मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भूगोल

सैंधव मीठ/हिमालयीन/खेवडा मीठ

Bhakti ·
काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.

रौद्रगर्भा वसुंधरा भाग २ : आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग (सुधारित)

शेखरमोघे ·
या आधीचे संबंधित लिखाण रौद्रगर्भा वसुंधरा भाग १ : https://www.misalpav.com/node/51286 (मी १९८३ साली प्रथम जपानमध्ये ज्वालामुखी पाहिला. त्यानंतर इंडोनेशिया आणि न्यूझीलंड या अनेक ज्वालामुखी असलेल्या दोन्ही देशांतील बरेच तसेच अमेरिकेतील काही ज्वालामुखी -कांही कधीही उद्रेक पावतील असे वाटणारे, कांही नुसतेच धुमसणारे, काही सुप्त, काही मृत, काही तरुण, काही वृद्ध - पाहिले. इंडोनेशियातील बऱ्याच लांबलचक वास्तव्यामुळे २००४ साली अचे, सुमात्रा येथे -आणि इतरत्र देखील, पण कमी प्रमाणात - झालेल्या त्सुनामीचे परिणामही बऱ्याच जवळून पहाता, समजता आणि वाचता आले.

रौद्रगर्भा वसुंधरा भाग २ : आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग

शेखरमोघे ·
या आधीचे संबंधित लिखाण रौद्रगर्भा वसुंधरा भाग 1 (मी १९८३ साली प्रथम जपानमध्ये ज्वालामुखी पाहिला. त्यानंतर इंडोनेशिया आणि न्यूझीलंड या अनेक ज्वालामुखी असलेल्या दोन्ही देशांतील बरेच तसेच अमेरिकेतील काही ज्वालामुखी -कांही कधीही उद्रेक पावतील असे वाटणारे, कांही नुसतेच धुमसणारे, काही सुप्त, काही मृत, काही तरुण, काही वृद्ध - पाहिले.

रौद्रगर्भा वसुंधरा भाग १ : प्रास्ताविक

शेखरमोघे ·
एखादे सफरचंद किंवा एखादा लाल भोपळा आतून खराब तर नाही ना असा जर प्रश्न पडला तर काय करता येईल? चक्क ते सफरचंद किंवा तो भोपळा कापून त्याच्या आंत "डोकावता" येईल. पण जर "पृथ्वीच्या पोटात कांही गडबड तर चालू झालेली नाही ना" असा जर प्रश्न पडला तर? तर काय करता येईल? पृथ्वीचा आकार लक्षांत घेता (सुमारे १२,००० कि. मी. व्यासाचा एक गोल) सफरचंद किंवा भोपळा यांच्यासारखा पृथ्वीचा पृष्ठभाग कापून "थोडेसे" तरी पृथ्वीच्याआंत "डोकावता" येईल?

टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!

मार्गी ·
✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव ✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो ✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक ✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे ✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल सर्वांना नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की, सध्या एक धुमकेतू- C/2022 E3 (ZTF) बायनॅक्युलरने दिसण्यासारखा आहे. २४ जानेवारीपर्यंत तो नुसत्या डोळ्याने दिसू शकेल, इतका तेजस्वी झालेला नाही आहे. परंतु तो बायनॅक्युलरने किंवा छोट्या टेलिस्कोपने बघता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि काळोख असलेलं आकाश लागेल.

चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची

मार्गी ·
✪ तेजस्वी ता-यासारखं international space station! ✪ शनीची कडी, गुरूचे उपग्रह आणि तांबूस मंगळ ✪ सुंदर कृत्तिका- ४०० वर्षांपूर्वीचं दृश्य ✪ चंद्राचे खड्डे आणि मैदानं ✪ अहंकाराचे भ्रम दूर करणारं विराट विश्व ✪ नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या गमती जमती ✪ मुलांचा व पालकांचा उत्साह सर्वांना नमस्कार. सध्या आकाश दर्शनासाठी उत्तम काळ आहे. मध्ये मध्ये येणारे तुरळक ढग सोडले तर रात्री सुंदर आकाश बघता येतं. अनेक ठिकाणी मुलांना आकाशाच्या गमती दाखवण्याची संधी मिळत आहे. आयुर्वेद व्यासपीठ परभणी ह्यांनी मुलांसाठी व मोठ्यांसाठी दि.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

पराग१२२६३ ·
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

पाषाणभेद ·
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे.

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद ·
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा.