Skip to main content

कळतं पण वळत नाही

लेखक शुचि
Published on शनीवार, 17/07/2010
मध्यंतरी नवर्‍याचा वाढदिवस झाला. नणंद तिच्या मुलीस घेऊन आली होती. तिची मुलगी आणि माझी मुलगी जवळजवळ सारख्या वयाच्या. पूर्ण दिवस गप्पा, खेळ, मनोरंजन, खाणंपीणं यात गेला. अर्थात मुलांनी घरातले कपडे घालून धिंगाणा घातला. संध्याकाळी केक कापायची वेळ झाली. अर्थात माझ्या मुलीची लगबग सुरू झाली - मेणबत्ती शोध, काँप्युटर वर गाणं लाव, उड्या मार यात त्या चिमुरडीला कुठलं लक्षात की कपडे बदलायचेत, केस व्यवस्थित करायचेत. पण माझ्या डोक्यात वेगळी चक्रं - ती सुरेखच दिसली पाहीजे, तिने फेस्टीव्ह कपडे घातले पाहीजेत, हे फोटो पुढे सुखद आठवणी रहाणार , कदाचित तिचा नवरा हे फोटो पुढे बघणार : ) वगैरे वगैरे. खूपदा सांगूनही तिने काही दाद दिली नाही मग माझी चिडचिड, तिची रडारड होऊन एकदाची ती तयार झाली. पण शेवटी फोटोत ती रडवेली आणि माझा मूड ऑफ आणि गिल्टी . नंतर आत्मपरीक्षण केलंअसता माझ्या लक्षात आलं - (१) आपण आपल्या मुलांना अपलं "एक्स्टेन्शन" समजतो. (२) माझ्याबाबतीत बोलायचं तर - नणदेच्या मुलीवर मी खूप प्रेम करते पण तितकीच मी माझ्या मुलीच्या बाबतीत स्पर्धात्मक आहे. माझ्या मुलीनी इतरांना सर्व बाबतीत "ओऊट्परफॉर्म" करावं, मागे टाकावं असं मला वाटतं. मग भले ते त्या क्षणी फोटोत दिसण्यात का असेना. मीदेखील हे मान्य करते की "प्रत्येक मूल स्वतःचे गुण्-दोष घेऊन जगात येतं. तुलना करू नये" पण जेव्हा स्वतःवर शेकतं, तेव्हा हे पुस्तकी ज्ञान कुठे बरं चरायला जातं ? असं सर्वांचं होतं का की कळतं पण वळत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5721
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

चुकुन मास्तरांच्या विचारसरणी बदलायची. :T वेताळ

माझं असं माझ्या नवर्‍याबाबत होतं!! त्यानं सर्वांना दरवेळी मागं टाकावं हा विचार चुक आहे हे कळुनही वळत मात्रं नाही!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

In reply to by मी ऋचा

माझं असं माझ्या नवर्‍याबाबत होतं!! =)) --- शुचि, असाच अनुभव मलाही कधीतरी येतो. आपण मुलांच्या उत्साहाच्या भरात ते जे काही करत असतात,त्यावर आपली इस्त्री फिरवायला जातो. ते तसे केले नाही, तर लोक आपण मुलांना वळण लावले नाही असे म्हणतात. पण त्याकडे आपण दुर्लक्ष केलेले बरे असे वाटते.

आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट असं धो धो रण करणारे धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :) --अवलिया

In reply to by अवलिया

आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट असं धो धो रण करणारे धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं
आणि मग एक दिवशी बाब्या डोक्यावर बसतो आणि मिस-कॉल मारायला लागतो. आमच्या लहानपणी एकदाच घरच्यांनी समोरच्या पोराचे "किती अभ्यास करतो बघ जरा तो" अशा टाईपातले कौतुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर मी बाणेदारपणे "मग त्यालाच दत्तक घ्या" असे उत्तर दिले. हे सर्व प्रकार आपोआप बंद झाले. बाणेदार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

"मग त्यालाच दत्तक घ्या" असे उत्तर दिले. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा हा हा हा आमचा परा, त्याच्यावर सगळ्यांचा भारी जीव =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

:)
त्यावर मी बाणेदारपणे "मग त्यालाच दत्तक घ्या"
'नाहीतर कॅडबरीची गोष्ट आईला सांगेन' अशी त्यामागे छुपी, सहजीच आलेली धमकीही होती का? :) अवांतर संपलं, आता थोडं मूळ लेखाबद्दल. शुचि, मी कुठेतरी वाचलं की - you shouldn't stress yourself about small stuff - in the ultimate analysis most things are small stuff. मुद्दा असा आहे की ही स्पर्धा, व तीत भाग घेतल्याने गिल्टी वाटणं या दोन्ही गोष्टी स्मॉल स्टफ आहेत. परफेक्शनिस्ट राहिलात तर हे स्मॉल स्टफ टाकून देता येत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

