Skip to main content

प्रकटन

फ्रेश इंजिनीअर्सनी घेण्याची काळजी- तुमच्या ओळखीच्या फ्रेश इंजिनीअर्सना सांगा

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 07/08/2009 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंदीमुळे गेले २ वर्षे आयटीतील नोकऱ्यांचा तुटवडा आहे. अजुनही कित्येक आयटी इंजिनीअर्स २००८ सालापासुन नोकरीच्या शोधात आहेत. सगळ्यांनी त्यांचे अर्ज आतापावेतो जॉब पोर्टलवर दिले असतीलच. मंदीत जी एखाद-दुसरी संधी निर्माण होते ती महाराष्ट्रातील तरुणांनी गमावू नये म्हणून खालील काळजी त्यांनी जॉब पोर्टलवर व इतरत्र घ्यावी. तुमच्या ओळखीचे कोणी असे इंजिनीअर असतील तर त्यांना जरुर कळवा- email address: १. इमेल पत्त्यात चुका करु नका- gamil, redifmail, असे चुकीचे स्पेलिंग सर्रास आढळते. नावातही स्पेलींगच्या चुका होऊ शकतात त्याही तपासाव्यात. २.

शेयर मार्केट (बेसिक) भाग -१

लेखक दशानन यांनी गुरुवार, 06/08/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : - मराठी भाषे मध्ये शेयर मार्केट विषयी जास्त माहीती उपलब्ध नाही आहे ती माहीती सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न ह्या लेख मालिकेतून मी करणार आहे, ज्यांना जास्त माहीती आहे त्यांनी प्रतिसादामध्येच ती माहीती द्यावी जेणे करुन नवीन व्यक्तीला माहीतीचा उपयोग करुन घेता येईल. मी काही सर्व काही माहीती आहे व माझीच माहीती आहे ह्या आवेशामध्ये लिहीत नाही आहे जर कुठे चुकत असेल तर जाणकारांनी योग्य तो प्रकाश टाकावा ही विनंती. ह्या लेख माले साठी मी दैनिक भास्कर / टिव्ही -१८ व माझा काही वर्षाचा अनुभव ह्यांची मदत घेत आहे.

राखी : देवस्थळी ते सावंत!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 05/08/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
rakhi राखीपौर्णिमेचं लहानपणापासूनच कधीही फारसं अप्रूप नव्हतं. एकतर मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे तिच्याकडून राखी बांधून घेण्याची क्रेझ नव्हती. मामेबहिणी कधीतरी असायच्या रत्नागिरीत. तेव्हा राखीबंधनाचा सोहळा व्हायचा. पण ती राखी नैसर्गिक न वाटता, "बंधन'च वाटायचं. शेजारची स्वरूपा लहानपणापासून राखी बांधायची. आजही बांधते.

संस्कार

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 05/08/2009 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
चुकले मी परत अस कधीही करणार नाही. तुझी शप्पथ. तुला वाटत तस काहीही नाही. हव तर मार परत एकदा मला. तु सांगशिल ती शिक्षा मला मंजुर आहे. आता इतर मैत्रीणी ऐनवेळी आल्या नाहीत त्याला मी काय करु? आता ही पोर हाताशी नसती तर हीला कधीच सोडली असती. आई म्हणायच का ह्या बयेला? कसले संस्कार आयशीच्या घोवाचे. तरी सांगत होतो एवढा जाच करु नकोस. नाही दिवस राहीले पुर्वीचे. हिच्या आग्रहाकरता कन्या शाळेत घातली. आता पोर रुपाने माझ्यावर गेली त्यात तीचा काय दोष? ही तीच्या रुपावर जळते की काय? ३६ गुण मिळतात म्हणून बापाने सांगितले. लग्न केले. लग्न कसले बोडक्याचे. १७ वर्षाचा जाच झाला. प्रत्येक गोष्टीत उलटच डोक चालत. लग्न जेम

ड्यूक्‍स नोजचा धडा

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 02/08/2009 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
dukes2 खंडाळ्याच्या रेल्वे स्टेशनपासून सुरू होणारी वाट --- dukes3 वाटेतला छोटा, पण निसरडा ओहोळ ---

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

मी आणि श्रावण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 28/07/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सुरू झाली की, घराघरांतून नॉनव्हेज, अंडी, हेच नव्हे तर काही घरातून कांदा-लसूण सुद्धा हद्द्पार होते. आमच्या घरी कधी श्रावणाच अथवा चातुर्मासाचं स्तोम माजलं नसलं तरी माझी आजी मात्र श्रावण पाळायची. पाळायची म्हणजे कांदा-लसूण खायची नाही. आणि श्रावणात होणार्‍या एकेका सणाची चर्चा सुरू व्हायची. कोणा नवविवाहीतेची मंगळागौर. श्रावणातला सोमवार म्हणजे मंगळागौरीच्या आदलेदिवशी केलेली शिवलिंगाची पूजा. आणि मग उपास. घरात आजी उपास करायचीच सोमवारी तिच्यामुळे खिचडीसारखा अद्वितिय आणि अवर्णनिय पदार्थ दर सोमवारी मिळायचा खायला.