Skip to main content

प्रकटन

ही नाती कोणती?

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 27/07/2010 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ काकी, लवकर जेवायला वाढा, पुन्हा पळायचय." - माझं नेहमीच ओरडणं. "अरे ह्या पोळ्या लाटण्यार्‍या बाया लवकर येतच नाहीत. मी तरी काय करु" काकीच ठरलेलं उत्तर. "मला तुम्ही केलेल्या पोळ्याच आवडतात, अगदी मऊसुत असतात, ह्या बाया नुसत्या कळकट, जळालेल्या कडक पोळ्या करतात" - मी "थांब, मीच तुला गरमागरम पोळ्या करुन देते बघ फटकन." काकी "अहो कॉलेज फक्त अर्धा तासच सुटी देत जेवण्यासाठी, त्यात अर्धा किमी पळत यायचं, कसबसं गिळायचं आणी पुन्हा कॉलेजात जायचं, कसं करणार सांगा बरं?" - मी. अगदी आईवर हक्क गाजवावा तसा आम्ही या आमच्या मेसवाल्या काकीवर गाजवायचो. तरी ही काकी आमच्यावर कधी रागावली नाही की चिडली नाही.

आमच्यावेळी नव्हती असली थेरं!

लेखक रेवती यांनी सोमवार, 26/07/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, काय गं झालं? ही का रडतीये?" हा प्रश्न माझ्या आईनं तिच्या आईला केला होता. सुट्टीत मामा मामींकडे गेलं की आजीच्या तक्रारी सुरु होत असत. तिचं आपलं ठरलेलं वाक्य,"आमच्या वेळी नव्हती बाई असली थेरं!" प्रसंग म्हटला तर साधासाच होता. दर रविवारी मला आणि मामेबहिणींना न्हाऊ माखू घालण्याचा तिचा हट्ट असे. भल्या सकाळी आमच्या सुपीक डोक्यांना कोमट तेल लावून ठेवायची, मग तिच्याकडे असलेल्या पितळ्याच्या तपेलीत घरी तयार केलेली शिकेकाई भिजवून उकळून त्याचं चोथा पाणी वेगळं करायची. शिकेकाईही साधीसुधी नसायची. त्यात संत्र्याच्या वाळवलेल्या साली, रिठे आणि काय काय बरेच जिन्नस असायचे.

पाऊस एक रा* आहे. :)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी सोमवार, 26/07/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला पाऊस खूप आवडतो. :) (चला शाळेतल्या निबंधासारखी सुरुवात झाली). पूर्वी पुण्यात जेव्हा वाड्यात रहायचो तेव्हा पावसाळ्यात १-२ कौले फुटली असतील तर तिथून पाणी गळायचे. तेव्हा आई त्या खाली बादली लावून ठेवायची. तेव्हाच्या वाड्यांमधे कॉर्पोरेशनचे पाणि दिवसातून २ दा २ तास येत असे. त्यामुळे त्यावेळात दिवसभराचे वापरायचे पाणी भरून ठेवायला लागायचे. तेव्हा पावसाळ्यात अशा साठवलेल्या पाण्यामुळे पाण्याची ऐश असायची. एखाद्या ठिकाणी कौल थोडंच फुटलं असेल तर तिथे त्याखाली फरशीवर नुसतं फरशीपुसणं टाकून ठेवायची. मी मस्त वाड्याच्या गॅलरीत (किंवा सज्जात) उभाराहून कौलावर तडाडणारा पाऊस ऐकत उभा रहायचो.

संस्कार देणारी बोटे

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 26/07/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल गुरु पौर्णिमा ..मात्र काल मिपा बंद असल्याने हा लेख प्रकाशित करु शकलो नाही .. तो आज प्रकाशित करत आहे . मिपाच नव रुप अत्यंत सुंदर आहे . या नव्या रुपात हा लेख लिहायला मिळत आहे ही भाग्याची गोष्ट आहे .म्हणुनच प्रचंड कष्ट करुन हे सर्व उभे करणार्‍या मिपा नवनिर्माण समितीला हा लेख अर्पण ..- विनायक गुरु पौर्णिमा आली .. ती सालाबादप्रमाणे येते .. आणि मग मीही नियमितपणे पेपरमधले लेख वाचतो … शिक्षकाना नमस्कार करतो ..विचार करतो .. ही एक नियमित प्रोसेस आहे आणि ती मला आवडते .

या मुल्कात हे काय चालू आहे?

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 26/07/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखातील मजकूर हा आक्षेपार्ह असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केल्यवरून मजकूर अप्रकाशित करण्यात येत आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी - संपादक मंडळ नितिन थत्ते यांचे स्पष्टीकरण माझ्या जालीय आयुष्यात मी कुणाची बदनामी केली नाही. जे वाक्य आक्षेपार्ह वाटले तेथेही * चिह्न देऊन तळटीप लिहिली होती. (*शत्रूबाबत असेच म्हणायचे असते अशी पद्धत त्याहीकाळी होती).

आजोळ

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 26/07/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली. रत्ना, केतकीच्या आईची दूरच्या नात्यातली बहीण. आठ बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली सगळ्यांत धाकटी. बालपण असं तिला लाभलंच नाही.

आज गुरुपोर्णिमा....

लेखक डावखुरा यांनी रविवार, 25/07/2010 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा : गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नम: ॥ हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो, अति उच्चतम जिवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे, अपने लिये, हम को सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशिष दे, जो सोचनेका फर्ज है ll हम हो पुजारी तत्व के,गुरुदेव के आदेशके सच प्रेम के नित नेम के , सद्धर्म के , सत्कर्म केहो चिढ झुठी शहकी, अन्यायकी अभिमानकी,सेवा कर्म को दासी की, परवाह नही हो जानक

असा कसा रे तू मर्द गडी..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या रविवारी भिमाशंकरला फिरायला म्हणून जाताना एका छोट्याश्या गावात द्रुष्टीला पडलेल्या एका फलकावरील ही चारोळी... बहूदा हे गाव निर्मलग्राम योजनेत सहभागी असावं... "असा कसा रे तू मर्द गडी.. फिरायला ५० हजाराची गाडी.. बायकोला २ हजारची साडी.. राहायला २ मजली माडी.. तरी बायका-पोरांना हगणदारीत धाडी.. असा कसा रे तू मर्द गडी, शौच्यालय बांध ताबड्तोब घरी.. नाहीतर मिशि कापून ये मागल्या दारी.." =))