मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

पण............

नम्रता वर्तक ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काहीतरी लिहावस वाटत पण........ शब्द सुचत नाही......... काहीतरी बोलावस वाटत पण........ जिभ वळत नाही......... थोड रडावस वाटत पण........ अश्रु येत नाही........... सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........ चागली साथ मिळत नाही...........

स्वप्न

विष्णु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रु दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात, तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.

कार्यालय

विनोद इन्गळे ·
Taxonomy upgrade extras
कार्यालय इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय - विनोद इंगळे

माधुरी.....

उदय सप्रे ·
लेखनविषय:
प्रत्येकाच्या मनात जरी एक माधुरी असते तरी, माधुरीला कुणा एकाचंच होता येतं पण जीवनसंगिणीला माधुरीसारखं वागवून पहा, किती जणांना श्रीराम होता येतं !

विठू सांगे...

प्राजु ·
आषाढाचा मास । दर्शनाची आस । होती तुझे भास । पांडुरंगा । । साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री । दिवसा नि रात्री । रूप तुझे । । खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी । वसतो पंढरी । विठू राया । । भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । । काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ?

वात्रटिका

शेखर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
"मिसळपाव" खाता खाता लागली जोराची हागवण ! शौचकुप शोधायला इतिहासात धावले भक्तगण !! ================ शेखर - १८-०६-२००८

कार्यालय

विनोद इन्गळे ·
लेखनविषय:
इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिल नाही कुणाचही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय

सल

भारती ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
केसात तुझ्या सुग॑ध दरवळले अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले

इंद्रधनुष्य

चेतन ·
लेखनविषय:
इंद्रधनुचे रंग http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358288475904354 http://picasaweb.google.co.in/crdanave/SelectedGoregaon/photo#5211358300933044658 चेतन