Skip to main content

कृष्णमयी.

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/01/2021 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णमयी ..... चकोर शाह ते टेकडीवरचे झाड पाहिलस? एकटच उभे आहे. कधी पासून माहीत नाही. मला आठवत तेंव्हापासून इथेच असतं .असंच आकाशाच्या कॅनवासवर सुकलेल्या फांद्यानी नक्षी उमटवत. याच्या फांद्याना हिरव्या गार पानांनी नटलेलं कधी पाहिलं नाही, की त्यावरची फळं तोडायला कुण्यामुलांन दगड मारलेला पाहिला नाही. नाही म्हणायला हिवाळ्यात कधितरी एखादा चुकार पतंग याच्या फांद्यात अडकतो. काही दिवस फडफडत रहातो.प्रेमात पडल्यासारखा फांदीला बिलगतो. इतका की झाडाला फुल आलंय असे वाटावे. एक दोन दिवसच. वारं आलं की तो पतंग सुटायची धडपड करतो. त्याच धपडडीत फडफडून फाटून जातो.

तुम्हे अल्फाजों मे..... २

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/01/2021 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे? काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला.... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........ ..................... चकोर शाह.
मागील दुवा http://misalpav.com/node/48162 माझ्या कडे बघताना तुझे डोळे विस्फारतात. तू एक दीर्घ श्वास घेतेस आणि हसत सुटतेस. तू म्हणजे ना अस्सा आहेस म्हणत लटक्या रागाने माझ्या पाठीत एक गुद्दा घालतेस.

प्रतिभा आणि त्यातली करिअर्स

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 26/01/2021 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल? प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का? क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का? अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे? प्रतिभा या क्षेत्रात केवळ भारतात करिअरच्या दृष्टीने किती स्कोप आहे? क्रिएटिव्हिटी या अंतर्गत करिअरचे पर्याय कोणते सुचवाल? प्रतिभा हा प्रकार उपजत असेल तर कोर्सेसची जोडणी हवीच का?

तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं.

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 23/01/2021 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी पुस्तकात राजाराणीची गोष्ट असायची. राजकुमार पांढर्‍या शुभ्र होड्यावरून दौडत कुठेतरी जंगलात निघायचा. तेथे तो रस्ता चुकायचा. कोण्या जादुगाराने त्याच्या राज्यात जायचा रस्ताच पुसून टाकलेला असायचा. राजकुमार घरी जायचा रस्ता शोधत बसायचा. आणि इकडे घरी त्याची राजकुमारी वाट पहात असायची. कोणीतरी त्याचा परतीचा रस्ताच पुसून टाकला असेल हे तीच्या ध्यानीमनीही यायचे नाही. तीला वाटायचे की राजकुमार हे मुद्दाम करतोय. तीची थट्टा करण्यासाठी. ती रुसून बसायची .राजकुमार बिचारा कसाबसा नवा रस्ता शोधत घरी यायचा. रुसलेली राजकुमारी मनातुन खुश व्हायची. पण तीला वाटायचे की राजकुमाराने आपली मनधरणी करावी.

सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 07/12/2020 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा भाग ७ - उलट-पलट आदिकाळापासून चालत आलेली व्यवस्था. तिने घर सांभाळायचे आणि पुरुषाने उदरनिर्वाहाचे बघायचे. यात कधीतरी अहंकार आणि आपल्यावरच ती अवलंबून आहे हा गैरसमज शिरला. हळूहळू कुटुंबव्यवस्था नावाखाली तिचे पद्धतशीर शोषण सुरू झाले. तिचा घरच्या कामांसाठी वापर करणे, शिकून काय करायचेय, घराची कामे करायला शिक्षणाचे चोचले कशाला हवे, स्त्री म्हणजे अबला अशी मानसिकता पसरवून तिचा गैरफायदा घेणे.. जिथेजिथे शक्य होईल तसे शोषण जगभरात होऊ लागले.

सरतील कधी शोष शोषितांचे!

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 04/12/2020 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
खंड पहिला भाग – २. तिने सकाळी उठून अंगणात सडा सारवण केले. आंघोळ उरकून तुळशीला पाणी घातले. अजून सगळे घर शांत झोपेत होते. लवकरच म्हशीचे दूध काढायला गडी येईल. नंतर हरकाम्या नोकर, स्वयंपाकाची बाई, एकेक राबता सुरू होईल. बाईने सगळ्यांचा चहा, ताजे दूध शेगडीवर चढवले की मग ती जागे होणाऱ्या मुलाबाळांकडे लक्ष पुरवायला मोकळी. भरलेले सुखी घर होते ते. दोन भाऊ, या दोघी जावा, लहान मोठे मिळून नऊ बाळगोपाल शिवाय त्यांचे आजी आजोबा. ती मोठी जाऊ म्हणून घरातली मुख्य जबाबदारी तिच्यावरच होती. सगळ्यांना तिच्या प्रेमळ अधिकाराची इतकी सवय झाली होती, की तिच्याशिवाय घरातले पान हलत नव्हते. धाकटी जाऊ सगळी मदत करायची.

सरतील कधी शोष शोषितांचे!

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 03/12/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक दीर्घकथा सुरू करीत आहे. हजारो वर्षांच्या कालपटावर ही घडली आहे, व पुढे घडणार आहे. माणसे बदलतील, स्थलकाल बदलतील.. पण माणूस बदलणार नाही.. नक्की? बघूयात.. भाग - १ उपोद्घात कोणास ठाऊक, कदाचित विधात्यानेच घडविले असेल. डार्विनने शब्दांत मांडले येवढेच. प्राणीजातिलाच कशाला बदनाम करायचे? निसर्ग सुद्धा टिकू न शकणारे मोडून तोडून नवी निर्मिती घडवित असतो. जमिन प्रबळ आहे तोवर घट्टपणे मांड टाकून खदखदत्या अंगाराच्या छाताडावर बसून राहते. पण ती जरा कमी पडली की ज्वालामुखी तिच्या चिथड्या करून अग्नीलोळांचे राज्य तिथे स्थापन करतो. मैलोंमैल वाहणाऱ्या नदीला सागर पूर्णपणे गिळून स्वाहा करतो.

वृक्षासिनी

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 29/11/2020 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

बदल

लेखक केदार पाटणकर यांनी शनिवार, 07/11/2020 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
यशवंतच्या बाकावर तो एकटाच होता. समोरच्या बाकावर एक तरुणी होती. रेखीव चेहरा. बांधेसूद व्यक्तिमत्व. गळ्यात मंगळसूत्र. संपूर्ण रुममध्ये ते दोघेच होते. पार्टीशनच्या पलीकडे रिसेप्शनिस्ट मुलगी होती. त्या पलीकडे डॉक्टरांची खोली. तिघेही डॉक्टरांची वाट पाहात होते. डॉक्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला पेशंट झाल्यावर बोलावत असत. समोरच्या तरूणीला बोलावल्याशिवाय त्याला बोलावणे जाणार नव्हते म्हणून पुरेसा वेळ यशवंतकडे होता. यशवंत ब्रीफकेसमधून स्वतःची फाईल काढून चाळू लागला. आज डॉक्टरांना कोणती औषधे प्रेझेंट करायची आहेत, याचा एकदा आढावा घेऊ लागला.

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 25/09/2020 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील. एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे.