Skip to main content

प्रकटन

भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 22/09/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४ मूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट मूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती २६ जुलै २००६ रोजी एकाच दिवसात संततधार ९४४ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या काही वर्षांत कॅटरिनासारख्या वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. डिसेंबर २००६ मधे दोहा शहर अनैसर्गिकरीत्या, पावसासहित आलेल्या वादळाने पंगुवत झाले होते. गेल्या वर्षी, २००७ साली, राजस्थानच्या वाळवंटी क्षेत्रांत, जैसलमेर जिल्ह्यात हिरवळ उगवली होती.

डॉ. खान यांचे शास्त्रीय गायन कीं जगाला गुमराह करण्याचा कट?

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 21/09/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात पाकिस्तानी शास्त्रज्ञ (व पाकिस्तानच्या अणू बॉम्बचे पिताश्री) डॉ. अब्दुल कादीर खान यांचे स्वत:च्या पत्नीला लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाल्यापासून ते सध्या एकाद्या मैनेप्रमाणे गात आहेत (ज्याला आंग्लभाषेत singing like a canary असे म्हणतात)! कारण ’जब चिडियाही चुग गयी खेत’, गपा बसून काय फायदा? पण ते जे सांगत आहेत ते खरे आहे का?

स्पर्श केनियम

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 21/09/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
'स्पर्श के नियम 'ह्या पुस्तिकेचे प्रसारण करणार्‍या न्यायमुर्ती ना माझा सलाम. ओंगळवाणे आणि नको असलेले स्पर्श फक्त मुलींच्याच वाट्याला येतात हा एक मोठा गैरसमज. __________________________________________________________ साल १९७० वय १७ स॑काळची ६.१५ ची अंबरनाथ वरुन येणारी लोकल. खच्चुन भरलेली. आधी ओझरता. नंतर थोड्या दिवसांनी जवळीक साधणारा. काही दिवसांनी थेट किळसवाणा, ओकारी आणणारा. कुणाला सांगायचे. गोंधळ. मित्राला सांगायची हिंमत नाही. हे फक्त आपल्यालाच होते आहे का? कसे विचारु? माझ्यातच काही कमी आहे का? बर, प्रश्न स्वःत सोडवायची हिंमत नाही. आडदांड दिसणारा ४० वर्षाचा पुरुष डबा बदलला. पण पाठलाग सुरुच.

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

`एनर्जी' आणि `टॉनिक'!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 20/09/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली आणि काळी पट्टी डोळ्यावर बांधून साहेब सीटवर मागे रेलून बसले. बाजूलाच बसलेल्या कार्यकर्त्याने डोळ्यांनीच खूण केली आणि हेलिकॉप्टरमधल्या तीन-चार जणांनी खिडकीतून बाहेर नजर लावली. आता पुढच्या गावात पोहोचेपर्यंत साहेब आराम करणार होते. ... अर्ध्या- पाऊण तासातच खालून धूर दिसू लागला आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सभेचे गाव खाली दिसत होते. एका मैदानावर जमलेली गर्दी हळूहळू ठळक होत होती. कार्यकर्त्याने हळूच साहेबांना स्पर्श केला आणि क्षणात साहेब जागे झाले. डोळ्यावरची पट्टी बाजूला करून खाली डोकावत ते स्वतःशीच हसले. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले होते.

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ५..बुवा / स्वामी / महाराज व्हा

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 18/09/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
भडकमकर मास्तरांचे करिअर गायडन्स वर्ग अमुकतमुक बाबा/स्वामी/महाराज/मा /माता/अम्मा/ताई व्हा ------ या पूर्वीचे करिअर गायडन्स वर्गाचे धागे... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग १ ...भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ... http://www.misalpav.com/node/1425 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ... http://www.misalpav.com/node/1451 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ...

आणि मी डीझायनर झालो!

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 17/09/2009 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संस्थळाच्या ओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे! स्वतःची वेबसाईट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी संगणक आला तेव्हा साईट कशी करता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग हुडकाहुडकी सुरु झाली आणि एक साईट सापडली ,मग काय माझ्या परीक्षेसाठी बनवलेल्या फाईलमध्ये त्या साईटचे नाव दिमाखात विराजमान झाले.

७.४७

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 17/09/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
७.४७ ची दादर कल्याण लोकल. तोच ठराविक डबा. तोच नेहेमीचा ६ जणांचा ग्रुप. अर्थात मला कधी बसायला मिळाले नाही. गाडी प्लॅटफॉर्म मधे शिरता शिरता घुसायचे प्रयोग सध्या करत नाही. डब्यात शिरल्यावर डाव्या बाजुच्या ठराविक सहा आसने ह्याना दरदिवशी मिळतात. दिवसभर गांजलेले हे महापुरुष ह्या एक तासाचा रिचार्जिंग साठी उपयोग करतात. मैत्री, असुया संवाद, विसंवाद सर्व काही. कधी आवरणातले, कधी अगदी मोकळे. आजुबाजुचे काय म्हणतील ह्याची अजिबात पर्वा नाही. पत्ते खेळत नाहीत, भजन म्हणत नाहीत. सुख दु:खाच्या मोकळ्या गप्पा. सर्व जण ४५ ते ५० चे कित्येक वर्षाचे 'लोकल नाते' गेले जवळ जवळ महीनाभर दादरवरुन येताना मी हीच लोकल पकडतो. _