मातीचेच पाय
लेखनविषय:
श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय?
जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय!
मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली
वैभवाची ऐट हंड्या-झुंबरात टांगलेली
देवाच्याच दारी होई देवाचाच निरुपाय
मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली?
सुकला स्तब्ध अश्वत्थ, इंद्रायणीही गोठली
पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय
कशी, किती जोजवावी माया ममतेची नाती?
त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती
कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय!
वाचने
2543
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सुंदर
मांगल्याच
अप्रतिम
खुपच छान
छान कविता
कमालीची सुंदर!
दिखाऊ श्रीमंत देवालये
जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय!
In reply to जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय! by मनीषा
+१
धन्यवाद.
ताई
जिथे माथा