Skip to main content

विरंगुळा

गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 02/09/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!! भाग १ हवाईदलातील माझ्या आठवणी... १९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे. कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत.

आवंढा

लेखक मिलिंद जोशी यांनी सोमवार, 02/09/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र आहे. तो चित्रपट, टीव्ही सिरीयल यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. मधून अधून काही चित्रपटात, टीव्ही सिरीयल मध्ये छोट्या भूमिका देखील करतो. पण ते फक्त हौस म्हणून. मुख्य काम मात्र डायरेक्टरला असिस्ट करण्याचेच. परवा त्याची आणि माझी बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. खरं तर तो असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे काय हेच मला नीट समजत नव्हते. मग त्याला विचारलेच. “यार... तू असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे नक्की काय करतोस? कित्येक वेळेस तर तू टीव्हीवर दिसतोस पण तुझे नाव मात्र कोणत्याच यादीत दिसत नाही. असे कसे?” मी भाबडेपणाने प्रश्न विचारला. “अरे काही नाही रे...

तारिफ

लेखक मिलिंद जोशी यांनी सोमवार, 02/09/2019 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांना इतरांची प्रशंसा ( म्हणजे तारीफ हो... ) करण्याची खूप चांगली सवय असते. अगदी हृदयाच्या तळापासून ते समोरच्या माणसाची प्रशंसा करतात. मलाही खूप आवडते, लोकांनी माझी प्रशंसा केलेली. अगदी स्पेशल वाटतं दिवसभर. पण काही वेळेस अशा व्यक्ती आपली प्रशंसा करताना आपल्याला असली एकेक बिरुदे चिकटवतात की त्यावर हसावे की रडावे अशा प्रश्न पडतो. गोष्ट तशी बरीच जुनी आहे... माझ्या कॉलेज जीवनातली. पण अजूनही अगदी जशीच्या तशी आठवते आहे. त्या काळी मी क्रिकेट खेळायचो... म्हणजे अजूनही खेळतो म्हणा. पण आताच्या खेळण्यात आणि त्या वेळेसच्या खेळण्यात खूप फरक पडला आहे.

जीवनाचे धडे

लेखक मिलिंद जोशी यांनी रविवार, 01/09/2019 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
काल बऱ्याच दिवसांनी माझ्या वर्गमित्राचा फोन आला होता. भरपूर गप्पा झाल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तशा अनेक खपल्याही निघाल्या. “काय म्हणताहेत तुझी मुलंबाळं?” मी नेहमीचा प्रश्न विचारला आणि तो एकाएकी गंभीर झाला. “यार... बरं झालं तू लग्न केलं नाहीस...” त्याने म्हटले आणि मी चाट पडलो. खरंय ना... जो माणूस ‘मिल्या... तूही उरकून टाक आता... किती दिवस संट्या राहणार?’ असं म्हणायचा त्याच्याकडून असे वाक्य अपेक्षितच नव्हते. “कारे? काय झालं?” मी थोडं गंभीर होत विचारलं. “यार... माझा मुलगा मागील वर्षी दहावीला होता. खूप हुशार आहे तो.

एक ऐकलेली कार्पोरेट कथा..

लेखक चिनार यांनी गुरुवार, 29/08/2019 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट कंपनी होती. सगळं कसं छान, सुसज्ज,चकचकीत,स्वच्छ वातावरण. अगदी "परिंदा भी पर ना मार सके" अशी सुरक्षा व्यवस्था. हजारो इंजिनीयर्स, शेकडो मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, व्हाईस प्रेसिडंट असे सगळे हुशार लोकं तिथं काम करायचे. अर्थात काम करताना काही ना काही समस्या रोजच यायच्या. पण सगळेच प्रोफेशनल असल्यामुळे, स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या सोडवायचे. मग त्याचं कोडकौतुक,बक्षिस,पगारवाढ,बढती असं चक्र नेहमीच सुरु असायचं. पण एके दिवशी अघटीत घडले. नेहमीच्या समस्या बाजूलाच राहिल्या अन एक भलतीच समस्या उद्भवली. कंपनीचे सुरक्षाचक्र भेदून एक माकड कंपनीत शिरले.

एक नष्ट झालेलं करिअर!

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 22/08/2019 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रत काळ मोठा कठीण आहे. सध्या भारतात आणि जगात आर्थिक मंदीच आगमन झालं आहे की ही फक्त सुरुवात आहे यावर अनेक असलेले आणि नसलेले अर्थतज्ञ डोकेफोड (एकमेकांचे) करत आहेत. पण रिकाम्या वेळात फालतू पिक्चर बघणे ह्या उद्योगात गेल्या काही वर्षात प्रचंड मंदी आहे. वास्तव वगैरे पिक्चर यायला लागल्यापासून तर काही करिअर हे जवळपास नष्ट झाले आहेत. हे बघून अस्मादिकांना प्रचंड हळहळ वाटत आहे. त्यापैकीच एक म्हणजे कुठल्याही जुन्या सिनेमामध्ये मुख्य गुंडाचे साथीदार, म्हणजे ‘असिस्टंट गुंड’ हे करिअर. गेल्या कित्येक सिनेमांमध्ये हे कोरस गुंड गायबच झाले आहेत. एक काळ ह्या पंटर लोकांनी खूप गाजवला.

सावज (भाग १)

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 12/08/2019 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला. ================================================== " करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ...

रॉबिन विलियम्स

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 12/08/2019 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती. हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 11/08/2019 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही.

डोक्याला शॉट [द्वितीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 06/08/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: निवेदन आणि उपास (बटाट्याची चाळ) रताळ्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही! अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खणातून केव्हा काढल्या, गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमण बिल्डिंगमधल्या उकिडव्यांच्या घरी केव्हा नेल्या, ही गोष्ट पावशीण- काकूंना कळायच्या आत आमच्या कुंटुबाला कळली! एच्च.