Skip to main content

चारोळ्या

कट्टा

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 14/05/2008 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टे तह्रेतह्रेचे कट्टे हसत खिदळत चघळत गप्पा बहरत खुलत सतत हा कट्टा गहीवरून कधी बसतही धक्का बांधीत नकळत मनांते पक्का वासु कट्टा वासुगट टारगट, फुकट धमाल कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल तिखट रिटॉर्ट ये पटपट जहाल खटनट वासु म्हणे करन्ट कमाल पेन्शनर कट्टा म्हातार जर्जर शरीर, फार प्रहर काढले सरता भास्कर, कट्ट्यावर घर मानुनी आले पारावर चार पेन्शनर पळभर विसावले गप्पांवर स्मृतींवर खरोखर
Taxonomy upgrade extras

धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

लेखक कैलासराजा यांनी गुरुवार, 08/05/2008 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

आबांच्या राज्यात...

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 22/04/2008 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. तासून तासून तासणार काय? आबांनी कोणाची ठेवलीय काय?

एक अशीही केस...

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 20/04/2008 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
काळा असल्यावर सर्वांनाच आवडतो पांढ-याच्या नशीबात बायकोचाही नसतो

दंव

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
दंव ग्रीष्मातली पानगळ बघून पहाटे पहाटे देव रडला त्याचा आसवांचा सडा पाना-फुलांवर अलगद् पडला माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? अश्रू ओळखेनात देवाचे? म्हणे केव्ह्ढा हा"दंव" पडला ! -------------------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

गजरा.....

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
गजरा..... लांब केसांची वेणी उदास वाटते केसांत फुलं माळ जरा "चेहृयामागेही सौंदर्य आहे !" डोकावून हळूच सांगेल जरा उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

नकलाकार.....

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
नकलाकार..... कधी अभिनय कधी नकला अशा कला करतो साकार आहे वेड्यावाकड्या आयुष्याला आपल्या तो नेहेमीच देतो आकार आहे मेजकं तेव्हढंच सर्वांचं उचलून ते रंगवणारा कलाकार आहे सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र कलाकार आहे ! ------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

जन्म चारोळीचा.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 31/03/2008 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मला तिष्ठत उभे ठेऊन तू नाही नाही ते बोललीस तू गेलीस आणि भानावर येत मनाची आरोळी आली तू दिलेल्या वेदनामय शब्दांना ओळीत उभे करून माझ्या "वांझोट्या" प्रेमाची चारोळी झाली !

व्हेलेंटाईन्स डे...२

लेखक प्राजु यांनी रविवार, 10/02/2008 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागात पान उलटावे लागत असल्यामुळे इथे सुरू करत आहे. आपण सगळ्यांनी पुन्हा भरभरून लिहावे हीच विनंती.. तुझ्या डोळ्यांतल्या नभी माझे स्वच्छंदी विहरणे निळ्या मेघात दाटूनी सरीतूनी बरसणे.. - प्राजु

(काहीच्या) काही चारोळ्या

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 06/02/2008 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
१. सोबत कुणी असेल, तर सिनेमा पहायला अर्थ आहे एकट्यानेच पाहायचा असेल, तर अंधारही `व्यर्थ' आहे! २. गावाबाहेर आडोशाला एक पडका वाडा आहे तिथेच भरलेला माझ्या तारुण्यातल्या पापांचा घडा आहे ३. आपण भेटायचो ते झाड आत माझ्यासारखंच ताडमाड वाढलंय तिथेच माझ्या मुलानं माडीचं दुकान काढलंय! ४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला मी तिच्याजवळ नव्हतो कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर मी भाषण झोडत होतो... ५. मी तुझ्याकडे यायला निघते पण तुझ्यापर्यंत पोचत नाही वाटेत २-४ मित्र भेटल्यावर त्यांनाही सोडवत नाही. ६. बोन्साय केलेल्या झाडालाही एकदा पालवी फुटली त्यालाही कळेना, ही `वाढायची' जिद्द कुठली? ७.
Taxonomy upgrade extras