Skip to main content

प्रकटन

उत्तेजनार्थ!..

लेखक नीधप यांनी रविवार, 27/09/2009 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं. मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं. दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी.

आजचा दिवस... सलाम एका शहिदाला !

लेखक दशानन यांनी रविवार, 27/09/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस ! ह्या वीराला शत शत नमन ! * सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य ! ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!

'नोकरशाई' च्या निमित्ताने

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 26/09/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
नोक्रशाईचे रंग या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेले एक मुक्तचिंतन. ''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-घेवाण. थोडक्यात काय, तर लोकांना त्राही त्राही करून सोडणारी एक व्यवस्था आणि त्याचबरोबर मेंदूत अगदी नकळतपणे कुठेतरी उमटणारा 'नको रे बाबा!' चा सूर! खरे ना? सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात साधारणत: हेच चित्र उभे राहणार, आणि राहिलेच पाहिजे म्हणा!

गॅरी आणि मी

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 25/09/2009 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी राहातो ठाण्याला. तो राहतो साउथ अफ्रिकेला. सध्या जरी कोच म्हणुन भारतिय क्रिकेट बरोबर असतो. मला क्रिकेटपटु मधे स्वारस्य नाही. मी क्रिकेट फारसे बघत नाही. क्रिकेट थोडेफार कळते. वर्ल्ड कप जिंकल्यावर( २ दा) सगळ्या भारतियांप्रमाणे मला सुद्धा आनंद झाला होता. जिंकल्यावर टी.वी वर हायपर होणारे (धोनी के धुरंदर वैग्रे)आणि हरल्यावर देश पार धुळीला मिळाल्यागत अश्रुपतन करणारे टी.वी चे बातमीदार मला अस्वस्थ करतात. एकंदरीत क्रिकेट बरोबर फारसे सख्य नाही. सध्याच्या दिनचर्येत वर्तमानपत्राला स्थान नाही. संध्याकाळी वाचण्यात अर्थ नाही. टी.वी.

सत्यकथा

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी गुरुवार, 24/09/2009 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो बंगला गूढच दिसतो. खूप वर्षांपासून कुतुहल होतं की तिथं राहणारे लोक नेमके कोण असतील. साधारणपणे चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा पुण्यात आजच्यासारखा पैशाचा पूर वाहात नव्हता, आयटी हब इ काहीच नव्हते, गुंठामंत्री नव्हते. टिप्पिकल पेन्शनर आणि विद्यार्थ्यांचे गाव होते ते. त्यामुळे दर सहा महिन्यांनी नवीन कार घेऊन उंडारणारा 'त्या' बंगल्यातला फक्त पंधरा वर्षांचा मुलगा पाहून आम्ही सायकलवर दातार क्लासला जाणारे तोंडात बोट घालत असू. ज्याम हेवा वाटायचा. सालं काय नशीब आहे असं वाटायचं. त्या बंगल्यात क्वचितच वर्दळ दिसायची.

नियती....

लेखक दशानन यांनी बुधवार, 23/09/2009 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
* केव्हा पासून मी असा वेड्यासारखा पळत आहे, किती दिवस.. किती महिने.. किती वर्ष झाली.. खोल दरीतून डोंगर माथ्यापर्यंत... माथ्यावरुन खाली पायथ्यापर्यंत... रानातून.. जंगलातून.. रणरणत्या उन्हातून असाच सुसाट वेड्या सारखा पळत आहे मी.. ना थकलो.. ना हरलो. का ? कश्यासाठी... माझं गाव तर केव्हाच मागे राहिले तरी देखील मी असा हा वेड्यासारखा धावत आहे... मला ते हवे आहे ते... जे समोर उंच डोगरावर दिसत आहे... जे चमकत आहे तेच तेच ते हवे आहे मला. किती ही कष्ट करायला लागू दे मला ते हवेच आहे.. अरे हे कोण माझी वाट अडवून उभे आहे... जाउ द्या हो मला का उगाच माझी वाट अडवत आहात तुम्ही... मला ते हवे आहे...

अवतार

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 23/09/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एक वृद्धाश्रम. वृद्धाश्रम पेक्षा ३स्टार हॉटेल अथवा सॅनिटोरीयम. पैसा ठेवायला जागा नसलेल्या,अल्शेशियन,डालमेशन वगैरे साठी जागा असलेल्या, मात्र वृद्ध पालकांसाठी जागा नसलेल्या शिरीमंतानी बांधलेले. चकचकीत रिसेप्शन च्या मागे एक मोठा फोटो. निरखुन बघत होतो मी. एरवी अशा ठीकाणी मिळतात त्यापेक्षा वेगळा, मद्दड न दिसणारा मॅनेजर. माझ्या निरखण्याला रोखुन बघणारा. "काय, बघताहात हो साहेब त्या फोटोकडे, काय एवढे विषेश आहे त्यात? तुम्हाला देणगीदाराच्या तोंडावर विष्णुअवतार दिसतोय का हो? अगदी मागच्या तेजोमय चक्रासकट. मॅनेजर हसला. "सगळेच नसतात हो तसे. काही अपवाद पण असतात की.

आंतरिक शक्तीचा शोध

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 23/09/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरिक शक्तीचा शोध ७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच राहत असे. दरम्यान मला अनुत्तरित प्रश्नांचा विळखाच पडलेला होता. ते प्रश्न मी कसे सोडवले? प्रतिबंधक हृदयोपचाराचा मार्ग मला कसा गवसला? वाटेत कुठकुठल्या अडचणी आल्या?

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 23/09/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...) प्रिय ताई, माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे.