मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

आठवण

स्वप्नयोगी ·
येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

ती माझी कविता

गोगट्यांचा समीर ·
ती , अल्लड ,अवखळ ,चंचल सरिता ती, अद्भुत, अनोखी नव परिकथा , ती , सुन्दर,सोज्वळ,गौर रूपगर्विता, ती ,आसमन्ती, अकस्मात झलके विद्युल्लता ती माझी कविता, तीच माझी कविता ॥

मैत्री

स्वप्निल मन ·
मैत्रीच॑ नात॑ कायम जपायच॑ असत॑ प्रेमासाठी कधी मित्राला सोडायच॑ नसत॑ कारण मित्र हा कायम मित्र राहात असतो प्रेयसी सारख॑ कधी नात॑ बदलत नसतो

चारोळी

स्वप्निल मन ·
मित्र सा॑गत होते तरी नाही ऐकल॑ तुझ्यासाठी मी मित्रा॑नाही तोडल॑ माझ्यावर तु प्रेम तर कधीच नाहीच केल॑ पण मला साध॑ मित्रसुद्धा नाही मानल॑

कविता पूर्ण करा...

प्राजु ·
सहज या दोन ओळी सुचल्या.. कोणाला ही कविता पूर्ण करावी वाटली तर जरूर करावी. कोणाला दुसरे कडवे सुचले तर लिहावे. ही कविता पूर्ण करण्यांस मदत करावी. या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? - प्राजु