Skip to main content

प्रकटन

स्वातंत्र्यवीर सावरकरः ऐतिहासिक उडीची शताब्दी

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 08/07/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मार्सेलिस बंदरामध्ये ७ जुलै १९१० ह्या रात्री मोरया बोट थांबली आणि ८ जुलै १९१० रोजी सकाळी स्वातंत्रवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोल मधून भर समुद्रात उडी मारली व पोहत मार्सेलिस बंदराला लागले. ह्या जगभर गाजलेल्या ऐतिहासिक पराक्रमाची आज शताब्दी आहे. त्यानिमित्त ह्या थोर स्वातंत्रवीराला मिपापरिवारातर्फे विनम्र आदरांजली.

Caricature:Johny Lever

लेखक jagdish bhawsar यांनी गुरुवार, 08/07/2010 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
हे चित्र काढले आहे लवकरच प्रदर्शीत होत असलेल्या हिन्दी चित्रपट गोलमाल ३ साठी. चित्रपटाच्या मागनीनुसार आर्ट director नरेन्द्र राहुरीकर यांनी सांगीतल्या प्रमाने johny lever चा लुक मी तैयार केला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल .!!! प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत .....

प्रवास

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 07/07/2010 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, रोजचा ऑफिसला येण्याजाण्याचा सोडला तर सर्वांना आवडतो तो म्हणजे प्रवास. लहानगं मुल सुद्धा भुर्र जायचं म्हंटल की आनंदाने उड्या मारायला लागतं. मग हा प्रवास कोणत्याही कारणाने केलेला का असेना, लग्नकार्य, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, सहल, किंवा कामानिमित्त केलेला प्रवास. प्रवासात बरोबर ४ जण असले तर मग विचारायलाच नको, नुसती धमाल, मग बरोबर घरची मंडळी असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो. कधी कधी एकट्याने सुद्धा प्रवास करावा लागतो आणी माझ्या मते यावेळेत झोपेची वेळ सोडली तर उरलेल्या वेळात आपल्याला विचार करायला खुप सारे विषय मिळतात.

ससा, सुसर आणि ससाणा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.

बंद!

लेखक तिमा यांनी सोमवार, 05/07/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
बंद जाहीर झाला होता. पण नेहेमीसारखा तुमच्या आमच्या आयुष्यातला नव्हे. तर राडेसेनेच्या एका पदाधिकाराच्या घरांत जाहीर झाला होता. आपण त्याला शाप्र म्हणुया. बायकोने, मुलांनी एकमुखाने मिळून हा बंद जाहीर केला होता. कारण होते, त्याची वागणुक! म्हणजे घरातली आणि थोडीफार बाहेरची. ऐकल्यावर पहिल्यांदा तर त्याने सातमजली हंसून घेतले. पण मुले व बायको अजिबात हसत नाहीयेत हे लक्षांत येताच तो गुर्मीने ओरडला,' अरे जारे, काय करता बघतोच मी पण! शाप्र मोठ्या मेहनतीने या स्थानावर पोचला होता. अनेक लोकांचे पत्ते काटून त्याने 'वरची' मर्जी संपादन केली होती.

पावनखिंडीतली लढाई - ३५०वा स्मृतीदिन - २७ जुलै २०१०

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 04/07/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी ही माहिती कळली. ती इथे प्रसिद्ध करायची विनंती झाली म्हणून हे प्रकाशित करत आहे. *** नमस्कार, येत्या २७ जुलैला पावनखिंडीतील रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड असे पालखी घेऊन पदभ्रमण करायचे ठरविले आहे. आपल्या सहकार्यानेच हा ३५० वर्षांपूर्वींचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. ह्या मोहिमेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करूया. सानथोर सर्व शिवप्रेमी ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी.

ह्याला बोलतात निळे डोळे!

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 03/07/2010 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही महीन्यांपुर्वी 'एका' जागी गेलो होतो,पहील तिकडे सारख जाण असायच्,आता नाही.तेव्हा मित्रांबरोबर बसलेलो असताना हे मांजराच पिल्लु सारख पायाशी यायच् व कपड्यांना दातात पकडुन मांडीवर येउन बसायच.मी थोडावेळ गोंजारल की लाडात येउन तिथेच झोपायच्. :) .मी वैतागुन त्याला जोरात उचलायचो व दुस-या मित्राकडे द्यायचो तर ते परत माझ्याकडेच यायच.मित्राने बिस्कीट दाखवल तर माझ्यापाशी बसुन तोंड पोहचेल एवढच तोंड वर करायच व दुर पकडल तर ते घेण्यासाठी पुढे सरायच नाही.तेच बिस्कीट मी पकडल की ते तोंडात पकडायला माझ्या मागेही यायच!!

विष्णुगुप्त २

लेखक पुष्कर यांनी गुरुवार, 01/07/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त-१) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता.

अंदाज अपना अपना

लेखक टारझन यांनी बुधवार, 30/06/2010 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , शिर्षक वाचुन एकदम अमिर-सलमान-परेश रावल समोर उभे राहिले की नाही ? अगदी !! ज्याला "अंदाज अपना अपना" आवडला नाही असा एकंही जण मला भेटलेला नाही. आज पर्यंत ६० वेळा तरी हा पिक्चर पाहिला असेल. नंतर तर काऊंटिंग विसरलो.
मी लै लहाण असतांना माझ्या मावशीच्या घरी पहिल्यांदा हा पिक्चर पाहिला होता. तेंव्हा केबल म्हणजे "वा वा !! केबल आहे का घरी !! वावावा !! " असला प्रकार होता.