प्रकटन
मी व १५० लेख !
जेव्हा मिपा चालू झाले तेव्हा पासून आजपर्यंत आपण काय काय लिहले हे पाहू हा विचार करताना दोन दिवसात मला स्वतःलाच नवल वाटले की मी मिपावर जवळ जवळ १५० च्यावर लेख / कथा /अनुभव /कविता /विडंबने /चर्चा लिहल्या.... बाप रे ! शालेय जिवनात कधीही धड बसून एक पान व्यवस्थीत लिहलेले आठवत नाही व येथे येवढे लेखन....
माझी सफरचे मी वीस भाग व बाहुबली हॉस्टेलचे दिवस चे मी सात भाग असे दोन मोठे अनुभव लेखन मी केले... मी आधी मनोगतवर हलके फुलके लिहण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या लेखामधील अशुध्द भाषा व हिंदी शब्द ह्यामुळे मला तेथे नेहमीच खडे बोल वाचावे लागत ;) पण मिपावर माझे शुध्द-अशुध्द..
तुम आ गए हो नूर आ गया है ...अर्थात्, गुलझारची पंचाहत्तरी!
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलझार आज पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा!डुक्करताप, मी अन घबराट
गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला.
"इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे.
पारतंत्र्यदिन!
(खालील लेख हा आठ दिवस सर्व मनोरंजन बंद असल्याने भोगाव्या लागलेल्या मनस्तापाचा झालेला उद्रेक आहे. त्यातून "स्वाइन फ्लू'सारख्या जीवघेण्या समस्येबाबत गांभीर्य नसल्याची भावना झाल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा!)
----
पारतंत्र्यदिन!
छ्या! वैताग आलाय नुसता!
कुठे जाणं नाही, येणं नाही. नुसतं घर एके घर नि ऑफिस एके ऑफिस.परिक्षण-गंध (छोटा डॉन स्टाईल)
अखेरीस सात तारखेला 'गंध' प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवातुन गाजल्यानंतर त्याला प्रेक्षकांपुढे यायला बराच वेळ लागला खरा, पण आता त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या का नाहीत ते येत्या काही दिवसात कळेलचं. पण, माझ्या अपेक्षा पुर्ण झाल्या की नाही ते मात्र मी लिहित आहे.कदाचित माझ्या या लिखाणातुन लोकांनाही हा चित्रपट कसा आहे ते समजेल म्हणुन हा लिखाण प्रपंच.
* पहिला प्रश्न म्हणजे 'गंध' हा चित्रपट मी का पाहिला?
- 'गंध' हे नांव अनेक फेस्टिवलमधून गाजत होतेच.
यज्ञकर्म उपहारगृह
नमस्कार.
पुण्यात सध्या स्वाईन फ्लू ने भयंकर उच्छाद मांडला आहे हे आपण सर्व जाणताच. प्रसारमाध्यमे उलट सुलट बातम्या पसरवून लोकांमध्ये घबराट पसरवत आहेत. टिव्ही वरील बातम्यांमधून स्वाईन फ्लूचे जे उग्र स्वरूप समोर येत आहे त्याने धास्तावून आम जनतेने बाहेर फिरणे, सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे बंद केले आहे. ह्याचा सर्वच व्यवसायांवर अनिष्ट परिणाम दिसू लागला आहे. ह्याचाच परिपाक म्हणून बहुतेक उपहारगृहे ओस पडलेली दिसत आहेत. यज्ञकर्म उपहारगृहही त्याला अपवाद नाही. यज्ञकर्म उपहारगृहात काम करणारा कर्मचारी वर्ग पुण्याबाहेरून आलेला आहे.
ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -२
मागील.... भाग १
त्याला ही काही समजत नव्हते काय बोलावे... त्यालाच नवल वाटत होते की त्यांने हे प्रश्न विचारलेच कसे ? जवळ जवळ दिड वर्षानंतर तीला सरळ लग्नात अडचण आहे का ? असे कसे विचारले मी .. हा विचार करुन तोच स्वतः ओशाळला.. व क्षमा मागावी हा विचार करु लागला पण तीचे उत्तर त्याला समजलेच नाही... तो आपल्या ह्दयमध्ये अचानक दर्द का झाला ह्याचा विचार करु लागला व त्या क्षणी तो हे देखील विसरला कि तो ऑफिस मध्ये आहे व काम करत आहे व फोन कानावर लावलेला आहे.. !
***********
ती.. काय बोलू ह्याच्या बरोबर... ह्याला सांगू का नको माझी अडचण ?
आणि कॉमन मॅन बोलला!
हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.
मिसळपाव