्हां ढग म्हणाला फुलतेय बाग.

आत्मक्लेश३

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी मंगळवार, 23/09/2008 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
बरं झालं साहित्यिक व्हायला लागत नाही उंची वजन छाती, नाही तर अनेकांच्या प्रतिभेची नक्की झाली असती माती. समईचे गाभार्‍याशी नाते कोणते? वेदनांचे जखमेशी नाते कोणते? लाख यत्न केले तरी सांगता न येते मनाचे देहाशी नाते कोणते ? कोळ्शाचंही रक्त लालच असतं तुकडे केले तरी दिसत नसतं, स्वत:ला जाळून घेतांना मात्र निखारे होउन वहात असतं.

हृदयांत सागराच्या..

लेखक प्राजु यांनी रविवार, 21/09/2008 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत सागराच्या फेसाळतात लाटा खडकांत फेनफुलेही शोधित जात वाटा खेळांत गलबताच्या लाटांचाही झिम्मा अस्तास भास्कराच्या क्षितिजावरी रक्तिमा ओठांत शिंपलीच्या मोत्याचेच गाणे किनार्‍यावरी सांडले सोनियाचे दाणे जातात पाऊले गं तिरपी कोण कशी?? खेकड्याची चाल रेतीवरी नक्षी घेताच खोल श्वास वारा ओशाळला धुंदीत यौवनाच्या क्षारात गंधाळला रात्रीस साथ देई खर्जातली गाज चंदेरी पाण्यावरी चढला रूपेरी साज.. का संथ चालला गं हा चंद्र अस्ताकडे प्रेमात तो ही घाली लहरींना साकडे उदयांस भास्कराच्या सागर मंत्रावला ओल्या वाळूवरी शिंपला दवांत भिजला - प्राजु

आत्मक्लेश२

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी गुरुवार, 18/09/2008 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी म्हणजे काय? कविला पडले कोडे दुकानात जाउन त्यानं मागितले थोडे. दुकानदार शहाणा ,दिले शब्दांचे बुडबुडे म्हणाला ,चारच ओळीत बांधावे पुडे सांत्वनाची असेल भाषा तरच आपली व्यथा सांगावी, नुस्तीच ढोंगांची असेल वर्षा तर आपण मिठाची गुळ्णी धरावी. ते तुळ्शीसाठी वृंदावन बांधतात मी वेलींसाठी बांधिन ग, ते मोत्यांसाठी शिंपले आणतात मी अश्रुंसाठी आणिन ग.

आत्मक्लेश

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी गुरुवार, 18/09/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळात काय प्यावे चुलीतल्या धुरावर डोळे धरावे मग नसेल पाण्याची उणीव फक्त आपले आश्रु दुसर्‍यास पाजावे.

खेळ दोन ओळींचा - १

लेखक राघव यांनी गुरुवार, 18/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;) मुमुक्षु

चारोळ्यांचा चखणा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 15/09/2008 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्यायला बसला पंपू, वर चारोळ्यांचा चखणा चारोळ्यांचा चखणा, मारतो काजूंचाही बोखणा काजूच्या बोखण्यातच मानली फ़ेणीची झींग झींग नकोच फ़ेणीची, मस्त होती कढी वीथ हींग सारी शब्दांची भेंडोळी, अन वृत्तांची खांडोळी कधी अर्थाची होळी, अपुरी यमकांची खेळी शोधून फ़सलेल्या ओळी अगम्य गम्याची जाळी टाकली आज संस्थळी आयतीच तयार चारोळी आधी होता कादंबरीकार त्याची लांबण खपेना लिहील्या लघुकथा चार तरी वाचक मिळेना पाडल्या कविता वजनदार त्याही फ़ुकटात विकेना केल्या चारोळ्या तय्यार लोक म्हणे एकोळ्या द्याना! डॉक्टर बघा ताप आला चांगले औषध द्या मला तुम्ही घेउ नका टेन्शन देतो तापाचे इन्जेक्शन काय राव
Taxonomy upgrade extras

आत्मक्लेश

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी बुधवार, 10/09/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतात फुलायचे, श्रावणात झुलायचे असं आपलं ठरलं होतं, पण ग्रीष्मात वाळायचे, शिशीरात गळायचे यातच आयुष्य सरलं होतं.