मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

गोष्टी सिनेमाच्या - भाग १

साहना ·
गोष्टी सिनेमाच्या - भाग १ लहानपणी शांता शेळके ह्यांची चित्रपट विषयक काही पुस्तके मला कुणी वाचायला दिली होती. त्यांत माझ्या आठवणी प्रमाणे काही इंग्रजी चित्रपटांचा सारांश दिला होता. हे अनेक चित्रपट जुने होते आणि ग्रामीण भागांत (आणि शहरांत सुद्धा अनेक ठिकाणी) कुठे केबल आणि इंटरनेट नसल्याने त्या काळी मला बघता आले नाहीत. पण तरुणपणी ते सर्व चित्रपट मी आवर्जून पाहिले. शांता शेळके ह्यांनी मला इंग्रजी चित्रपट न पाहता सुद्धा चित्रपटांची आवड लावली असे म्हणू शकते. त्या काळी हॉलिवूड चित्रपटांची एक डिक्शनरी यायची त्यांत शेकडो चित्रपटांची माहिती येत असे, म्हणजे ३-४ वाक्यांत चित्रपटाची कथा आणि एक रेटिंग.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

सुपरहिरो क्लॉ-एक्स वर एक लघुपट

विजयशेट्टी ·
मित्रांनो, बर्‍याच लोकांना आठवत असेल की राज कॉमिक्स एक शॉर्ट फिल्म घेऊन आली होती, बहुधा फक्त 2, प्रत्येकाकडून पैसे गोळा केले होते, त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता असताना, ज्यांनी मास फंडिंग दिले त्यांना क्रेडिट सुद्धा मिळाले नाही (असे असावे) डोगा लोक शॉर्ट फिल्म बद्दल माहितीही नव्हती आणि काही प्रकाशन त्यांच्या व्यक्तिरेखेची शॉर्ट फिल्म काढणार होते, राज कॉमिकचे नाव विसरले लोकांनी नागराजची सिरीयल घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नकार मिळाला आणि मालिका खूप चांगली निघाली .

प्रॉफेट : खलील जिब्रान : पुस्तक परिचय

विजुभाऊ ·
प्रॉफेटः खलील जिब्रान.. प्रॉफेट हे अगदी छोटेखानी पुस्तक . त्यातल्या भाषेने अगोदर लक्ष्य वेधून घेतले. आणि मजकुराने वेड लावले. पुस्तक कधी वाचले हे आता लक्ष्यात नाही. पण रजनीशांची प्रवचने ऐकताना त्याचा उल्लेख बरेचदा होतो. प्रॉफेट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील १०० पेक्षाही जास्त भाषांमधे या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. ( बोरकरांनी याचा कोकणी मधे अनुवाद केला आहे) खलील जिब्रान हा मूळचा लेबनान मधला. कुटुंबा समवेत तो अमेरीकेत आला.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

पराग१२२६३ ·
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.

ती आणि इतर.... "सायलेन्स इस नॉट दि ऑप्शन....!!!"

मधुरा कुलकर्णी ·
#LatePost             वास्तविक हे चित्रपट समीक्षण मी खूप आधी लिहिलं होतं... पण प्रकाशित करायचा मुहुर्त आत्ता लागलाय असं म्हणायला हरकत नाही...              खरंतर चित्रपट समीक्षण हा व्यक्तिपरत्वे भिन्न मत दर्शवणारा लेख आहे.. पण तरी एखादा चांगला चित्रपट आणि त्याच समीक्षण करणं आणि मास कम्युनिकेशन साधून एखादा जनुईन चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणं...

चित्रपट समीक्षा -- The Man from Earth (2007)

श्रीगणेशा ·
आपल्या मिपावरीलच एका धाग्यात "The Man from Earth" या चित्रपटाबद्दल वाचलं. मिपाकरांना आवडला, म्हणजे चित्रपट चांगला असणारच, याची खात्री होती. पण हल्ली सवयीप्रमाणे, चित्रपट पाहताना अपेक्षा तशा बाजूलाच ठेवलेल्या असतात. उगीच नंतर वेळ वाया गेल्याची खंत राहत नाही.

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग ३ -- कुटुंब

श्रीगणेशा ·
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे.

जानरावन कांतारा पायला

मित्रहो ·
(खालील लेखात कांतारा या सिनेमाची गोष्ट काहीशी सविस्तर सांगितली आहे.त्यामुळे ज्यांनी याआधी चित्रपट बघितला नाही त्यांच्यासाठी चित्रपट बघण्याच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो. साधारण अडीच वर्षानंतर वऱ्हाडी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतोय. खूप दिवसानंतर जानराव आलेत. ) अमदा आमच्या भागात कसा पाणी पडला तुम्हाले तर मालूमच हाय. माणूस माणूस पाणी धसल होतं वावरात, आठ दिस झाले तरी टोंगळा टोंगळा गाढणं होत. वावरात जाची सोय नव्हती. तो आपला ग्यानबा नाही तसा मोठा कास्तकार हाय तो, पण देवाच्या मर्जीपुढ का चालते जी. त्याच वावर तर नदीच्या काठावरच हाय पाणी उतराच नाव घेत नव्हतं.

परदेशस्थ भारतीय

पराग१२२६३ ·
लोगो इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.