आज हापिसातुन घरी आलो, लॅपटॉप सुरु केला तोच त्यातुन अलादीनच्या दिव्याप्रमणे धुर निघाला आणी त्यातुइन एक आकृती तयार झाली. आकृती म्हणाली कसं काय?
मी विचारलं कोण तु? आकृती म्हणाली अरे मी तुझा आयडी, आंतरजालावरचा.
मी : - अरे मग असा कंप्युटर मधुन बाहेर का आलास?
आयडी: - आलो तुझ्याशी गप्पा मारायला.
मी: - काय बोलायचय बोल.
आयडी :- काही नाही यार. आजकाल आंतरजालाचा कंटाळा येतो. रोज उठुन तेच काम, इथे तिथे लोळ, तिथे प्रतिसाद दे, काहीतरी लिही, काहीतरी वाच, कधी उगाच फार विचार कर, धाग्यांचा गुंता सोडवत बस, विषय आणी प्रतिसाद नीट समजुन घ्यायला ईतिहासाचा अभ्यास कर.
मी:- मला एक गोष्ट सांग, कितीही झालं तरी तु आंतरजाल सोडु शकतोस का? एखाद्या नशेसारखं आहे ते, एकदा चटक लागली की बास, शरीरातलं निकोटीन कमी झालम की जशी सिगारेटची तलफ लागते तसं थोड्या थोड्या वेळाने काहीतरी लिहायला, प्रतिसाद द्यायला हात सळसळतात.
आयडी :- खरयं तु म्हणतोयस ते. धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय असं झालयं.
मी :-बर ते जाऊ दे. मला एक सांग तु जे काही लिहितो, वाचतो, गहन चर्चा करतो, टवाळक्या करतो त्यात कितपत फायदा होतो तुझा?
आयडी :- मग. फायदा तर नक्कीच होतो. मला नविन गोष्टी कळतात, कधी दोन घटका मनमोकळं हसायला मिळतं, कधी भांडायला मिळतं, तर कधी स्वतःचे अडकलेले प्रश्न सोडवायला मदत होते.
मी :- आणी सामाजिक किंवा राज्याचे/देशाचे प्रश्न किती सुटतात.
आयडी :- हे बघ. इथे काही सर्वज्ञान असलेले खुप मोठे आणी विचारवंत लोकंही येतात. खुपशा गहन चर्चा करतात. आता त्यातले कितीजण कृती करतात मला माहित नाही ब्वॉ. मी वाचतो, लिहितो आणी पुढे चालतो, प्रत्यक्षात मी किती कृती करतो ते मलाही माहित नाही. आणी इथे प्रत्येक मुखवट्याची एकदा एक ओळख झाली की ती कधी बदलत नाही, काहीही झालं तरी. त्यामुळे काही लोक सारखे मुखवटे बदलतात. काही मुखवटे आपल्यासारखे मुखवटे असलेल्यांनाच भेटायला येतात तर काही एकमेकांचे मुखवटे खेचायला बघतात.
मी :- असो, तु कधी कधी टवाळक्या करतोस, मुद्दाम तिरकस प्रतिसाद देतोस, भांडतोस, त्यातुन कुणी चांगला किंवा मोठा व्यक्ती दुखावला गेला तर?
आयडी :-अरे? इथे सर्वच सारखे असतात, कोण त्याच्या आयुष्यात किती मोठा आहे याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी जमेल तेवढं पाय खेचणार, मुद्दाम भांडणार. त्याला जमत असेल तर थांबाव नाहीतर जावं फाट्यावर. आणी मी म्हणजे कोण रे, तुझ्याच मनाचा एक कप्पा, जो प्रत्यक्षात कुणी पाहु शकत नाही किंवा तु प्रत्यक्षात उघडतच नाहीस. इथे तु मला मुखवटा म्हणुन वापरतोस, तोतया राहतोस म्हणुन मी काहीही लिहायला कसाही वागायला तयार होतो. जेव्हा तु अशाच मुखवटे काढलेल्या लोकांना भेटायला जातोस तेव्हा मला कधी नेतोस का? मला त्या कप्प्यात पुन्हा कोंडुन ठेवतोस ना.
मी: - पण तु तरी मला कुठे सुखाने लोकांना भेटु देतोस? त्यांना भेटताना आतुन डिवचतोसच ना - हाच तो त्या मुखवट्यामागचा माणुस. परसेप्शन आणतोच ना.
आयडी :- कधी कधी असं होणारच ना. तिथे तुझी ओळख ही माझ्यामुळे आहे. कितीही प्रयत्न केलास तरी माझा उल्लेख तिथे येणारच.
मी :- सोड ते सगळं, मला सर्व गुण्यागोविंदाने रहावे आणी कटुता कधी येऊ नये असेच वाटते. सगळे आपलेच लोकं आहेत.
आयडी :- पण मी असं होऊच देणार नाही मुळी. हा हा हा. माझ्या मुडनुसार मी कधी मत्त, कधी टीकाकार, कधी कंपुबाज, कधी टवाळखोर, कधी भांडकुदळ तर कधी वैचारीक हा वागणारच. तु कसं वागायचं हे तु ठरव. तुम्हा माणसांची जातच अशी आहे मी तरी काय करु.
तुझ्यासाठी ही वर्च्युअल रिअॅलिटी आहे की रिअल वर्चुअॅलिटी आहे तुझं तुच ठरव. मी चाल्लो.
एवढं बोलुन आकृती पुन्हा कंप्युटरात विरघळुन गेली.
याद्या
4037
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
ममो
नाईल, हा
In reply to ममो by Nile
बाब्बौ!
In reply to नाईल, हा by मराठमोळा
आत्मशोध
In reply to ममो by Nile
अरेच्चा,
वेलकम टु द
In reply to अरेच्चा, by पुष्करिणी
हा हा हा
In reply to वेलकम टु द by Nile
मस्त
तेच
In reply to मस्त by आमोद शिंदे
आयडी हे
हेच
In reply to आयडी हे by विजुभाऊ
मला एका
In reply to हेच by अवलिया
काय
In reply to मला एका by विजुभाऊ
मला एका
In reply to मला एका by विजुभाऊ
....पटल..
अनुस्वार कसा छापायचा
In reply to ....पटल.. by जाई अस्सल कोल्हापुरी
ममो, छान
काय चालाय
कल्पनाविल
छान