मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिभा

"राहुल द्रविड- The Unsung Hero Of Indian cricket"

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.

दिनेश कार्तिकची फिनिक्स भरारी...

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे. १ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला.

अप्रकाशित विनोदी साहित्य हवे आहे

विनिता००२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो, 'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात… आपण विनोदी साहित्य लिहीत असाल...जसे की विनोदी कथा, चुटकुले, नाटुकले इत्यादी तर आपण आपले स्वलिखित 'अप्रकाशित साहित्य' आम्हांला देऊ शकता. (फार ओढून ताणून केलेले विनोद नकोत, तसेच व्हॉट्सअप विनोद नकोत. कुठलेही कमरेखालचे विनोद नकोत.) निखळ फॅमिली ड्रामा हवा. उदा. वागळे की दुनिया, तारक मेहता का उल्टा चष्मा...आपल्या पुलंचं साहित्य. निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत!

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद ·
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_borase.pdf येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

राधे ,पेन्शन योजना

हस्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राधे ,पेन्शन योजना नोंद सपरिवार बघू नका सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे एक सुस्पेंड झालेला एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट परत घेतायत तेव्हा वाझे ह्यांचीच आठवण येते पण इथे अर्णव गोस्वामी वाझे ह्यांना घाबरला होता तिथे मात्र सलमान ला रणदीप हुंडा धोपटून बाथरूम मध्ये बंद करतो आणि पुरा पोलीस हेड quarter मध्ये त्याची टर उडवली जाते ह्

आमचीबी आंटी जन टेस

पाषाणभेद ·
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो. माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न!

एखादं तरी फूल!

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे (दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ च्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर माझी ‘सायको’ नावाची कादंबरी इचलकरंजीच्या ‘तेजश्री प्रकाशना’कडून प्रकाशित होत आहे. त्या कादंबरीतील विशिष्ट अंश दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ च्या ‘अक्षरनामा’त प्रकाशित झाला. तोच आजच्या ब्लॉगवर...) : गावातील मंदिराचा पार. पारावर जीवन, प्रताप, मधुकर, आत्माराम, कडू दिसतात. आत्माराम, कडू हे खाली बसलेले तर जीवन, प्रताप, मधुकर पारावर उभे आहेत. कडू अजूनही दारुच्या नशेत आहे. पण नशा बरीच उतरलेली दिसते. बाजीराव शेट मागे एका कोपर्‍यात बसलेले दिसतात. आत मंदिरात काही माणसं आणि बायाही दिसतात दुरुन. बाहेर अधून मधून पाऊस पडतो.

गुमोसोस आणि अफ़सोस

कुमार जावडेकर ·
लेखनविषय:
आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत.