मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरीच गणपतीची मुर्ती केली

चिंतामणराव · · कलादालन
या वेळी आम्ही घरीच मुर्ती बनवली. माझे मित्र श्री मुकुंद जहागिरदार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला आहे. छोटासा स्लाइड शो बनवला आहे. http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=pathak333&target=ALBUM&id=5373460967945285361&authkey=Gv1sRgCK3O7MrD8pS4kgE&feat=email आस्वाद घ्यावा धन्यवाद चिंतामणराव
लेखनविषय:

वाचने 7916 वाचनखूण प्रतिक्रिया 28

बिपिन कार्यकर्ते 25/08/2009 - 11:08
प्रयत्न खूपच दाद घेऊन गेला. स्वतःच मूर्ति बनवायची अभिनव कल्पना. आणि जमलीये पण छान. डोळेही खूपच जमले आहेत. सगळ्यात जास्त तेच मह्त्वाचे असतात गणपतीची मूर्ति घडवताना. अवांतर: प्रसिद्ध गायक सुदेश भोसलेचे वडिल गणपतीच्या मूर्ति बनवायचा व्यवसाय करायचे. आणि सुदेशची मास्टरी गणपतीचे डोळे रंगवायची होती. तो फक्त तेच काम करत असे. बिपिन कार्यकर्ते

नंदन 25/08/2009 - 11:09
व्हिडिओ. मूर्तीला असं टप्प्याटप्प्याने 'मूर्त' रूप येताना पहायला छान वाटलं. फारा वर्षांनी कॅमलचे बॉटल्ड रंग आणि फुलपाखराच्या आकारातली ती डिश पाहून शाळेतला चित्रकलेचा तास आठवला :). 'निजरूप दाखवा हो' हे पार्श्वभूमीवर वाजणारं गाणं आणि छायाचित्रं यांचा कल्पक वापरही सुरेखच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रमोद देव 25/08/2009 - 11:10
चांगला वाटला उपक्रम. माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे

छोटा डॉन 25/08/2009 - 11:10
मस्तच आहे स्वतः मुर्ती बनवण्याची संकल्पना. आपल्या प्रयत्नांना आणि कष्टांना तसेच उत्साहाला दाद देतो, फारच सुरेख झाले आहे ... ------ छोटा डॉन

आशिष सुर्वे 25/08/2009 - 11:35
'चिंतामणराव', सर्वप्रथम आपले अभिनंदन! आपला हा प्रयत्न फार प्रशंसनीय आहेच आणि मुख्य म्हणजे 'पर्यावरणाच्या हिता'चाही आहे. प्रसन्न वाटले! छायाचित्रांबद्द्ल धन्यवाद. - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

विशाल कुलकर्णी 25/08/2009 - 11:42
आपले मनःपुर्वक अभिनंदन! चांगला प्रयत्न आणि योग्य सुरुवात ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दिपाली पाटिल 25/08/2009 - 11:59
सुरेख गणपती बनवलाय... दिपाली :)

मुक्ता 25/08/2009 - 12:08
तुमच कराव तेवढ कौतुक कमीच..डोळे खूपच छान जमले आहेत. सगळ्यात जास्त तेच मह्त्वाचे असतात जीवन्त वाटताहेत अग्दी. ../मुक्ता

In reply to by मुक्ता

अनामिक 25/08/2009 - 17:16
हेच म्हणतो. तुमचे आणि तुमच्या कुटूंबाचे अभिनंदन. गणपती बाप्पा.... मोरया! -अनामिक

स्वाती दिनेश 25/08/2009 - 14:51
पाहताना खूप छान वाटले. पार्श्वभूमीवर वाजणारे निजरुप दाखवा हो.. अगदी चपखल. स्वाती

दिपक 25/08/2009 - 15:03
कौतुकास्पद प्रयत्न. मुर्ती अगदी सुंदर तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला. :)

परिकथेतील राजकुमार 25/08/2009 - 16:53
अतिशय सुरेख :) !! गणपती बाप्पा मोरया !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

विसोबा खेचर 25/08/2009 - 17:41
सुंदर मूर्ती..! आपल्या सर्वांच्या कलाकारीचे कौतुक वाटले... एक खटकलेली गोष्ट - ध्वनिचित्रफितीत बाबुजींच्या आवाजातले मूळ गाणे ऐकायला मिळायला हवे होते..! तात्या.

स्वाती२ 25/08/2009 - 17:54
सुरेख गणपती. स्लाईड शोही छान!

मीनल 25/08/2009 - 18:03
स्लाईड शो उत्तम. खूप छान आहे मूर्ती. आपणा सर्व कुटुंबाच्या उत्साह वाखाणण्याजोगा आहे. योग्य मार्गदर्शक मिळाला हे ही आपले भाग्य. मस्तच आहे बाप्पा. मीनल.

लिखाळ 25/08/2009 - 18:16
वा ! मूर्ती छान केली आहेत. अभिनंदन. घरी मूर्ती करुन ती पुजण्याचा आनंद और असतो :) मूर्ती खरेच फार सुंदर, प्रमाणबद्ध आणि प्रसन्न झाली आहे. -- लिखाळ. 'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)

विकास 25/08/2009 - 18:21
मुर्ती फारच सुंदर बनवली आहे. मातीची आहे का कसली? हे कळले तर आवडेल. (उत्सुकतेपोटी).

रेवती 25/08/2009 - 18:59
इतकी सुंदर मूर्ती बनवल्याबद्दल आपले व आपल्या कुटुंबीयांचे अभिनंदन! स्लाईडशोमध्ये गणपतीच्या मस्तकावर ठेवलेले जास्वंदीचे फूल हे फेट्यासारखे वाटले. फारच सुंदर मूर्ती! रेवती

प्राजु 25/08/2009 - 19:38
सुरेख!! माझे सासरे त्यांच्या लहानपणापासून घरीच गणपतीची मूर्ती बनवतात दरवर्षी. त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना होते चतुर्थीला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 25/08/2009 - 21:42
चिंतामणराव गजाननाची मुर्ती घडवण्याची ही आपली कला फार आवडली... :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

sujay 26/08/2009 - 03:30
अतिशय बोलके डोळे असलेली सुरेख व सुबक मुर्ती ! अभिनंदन!

चित्रादेव 26/08/2009 - 05:11
सुंदर बनवलीय मुर्ती. घरी मुर्ती बनवणे हाच एक वेगळा आनंद आहे.

चिंतामणराव 28/08/2009 - 11:54
सर्व प्रतिसादांबद्दल मनापासुन धन्यवाद. डोळे माझी मुलगी नंदिनी हिने रंगविले आहेत. मुर्ती शाडुच्या मातीची होती, कालच विसर्जन केले. धन्यवाद