'उ'कारावर चंद्रानुस्वार कसा काढायचा?
उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना.
म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे
बर्याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले.
मिसळपाव