माझ्या समोर बसलेली ती (लोकल गोष्टी-४)
माझ्या समोर बसलेली ती
=============================================
तारीख, वार, वेळ.. काही काही आठवत नाही आहे,आठवती आहे.. ती, फक्त ती..
माझ्या समोर बसलेली ती;
मी पार्लं की सांताक्रुझ या पैकी कोणत्या तरी स्टेशनवर लोकलमध्ये चढले, ती माझ्या आधीच लोकल मध्ये बसलेली होती. लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती.. नाही..! गर्दी नव्हतीच. मला बसायला विंडो सीट मिळाली. ती वाऱ्याच्या दिशेस असलेल्या सिट वर बसलेली होती, खिडकीजवळची जागा रिकामी असून तिथे न बसता थोडंसं अंतर सोडून.. दुसऱ्या कोणाला ही तिथे बसता येऊ नये अशी. तशी मी सहसा बसायला जात नाही, दारा जवळच उभी राहते.. त्या दिवशी थोडा थकवा जाणवत होता..
मिसळपाव