Skip to main content

प्रकटन

माहितीचा अधिकार चार वर्षे वयाचा होतोय

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 04/10/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १२ ऑक्टोबरला माहितीच्या अधिकाराबाबतच्या कायद्याला चार वर्षे पुर्ण होत आहेत. भारतातील जनसामान्यांना हवी असलेली आवश्यक ती माहीती सहजपणे मिळण्याच्या अधिकार असावा व त्यायोगे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी अण्णा हजारे व अन्य काही समाजसेवक, नेते, विचारवंत, पत्रकार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून हा क्रांतिकारक कायदा २००५ साली अस्तित्वात आला.

आम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहोत

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 01/10/2009 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
" मिपा"वरील सभासद मित्रांनो, हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो. एक-एक करत खूप जणांनी खूप आस्थेने माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षित असल्याबद्दलची चौकशी केली व त्याने मी भारवून गेलो आहे. प्रत्येकाला आतापर्यंत वैयक्तिक उत्तरेही पाठविली, पण शेवटी असं जाहीररीत्या कळवायचं ठरविलं! हा धरणीकंप सुमात्रा बेटाच्या पश्चिमेला "पाडांग"जवळ झाला. रिश्टर स्केलवर ७.९ म्हणजे चांगलाच मोठा होता. जीवित-वित्तहानी खूपच झालेली दिसतेय.

मार्केट १७००० च्यावर

लेखक दशानन यांनी बुधवार, 30/09/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केट १७००० च्यावर गेले.... अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली... मज्जा आली ! आता काही प्रश्न ! ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ? ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ? जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी मार्केट वर आलेच ना ? भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे....

आत्माराम की जय

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 30/09/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंड्ळी, हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्‍या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही..

विचलित

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 28/09/2009 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसा तो एकदम 'बेस्ट' पोरगा, निदान आमच्या गँगमधल्या सगळया जणी आणि हो, जणसुध्दा त्याला तसंच म्हणतात. काय नाही आहे त्याच्याकडे? पैसा, रूप, चारित्र्य आणि आनंदी स्वभाव, कष्ट करायला त्याला आवडते. आणि, त्या कष्टाचं चीज झाल्यावर चीज पिझझा खात तो एखाद्या मॉलमध्ये मजादेखील करतो. थोडक्यात '' ए सो कूल यंग मॅन!'' हा, पण आजकाल त्याच थोडं बिनसलय, मला एकटयाला त्याचे कारण माहित आहे. मलाच का माहित बरे? असो, त्याने मला नाही सांगितलेले पण त्याच्या वागण्यातुन सारं पाण्यासारखे स्वच्छ दिसतयं. मग हातच्या कंकणाला आरसा कशाला? खरं तर, हा मॉर्डर्न पोरगा!

दशावतार

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 28/09/2009 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले. सूरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अ‍ॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो.

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 27/09/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपावकरांनो! . ३ ऑक्टोंबर २००९ रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. त्यानिमित्त सगळयांना हार्दिक शुभेच्छा! . Kojagiri-50

बदल

लेखक प्रभो यांनी रविवार, 27/09/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच घरी आलो दसर्‍यासाठी.