Skip to main content

प्रकटन

रात्ररंग..

लेखक प्राजु यांनी रविवार, 23/11/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
रात्ररंग.. चांदण्यांचे तेज सारे श्यामरंगी रंगले मोगरीचे चांदणेही भूवरी या गंधले शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू क्षेम* द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले (क्षेम : मिठी, अंकी : मांडीवर) - प्राजु
Taxonomy upgrade extras

समस्यापूर्ती

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 22/11/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मागील यमकाच्या खेळास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही आता नवीन समस्या मांडत आहे - आज नाही पौर्णिमा ,अन ग्रहण नाही आजला, सांग सखये कोणता तो, चंद्र कैसा ग्रासला ? या वरील काव्यमय समस्येला काव्यमय उत्तर अपेक्षित आहे.
Taxonomy upgrade extras

मिपाजाल -सी.ए. एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 22/11/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
विप्र मास्तरांना मिपाजालवर येउन साधारण चार महिने झाले होते. तेवढ्यात त्याना ठाणे मिपा कट्ट्याचे आमंत्रण मिळाले. मिपाच्या मालकांना व इतर विभुतींना भेटायला मिळणार हे बघून त्यांचा आनंद त्यांच्या ब्लॉकमध्ये मावेना. मास्तर मिपाजालावर क्रिप्टीझम चे बादशाह म्हणुन प्रसिद्ध झाले होते. त्यांनी शिक्षण ह्या रुक्ष विषयाला सोडून वेगळेच विशय हाताळायला सुरु केल्याने मिपा सद्स्य रामदास त्यांच्यावर नाराज झाले. मास्तर पण आपला हट्ट सोडेना. म्हणून रामदासानी स्वःत ती जबाबदारी उचलली. "पीक लुटून नेले, केव्हा नेले, किती वेळा नेले" अशा कविता करणारे रामदास सध्या "मराठी मुले सी.ई.टी.

""कालचक्र""

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 22/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य एक संध्या कोमल गंधार, कुसुंबी किनार क्षितिजाला... तेजस्वी रवीची किरणे सोनेरी, लाली गालावरी संध्येच्या का !?! मुग्ध प्रियतमा संध्या ती आरक्त, का 'रवी' आसक्त 'निशे'वरी ! दुखावली 'संध्या' हळवा गंधार, का क्षितिजापार गेला सखा..... हवेत गारवा नभी चंद्र तारे, मादक इशारे निशेचेही... आसुसला 'रवी' निशेच्या छायेला, कौमुदी कायेला चंद्र साक्ष... मिठीत 'रवी'च्या 'निशा'ही उन्मुक्त, प्रकाश अव्यक्त अंधारला... मेघाचा मल्हार, कित्येक प्रहर, प्रणय कहर, आसमंत..... पहाट भैरवी तिमिर छेदून, गगन भेदून, झंकारली.

कधीच नाही

लेखक जयवी यांनी शनिवार, 22/11/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या देहात चांदणे मग फुलले कधीच नाही बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सा-या का घाव तू दिलेले भरले कधीच नाही जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

डोरियन ग्रे

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 21/11/2008 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
डोरियन ग्रे "बिग बॉस मधून एकाचे पलायन" कॅमेराच्या झगझगाटात प्रश्नांची सरबत्त्ती.. सेलेब्रिटी उभी आपल्याच धुंदीत तिथेच आशाळभूतपणे उभी असणारी झिपर्‍या केसाची, पोट खपाटीला गेलेली मुले .. कुणालाच दिसली नाहीत? नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा आणि बघण्याचा हट्ट वाढतोच आहे... एक कॅमेराचा झोत गेला की मागे उरलेल्या अंधारात अनेक जण सामावतात.... अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात निवडक काहींना कधी कळणार? कधी कळणार आम्हालाही? की ..
Taxonomy upgrade extras

सकाळचा "च्य़ा "

लेखक शितल यांनी शुक्रवार, 21/11/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
"कसला ह्यो च्या म्हणायचा?? दे वोतुन मोरीत...!!!" आबा कडाडले.. .. नवीनच लग्न होऊन आलेल्या आबांच्या सुनेचे डोळे भरून आले ... तरीही मन घट्ट करून तिने विचारलेच, "आबाजी, काय झाल जी? चहा गुळमाट झाला व्हय? पर दिसायस तरी बेस दिसतोया... " "अग बाय, दिसण्यात आणि असण्यात वाईच तरी फरक अस्तो का न्हाय?? तूच पिऊन बघ ह्यो च्या, म्हंजी समजल तुला बी...." "आता उरला नाय, व्ह्ता नव्हता त्यो समदा तुम्हासणीच दिला नव्हं...." सुनेने उत्तर दिले. " सक्काळच्या पारीचा "च्या" कसा पाइजी ठाव हाय का तुला?" आणि आबा चहाच्या वर्णात बुडाले...

माझ्यातल्या कवीला सूचना.... (माझ्या पुरत्याच इतरांनी राग मानू नये )

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 20/11/2008 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
नाद सोड यमकाचा लेका, वजन विचारा देशील का ? पुरे शब्दांची कारागिरी, अन आतुन येई ते लिहीशिल का ? मुखड्याच्या दो शब्दांची, दोरी तू ओढसी किती ? शब्दांचे भरताडच होते, भाव दाटला त्यात किती ? सुखे बैसुनी गादीवरती, कविता जन्मा येत नसे ! पांघरुन वेदनेचे जगणे, दु:खाचे लागेल उसे ! -- आपला दळण छाप लहरी सागर
Taxonomy upgrade extras

पाठीराखा (ही नवीन कविता आहे)

लेखक द्विज यांनी बुधवार, 19/11/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीराखा हे जीवन आहे नश्वर हे जगत आहे नश्वर आधार एकच असतो नाम त्याचे ईश्वर कुठे ना कुठे हा आत्मा त्यालाच मिळत असतो शून्यातून शुन्याकडची वाट चालत असतो विश्वातून परमातीताची ओळ्ख होऊन जाते त्याच्या हाकेशी दिलेली साद 'जीवन' नामे स्फुरते विवेकातूनच चैतन्य स्त्रावित होत असते मगच "अह॑ ब्रम्हास्मि " बोधाने मन प्लावित होत असते पदकमला॑मधेच त्याच्या सुख माझे उरले भौतिकतेचे तामस मनातूनी सरले आता मुक्त आत्मा परब्रम्हापाशी जाईल प्रभू माझा पाठीराखा मला घ्यावयासी येईल....
Taxonomy upgrade extras

यमकाचा खेळ

लेखक सागरलहरी यांनी बुधवार, 19/11/2008 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मुमुक्षुं सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - क्डव्याचा अपेक्षीत शेवट खालील प्रमाणे यावा ..... अशी कामना माझी नव्हती | आधीच्या ओळी काय होऊ शकतील ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. (मुमुक्षु प्रेरित) आभारा सह सागरलहरी
Taxonomy upgrade extras