Skip to main content

प्रकटन

कुटुंब गेले कुणीकडे?...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 28/08/2009 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकीकरणामुळे बदललेल्या विकासाच्या प्राधान्यक्रमाचा मोठा फटका महिलांनाच बसत असून, जागतिक मंदीची सर्वाधिक झळही त्यांनाच सहन करावी लागत आहे. कुटुंबाचे भविष्य निर्भर करण्याची शक्ती असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी जगाने प्रामाणिक इच्छाशक्तीने पुढे यावे, अशी साद संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने जगाला घातली आहे. जागतिकीकरणामुळे विकासाचे प्राधान्यक्रम झपाट्याने बदलत असून, कुटुंबकल्याण आणि माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मागे पडत आहे. हा प्रश्‍न हाताळण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव भविष्यात आणखी गंभीर समस्या निर्माण करू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने दिलाय.

सूड - भाग २ (कथा संपूर्ण )

लेखक सागर यांनी गुरुवार, 27/08/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार रसिक वाचकहो, माझ्या "सूड्"कथेचा दुसरा भाग देण्यास थोडा विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. पहिल्या भागाला मिळालेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मी कथानकात मूळ ढाचा न बदलता थोडेफार फेरबदल केले आहेत, ते कितपत यशस्वी झाले आहेत ते वाचकांवरच सोपवतो. माझ्या "सूड" या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग देताना आनंद होत आहे. तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाची अपेक्षा आहे.

मी पाहिलेले प्रायोगिक नाटक.

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 26/08/2009 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव ‍र्‍होअन तोंड्वळकर... मी नरवीर कोंडाजी शिरुडे विद्यालयात पाचवीत शिकतो. आमच्या शाळेला काहीजण नकोशि शाळा असे म्हणतात. ते खरेही आहे. मला नाटक पहायला फ़ार आवडते. भरत जाधव आणि प्रशांत दामले मला आवडतात. सही रे सही आणि एका लग्नाची गोष्ट मी ४ वेळा पाहिलं आहे. मला अनुभव घ्यायला फ़ार आवडतं. आणि ते लिहून काढायला.... मी एक सामान्य छोटा लेखक आहे हे मला माहित आहे पण कधीतरी तर सुरुवात करायला हवीच ना? माझे निबंध खूप छान होतात, असं सगळे म्हणतात. मी खूप वाचन करतो. सकाळ म.टा. लोकसत्ता पुढारी लोकमत संध्यानंद केसरी तरूण भारत इतके पेपर वाचतो.

घरीच गणपतीची मुर्ती केली

लेखक चिंतामणराव यांनी मंगळवार, 25/08/2009 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी आम्ही घरीच मुर्ती बनवली. माझे मित्र श्री मुकुंद जहागिरदार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला आहे. छोटासा स्लाइड शो बनवला आहे. http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=pathak333&target=ALBUM&id=5… आस्वाद घ्यावा धन्यवाद चिंतामणराव

आमचे जाधव सर

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 24/08/2009 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
"सर बॉल प्लीज"....... मी त्यांना म्हटलं. सहा फूट उंच, भरभक्कम शरीर, नेव्ही ब्ल्यू रंगाचा ट्रॅक-सूट घातलेल्या त्या चाळिशीच्या व्यक्तीला आधी कधी शाळेत बघितलं नव्हतं. दोन धारदार घारे डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. "सर..... बॉल प्लीज" "इकडे ये". त्यांचं त्या टेनिस चेंडूकडे लक्ष सुद्धा नव्हतं. मी जवळ गेल्यावर त्यांनी मला विचारलं "काय रे हिरो..... व्हॉलिबॉल खेळणार का"? हा प्रश्न अनपेक्षित होता. "व्हॉलिबॉल"? मी विचारलं. तेवढ्यात आमचे पी टी चे लिम्हण सर आले. म्हणाले. "हे जाधव सर आहेत. तुम्हाला व्हॉलिबॉल शिकवणार आहेत. आपल्या शाळेची टीम तयार करायची आहे.

आणि मा़झी जात सुटली

लेखक कालिन्दि मुधोळ्कर यांनी सोमवार, 24/08/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा: ही कथा आहे; जितकी असायची तितकी खरी आहे आणि तितकीच काल्पनिक. "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे... " ह्या संघाच्या प्रार्थनेने मला जाग येई. घराशेजाराच्या पटांगणातली कवायत एव्हाना संपलेली असे. आत्या, आजी, आई कामात गर्क असत. उठल्या उठल्या मी आमच्या तगरीच्या झाडाजवळ जाउन बसे. झाडाच्या कुण्डाजवळ मुंग्यांची रांग, मातीतली अधून-मधून दिसणारी पिवळी पानं ह्याच्याकडे मी भान हरपून पाहत असे. पटांगणातून आता प्रतिज्ञा ऐकू येई. 'जय हिंद'. मग खाड-खाड-खडाड. ब्राम्हणवस्तीमधे आमचं ऐसपैस घर होतं आणि प्रीती गोरे नावाच्या ज़रा आगाऊ, बडबड्या मुलीचं जसं असतं तसच माझं बालपण होतं.

जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/08/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, तसे आम्ही उत्सवप्रेमी. सध्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतो आहोत. गणेश हा आमचा माता, पिता, सखा, बंधू, सर्व काही..! आज भल्या पहाटे आमच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, छानशी पूजा केली, आणि मोदकांच्या प्रसादाचं जेवण यथेच्छ जेवलो... परंतु तसे आम्ही सर्वच धर्मांवर, त्यातील सणा-उत्सवांवर, खाण्यापिण्यावर मनापासून पिरेम करणारे एक हौशी रसिक! आज सायंकाळी काही कामानिमित्त मुंबैच्या मोहम्मद अली रस्त्यावर जाणं झालं आणि आम्ही त्या रस्त्यावर साजर्‍या होणार्‍या मुस्सुलमानांच्या रमझान सणात रमलो आणि तेथेच काही काळ रेगाळलो.

एक गाणे आणि शुभेच्छा

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 22/08/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. सर्व मिपाकराना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या लाडक्या मिपाला २ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. असो,तर मुळ सांगायचा मुद्दा असा की आत्ता झी टॉकीजवर आयुष्यावर बोलु काही चे पुनःप्रक्षेपण चालु आहे. आणि मगाशीच मी त्यात एक गाणे ऐकले. हे गाणे खरेतर मी काही दिवसापुर्वीच यु नळीवरुन उतरवुन घेतले आहे, व सध्या त्याचे पारायण चालु आहे,अगदी या गाण्याव लिहायचे,त्याचे रसावलोकन का रसग्रहण जे काही म्हणतात ते करायचेच असे ठरवुन मनात लेखही तयार केला होता.

मिपाचा दुसरा वर्धापन दिन....

लेखक तात्या अभ्यंकर यांनी शनिवार, 22/08/2009 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, अर्थात गणेश चतुर्थी...! लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत.. आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना.. सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा!

सूड - भाग १ (कथा )

लेखक सागर यांनी गुरुवार, 20/08/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर पहिला भाग टंकून खूप दिवस झाले होते. पण कथा पूर्ण होण्याचा योग लवकर येत नाही असे लक्षात येताच पहिला भाग वाचकांसाठी देत आहे. दुसरा आणि अंतिम भाग लवकरच देईन. नमस्कार रसिक वाचकहो, भाग २ येथे पहा संपूर्ण कथा पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी PDF येथे क्लिक करा.