Skip to main content

प्रकटन

तहान

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन काल आम्हीही पाठवला मुद्दाम तयार केलेला एक मेघ प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता. काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर? आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच! व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ. आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल. त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे, बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे. तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा, तो तुला काय कामाचा? आम्ही तो घेऊन दुषीत करा

एका तळ्याची गोष्ट

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 10/10/2009 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
किती तपं लोटली या गोष्टीला! एक सुरेखसं तळं होतं. शांत, नितळ, स्वच्छ निळंशार पाणी. काठावरची हिरवीगार उंच उंच झाडं वाकून प्रतिबिंब पहायची त्यात. आभाळही आपली निळाई शोधायचं त्या तरल पाण्यात. चिमणी पाखरं जाता येता हळूच आपल्या इवल्याशा चोचीत इतकासा थेंब वेचून हलकेसे तरंग उठवून जात. सूर्याचे किरण सकाळ-संध्याकाळी त्या पाण्यात सोन्याच्या राशी ओतत असत. तळं खूप आनंदात होतं. अचानक सगळं चित्र बदललं. कोणा एकानं गंमत म्हणून तळ्यात एक खडा टाकला. तळ्याचा थरकाप झाला. नितळ पाण्यावर कितीतरी तरंग उठले. त्या एकाला अजूनच गंमत वाटली. त्यानं आणखी एक खडा टाकला. तरंग उठतच राहिले. आता हा एक नवा खेळच झाला!

गीतार्थ बोधिनीचे लेखक कोण?

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 09/10/2009 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
गीतार्थ बोधिनी नावाचा एक खूप जुना ग्रंथ नुकताच पाहण्यात आला. पहिली काही पाने फाटलेली असल्याने लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष ही माहिती उपलब्ध नाही. गीतेचा मूळ श्लोक, समश्लोक, आर्या, दोहा, ओवी, अभंग (मूळ श्लोकाच्या आशयाची) असे या ग्रंथाचे स्वरुप आहे. अध्यायांच्या सुरवातीला वामनकृत असा उल्लेख आहे. ही रचना वामन पंडितांची असावी या समजुतीने खापरे.ऑर्ग वर शोध घेतला. तिथे वामन पंडितांच्या साहित्यकृतीत या पुस्तकाचा उल्लेख नाही. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या साईटवर त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांच्या यादीत या नावाचे एक पुस्तक आहे पण लेखकाचा उल्लेख नाही. याबद्दल कुणी अचूक माहिती देऊ शकेल काय?

सकाळच्या वेब एडिशनवर माझा लेख (सुधारित आवृत्ती)

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 08/10/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खान यांच्या पत्र प्रसिद्धी मागचे कारण काय? (माझ्या आधीच्या लेखाची सुधारित आवृत्ती आज दै.’’सकाळ’न’’आपल्या वेब एडिशनवर अपलोड केलेली आहे) दुवा: http://beta.esakal.com/2009/10/08121050/pailteer-dr-abdul-qadeer-khan.h… (आपली मते थेट सकाळच्या वेबसाईटवर खाली दिलेल्या चौकटीतच चढवावी ही विनंती.) २००३ साली आपली डच पत्नी हेनीला लिहिलेल्या पत्राचा मजकूर ब्रिटिश पत्रकार सायमन हेंडरसन यांच्या हातात २००७ साली आला, पण त्या पत्रातील मजकुरावर त्यांनी लेख लिहिला जवळ-जवळ दोन वर्षांनी!

मुंडण

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 08/10/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंडण-१.५ कार्यालय सुरु केल्यानंतरचा दुसरा दिवस. आय्.सी.एस्.सी च्या पालकसभेचे आमंत्रण आले. ५,६ ७ ऑक्टोबर संध्याकाळी ५ ते ९ मधे रोज ३ सभा. ब्लेझर, टाय ची विनंती पुढे आली. गाडी पण येणार होती घ्यायला. खरे तर शंका तेंव्हाच यायला हवी होती. सेंसर्स चा 'ऑफ डे' होता. मी नेहमी असतो तसाच येइन.

झनझनीत मीसल

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 07/10/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका हाँटेलाच्या बाहेर झनझनीत मीसल मीलेळ अशी पा्टी लावलेली होती.भाषा विशारदनांही विचार करायला लावेल अशी ही पाटी .पाटी वाचल्यावरच त्यातील झणझणीतपणा जाणवतो.एका ठिकाणी गावढी चीकण मीलेल अशी अस्सल मराठीतील पाटी वाचली आणि शाळेत गुरुजी शुध्दलेखनाच्या चार ओळी लिहा असे घसा ओकलून का सांगायचे ते कळले.अनेक हाँटेलात मेदूवडयाचे मेंदूवडा असे नामकरण कधीच झाले आहे.असे लज्जतदार मेदूवडे नाहितर गावठी चिकन आपल्याही वाट्याला आले असेलचकी मग होऊन जाऊदे झनझनीत मीसल लिहा तु

गीर्वाणवाणी आणि भाषा इंडोनेशिया (आज अनेक नवीन शब्द घातले आहेत)

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 07/10/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनेक नवीन शब्द घालून हा लेख मी मुळाक्षरांनुसार पुनर्रचित करून (in alphabetical order) पुन्हा लिहिला आहे. जे नवीन शब्द आहेत ते ठळक अक्षरात आहेत. वाचा तर..... -------------------------------------------------- मी जेंव्हा इंडोनेशियाला आलो तेंव्हां येथील एकंदरीत संस्कृतीवरील हिंदु धर्माची छाप व यांच्या भाषेतली संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल पाहून थक्क झालो.

बंधारा

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 07/10/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
फॅन च्या पुलीला लावलेल्या फ्लो मिटर वरचे रीडींग पाहिल्यावर त्याने सुस्कारा सोडला. चाळीस अंश तापमानाची वेधशाळेने शक्यता वर्तवली होती. मे महीन्यात .२९ डेन्सीटीने फार्मिंग ही आत्महत्या आहे हे माहीत असुन सुद्धा ८००० स्क्वेअर फुटात सुमारे २५००० पिल्ले घेण्याचा धोका पत्करला होता त्याने.