Skip to main content

प्रकटन

काला कोट चोर....

लेखक नेत्रेश यांनी शनिवार, 31/07/2010 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती ताईंच्या लोकलच्या गोष्टी वाचुन काही वर्षांपुर्वीची गोष्ट आठवली.. उन्हाळयाचे दिवस होते. मी आणी माझा एक मित्र स्लो ट्रेन ने ठाण्याहुन दादरला जात होतो. दुपारची वेळ होती. डब्यात बर्यापैकी गर्दी होती. बसायला जागा नसल्यामुळे दरवाज्या जवळ वारा खात उभे होतो. बाहेरच्याबाजुला तीन चार शाळकरी मुले लटकत होती. १०वीत शीकत असावीत. मस्त हींदीत गप्पा चालल्या होत्या. गाडी सुटली की स्टेशनवर कुणाला तरी जोरात कॉमेंट मारणे चालु होते. मुलुंडला गाडीत टी.सी. चढ्ले, कुर्ल्यापर्यंत एक दोन बकरे सापडले. या मुलांच्या गप्पा आता हे टी.सी. कसे चोर असतात, कसे पैसे लाटतात यावर चालु होत्या. टी.सी. कुर्ल्याला उतरले.

रत्ना

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 31/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! '' ''नको नको, ताई!

CE मार्कची वांगी!!!!?????

लेखक मिलिंद यांनी शुक्रवार, 30/07/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक वाचूनच दचकलात ना!! अहो मी तर ही वांगी पाहूनच गार झालो. वांगी तीही CE मार्कची आणी माझ्या पिशवीत? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला पण नाही हो मी जागाही होतो (आणी भारतातच होतो) सीई मार्कचे वांगे १ सीई मार्कचे वांगे २ त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो.

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 29/07/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

मी अनुभवलेली अमेरीका

लेखक शुचि यांनी बुधवार, 28/07/2010 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंचा अनुभव त्यांच्या शब्दात - अमेरीकेत प्रवेश म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळण्यापेक्षादेखील कठीण हे आजूबाजूंचांकडून ऐकून होते पण याचा साक्षात अनुभव आला काही एक वर्षांपूर्वी. कॉन्सुलेट्च्या फेर्‍या आणि त्यांचे १७६० फॉर्म्स भरता भरता नाकी नऊ आले होते, जीव मेटाकुटीला आला होता. दर वेळेस कॉन्सुलेटला जाते वेळी सिद्धीविनायकाचं दर्शन घडत असे आणि बाप्पाची आळवणी पण तो सोनियाचा दिनु काही उगवत नव्हता. आपल्या इंडीयन लोकांना तुमचा मुलगा जर "आय टी" मधे असेल आणि अमेरीकेत असेल तर व्हिसा मिळणं बरच सुकर होतं.

होम्सानंद

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 27/07/2010 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष होते १९८४. पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची संधी आणि महानगराची भीती अशा दोन कुबड्यांवर लंगडत मी पुण्यात आलो. संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत पहिले काही दिवस गेले. जन्माने पुणेकर नसलेल्यांबद्दलची पुणेकरांची तुच्छता समजून घेण्यात नंतरचे काही दिवस गेले. त्यानंतर वर्गातल्या सहकार्‍यांनी त्यांच्या गप्पांमधे सहभागी व्हायची परवानगी दिली. त्यांच्या गप्पांमध्ये 'अरे, आज स्कॅन्डल इन बोहेमिया वाचली...',' नेव्हल ट्रेटीला तोड नाही...', 'क्रीपिंग मॅन काहीतरीच आहे हं...', 'माझी आवडती म्हणशील तर यलो फेस...' असं काहीतरी त्यांचं बोलणं सुरु असे.

ही नाती कोणती?

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 27/07/2010 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ काकी, लवकर जेवायला वाढा, पुन्हा पळायचय." - माझं नेहमीच ओरडणं. "अरे ह्या पोळ्या लाटण्यार्‍या बाया लवकर येतच नाहीत. मी तरी काय करु" काकीच ठरलेलं उत्तर. "मला तुम्ही केलेल्या पोळ्याच आवडतात, अगदी मऊसुत असतात, ह्या बाया नुसत्या कळकट, जळालेल्या कडक पोळ्या करतात" - मी "थांब, मीच तुला गरमागरम पोळ्या करुन देते बघ फटकन." काकी "अहो कॉलेज फक्त अर्धा तासच सुटी देत जेवण्यासाठी, त्यात अर्धा किमी पळत यायचं, कसबसं गिळायचं आणी पुन्हा कॉलेजात जायचं, कसं करणार सांगा बरं?" - मी. अगदी आईवर हक्क गाजवावा तसा आम्ही या आमच्या मेसवाल्या काकीवर गाजवायचो. तरी ही काकी आमच्यावर कधी रागावली नाही की चिडली नाही.