अहिराणी लगीनघाई !

लेखनविषय:
नमस्कार! २०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' मायबोली.कॉम वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते. त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय.सर्वांना समजेल अशी आशा आहे.. प्रसंग असा आहे: आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय. ..... नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी?

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग २)

लेखनविषय:
लेखनप्रकार
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न

समजा आपण आज देशाची अर्थव्यवस्था सुरु करतो आहोत. आपण RBI चे गव्हर्नर आहोत, म्हणजे या अर्थव्यवस्थेचे हृदय आहोत. आपल्या हातात देशभरातील बँकांचे जाळे आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत आणि आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेत चलनरूपी रक्तपुरवठा करायचा आहे. पण तो मिळणार कुणाला? तर या देशातील नागरिकांना. मग आपली अपेक्षा काय असेल? आपली पहिली अपेक्षा असेल की प्रत्येक नागरिकाने त्याची संपत्ती जाहीर करावी.

टपली अन टिचकी.

लेखनविषय:
लेखनप्रकार
गिरीश कुबेर ह्या माणसाबद्दल आपल्याला लई आदर.(होता) त्याची सगळी पुस्तक अगदी घरी घेऊन वाचली. “एका तेलियाने” , “हा तेल नावाचा इतिहास आहे” , “हे युद्ध जीवांचे” “अधर्म युद्ध” ते अगदी हल्ली आलेले “टाटायन”. एकसो एक भारी पुस्तक. मराठीत तरी तेल आणि त्याच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल इतर कुणीही काहीही लिहिलेले मला माहित नाही. भाऊने आचार्य रजनिशांची जी बिन पाण्याने केली ते पाहून आपण खुश, माणूस समाजवादी. म्हणजे तसे आपण समाजवादी नाही पण एकंदरीत समाजवाद्यांचे विचार अगदी सगळे नाहीतरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला पटतात.

संन्याशी आणि उंदीर!

लेखनविषय:
लेखनप्रकार
संन्याशी आणि उंदीर! हि गोष्ट लहानपणी वाचली होती. एका गावाबाहेर एक मोठ पण जीर्ण असं गणेशाचं देवालय असते. तिथे एक संन्यासी राहत असतो. असतो तसा त्याच गावाचा पण सन्यास घेतल्यामुळे गावाबाहेर ह्या मंदिरात राहत असतो. गावात भिक्षा मागून आपली उपजीविका चालवायची आणि ध्यान धारणेत काल व्यतीत करायचा हा त्याचा दिनक्रम. त्याच मंदिरात एक उंदीरही राहत असतो. तो उंदीर सुद्धा एकटाच राहत असतो. पण तो ह्या सन्याशाने आणलेल्या भिक्षेतील धन्य कधी मधी मंदिरात वाहिलेले धन वगैरे गोळा करत असतो. आता एव्हढासा उंदीर त्याची गरज ती किती असणार!

डिमॉनेटायझेशन (भाग १)

लेखनविषय:
लेखनप्रकार
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

प्रस्तावना

ही प्रस्तावना लिहिण्याचे कारण या लेखनावर येऊ शकणारे काही संभाव्य प्रतिसाद आहेत. संकल्पनांविषयी कुठलीही चर्चा सर्वांना मनपसंद होईल, पूर्णपणे पटेल अश्या स्वरूपात करणे अशक्य असते असा माझा शिक्षणक्षेत्रातील गेल्या २० वर्षांचा अनुभव सांगतो. प्रत्येकाचे पूर्वग्रह आणि आकलन निराळे असते. मी त्याचा आदर करतो. आणि माझी जबाबदारी, संकल्पना तिच्या शुद्ध स्वरूपात तिच्या योग्यायोग्यतेबाद्ल टिप्पणी न करता मांडण्याची आहे, असे मानून चालतो.

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखनविषय:
लेखनप्रकार
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे.

रंगभूमी दिन

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥ या नांदी बरोबर तिसरी घंटा झाल्यावर रंगमंचावर नटाचा परकाया प्रवेश होतो. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवराव भोसले, अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी रुजवलेलं हे रोपटं विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सतीश आळेकर यांनी याला जोपासून त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं.

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती!-भाग ३

लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/37792 http://www.misalpav.com/node/37794 भाग ३ सांस्कृतिक उदिष्ट म्हणजेच सांस्कृतिक तसेच मूल्य शिक्षण – आतापर्यंत आपण पाहिलेली उद्दिष्ट हि तशी वैयक्तिक किंवा कौटुंबिक अशी होती पण आताचे हे उद्दिष्ट समष्टी करता असून ते मुलभूत उद्दिष्टांमध्ये का समाविष्ट केले आहे? असा प्रश्नदेखील कुणाला पडू शकतो.आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून हे लक्षात आलेलं असेलच की शिक्षण आणि शैक्षणिक धोरण म्हणजे केवळ अभ्यासक्रम त्याची आखणी आणि लोकांना किमान साक्षर करण्याचा एक सरकारी कार्यक्रम एवढच त्याच स्वरूप असून चालत नाही. प्रत्यक्षात ते तस कधी असत हि नाही.

'घोकंपट्टी'

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी मुलगी senior kg मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते. गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात.
Subscribe to विचार