Skip to main content

प्रकटन

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

लेखक भोचक यांनी गुरुवार, 03/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.

नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 03/09/2009 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वाचक, अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला. अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले. अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत. आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे.

म्हाळसाक्का..(कथा)

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 01/09/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का!! (डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.) रखरखीत सूर्य किरणांनी चेहर्‍याची त्वचा तापवून काढली तशी भालबा ला शुद्ध आली. डोळे हलके हकले उघडत त्याने मान वर उचलायचा प्रयत्न केला.. पण त्याला तेही शक्य झालं नाही. पुन्हा तसाच तो काही वेळ पडून राहिला. मग पुन्हा थोडासा जोर देऊन, ठणकणार्‍या अंगाकडे दुर्लक्ष करून तो उठून बसला. सभोवार एक नजर टाकली. रखरखीत उन, आणि उजाड परिसर!! लांब डोंगरावर काही शेळ्या चरताना दिसत होत्या.. "काय खात असतील त्या?

लढा

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 31/08/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी. हे एकदम लक्षात आले अन विचार आला, गेल्या सत्तावन्न वर्षांत या विमुक्त आणि भटके लोकांच्या आयुष्यात कितपत फरक पडलाय? या प्रश्नाला पहिले उत्तर होते अजिबात नाही. पण विषय जसजसा डोक्यात घोळत राहिला तसतसे मी पाहिलेले अनेक भटके विमुक्त लोक डोळ्यासमोर तरळले.

गोष्ट------तेव्हांच्या गणेशोत्सवाची!

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 31/08/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट ४०-४५ वर्षांमागची.ठाणे गावाची.गाव तसे मध्यमवस्तीचे.शहर आणि गाव यांच्या सीमारेषेवर असलेले.बहुतेक माणसे एकमेकांच्या ओळखीची.अश्या त्या गावातल्या तेव्हांच्या गणेशोत्स्वाच्या आठवणी. आम्ही शाळकरी मुले गणपतिची सुट्टी लागण्यापूर्वीच आपापसात पैज मारीत असू,'यंदा आपण २१,११,५१ गणपतिंचे दर्शन घेणार !'आणि खरोखरच गणेशचतुर्थीला मोदकांच्या भरपेट जेवणानंतर आमच्यासारखी अनेक शाळकरी मुले आपापल्या मित्र-मैत्रिणींसह गटागटाने गणपतिदर्शनाला बाहेर पडत.घर ओळखीच

ती व तो - लफडा अनलिमिटेड -भाग -३

लेखक दशानन यांनी रविवार, 30/08/2009 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग.. २ हम्म्म... थोडे थोडे कळाले आहे.. तुला काय सांगायचे आहे ते... पण जरा क्लियरली सगळे पुन्हा सांगशील का मला ? ही एवड्या स्पीड मध्ये बोलते.. की काही मुद्दे कळतच नाहीत... खरं तर मला कळतं.. पण तिचा आवाज पुन्हा पुन्हा माझ्या कानावर पडू दे म्हणून मी जवळ जवळ प्रत्येक गोष्ट.. रिपीट करायला लावतो.. मी.. हे तीला कसे कळणार. मला वाटतं ती मला अजून पण मंदच समजते... व विसराळूपण.... विसराळू आहे.. पण मंद.. ह्मम्म मी नाही... आता राहिली तीची अडचण... मोठी अडचण आहे... काय करु शकतो हे बघावे लागेल.. हिला संध्याकाळी फोन करायला सांगतो..

स्पर्श - (कथा)

लेखक सागर यांनी रविवार, 30/08/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच मी शनिवारवाड्याचे रहस्य ही रहस्यकथा आणि सूड ही कथा लिहीली होती... नकारात्मक भूमिका असलेल्या नायकाच्या (खरेतर खल-नायकाच्या) सूड या कथे नंतर वाचकांना कदाचित ही वेगळ्या प्रकारची हलकीफुलकी कथा आवडेल अशी आशा आहे... ही कथा माझ्या ब्लॉगवर असल्यामुळे काही जणांनी अगोदरच वाचली असण्याची शक्यता आहे... पण मिसळपाव वर ही माझी कथा प्रथमच देताना आनंद होतो आहे.

तिखट विषय, बोथट शब्द

लेखक धनंजय यांनी शनिवार, 29/08/2009 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागे इथल्या पुस्तकांच्या जत्रेत नगरसेविका जॅकी स्मिथ यांचे नांव कवितावाचनाच्या फलकावर पाहिले, आणि कुतूहल वाटले. आमच्या या नगरसेविका गेल्याच वर्षी पुन्हा निवडून आल्या होत्या. वाटले, "वा! बाई कविता सुद्धा करतात तर." म्हणून नवकवींचे कवितावाचन ऐकायला तिथेच थांबलो. नवकवींच्या कविता वाचण्यापेक्षा त्या ऐकाव्यात. कवीला गल्लीतल्या बारीकसारीक गोष्टींबद्दल वाटणारी खरीखुरी आपुलकी छापील पानावर क्षुल्लक वाटू शकते. पण कोरड्या शब्दांत नसतो तो गहिरा भाव आवेशातून जाणवू शकतो. अशाच एकदोन कवींनी कविता म्हटल्या, मला त्या खूप आवडल्या. जॅकीबाईंची पाळी आली. सभेतली धिटाई, आत्मविश्वास हा राजकारणपटूच्या ठायी असतोच.