पण कुठेतरी वाचलं होतं की - दीज स्मॉल थिंग्ज आर द हिंजेस ऑन विच द वल्ड रन्स. स्पर्धा ही चांगली की वाईट? किती प्रमाणात? ती कशी आपल्या मुलांना शिकवायची? "चलता है" अ‍ॅटीट्यूड कितपत ठेवायची? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

"डेविल (ऑर गॉड) इज इन डीटेल", असे माझे वडील मला सांगत असत, त्याची आठवण झाली. (मी वडिलांचे उपदेश समजून घेतले असते तर बरे झाले असते, असे कधीकधी वाटते :)) त्यामुळे स्पर्धा असतेच. ती कधीतरी समजूनही सांगावी लागते. पण स्पर्धेपोटी इतर काही लक्षात येतच नाही, हे काही खरे नाही. आपले तसे होत नाही ना एवढे पहावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे हे लहानपणीच नव्हे तर कॉलेजात गेल्यावर सुद्धा चालूच असते मला एकदा असेच कशावरून तरी वडिलानी खवचटपणे " उद्या तुला स्थळे यायला लागल्यावर आम्ही मुलाचा इन्कम सोर्स काय म्हणून सांगायचा" असे विचारले होते " मुलाचे वडील" मी बाणेदारपणे उत्तर दिले. त्यानन्तरच्या क्षणापासून खवचट प्रश्नसंच गुंडाळला गेला. अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

मुलांकडुन , नवर्याकडुन किंवा इतर कुणाकडुन अपेक्षेचा विचार मनात येताक्षणी स्वतः कडे बघावे..स्वत:च्या स्वतःकडुन, इतरांच्या आपल्या कडुन असलेल्या अपेक्षा लग्गेच दिसु लागतात आणि आपल्याला लग्गेच "वळायला" लागतं...!! :)

ही ही ही! शुचीतै, कसली आहेस तू!;) (बरीच)मुलं लहान असताना छान गुटगुटीत असतात. माझा मुलगाही अगदी गुटलर, गोरापान होता. मी मला आवडतील असे सगळे कपडे त्याला घालून हौस पुरवून घेतली होती. आता पोहायला जातो त्यामुळे काळाकुट्ट झालाय. खाण्यापिण्याचे नखरे असतात म्हणून बाळसं कधीच गेलय. रोज वाटतं खरं की यानं हा काय अवतार करून घेतलाय! नंतर मीच बदलले. अजून चार पाच वर्षात हा मुलगा दिवसातला बराचसा वेळ आरश्यापुढं घालवायची 'शक्यता' आहे.;) मागच्या अठवड्यात फक्त एक दिवस त्याला त्याचे कपडे निवडून घालायला सांगितले पण याने इतके वाईट काँबीनेशन निवडले. दुसर्यांशी तुलना म्हणशील तर मी एकदाच नोएल नावाच्या मुलाशी केली आणि त्यानं उत्तर दिलं,"आई, त्याच्याकडे निंटेंडो डी एस २ आहे. मी कधी त्याच्याकडे आहे म्हणून मागितलाय का? मला हवा म्हणूनच मागितला. मग तू का त्याच्याशी तुलना करतेस? तुला माझी तब्येत चांगली हवीये कि त्याच्यासारखीच हवीये?" काय सांगू तुला, मी गप्प बसलीये ती अजून! रेवती

शुचि अस बर्‍याच गोष्टीत कळत पण वळत नाही अस होत. चालायचच ते.

माझ्या एका मैत्रिणीच्या आईने अशी माझी आणि तिची तुलना केली. हिचा चेहेरा अगदीच वाईट झाला. माझ्या डोक्यात आलं ते मी बोलून लगेच मोकळी, "माझे बाबा नाही अशी तुलना करत!" त्यावर तिच्या आईचा चेहेरा बघणेबल झाला! लहान पोरं निरागसतेमुळेच एवढी सुंदर दिसतात ना, अगदी मळक्या कपड्यांमधेही क्यूट दिसतात. तुमच्याही पोरीला उगाच बाहुली नका बनवू, तिला मुलगीच राहू द्या! :-) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लहान पोरं निरागसतेमुळेच एवढी सुंदर दिसतात ना, अगदी मळक्या कपड्यांमधेही क्यूट दिसतात. तुमच्याही पोरीला उगाच बाहुली नका बनवू, तिला मुलगीच राहू द्या! :) अगदी माझ्या मनातलं

शाळेतली गोष्ट. माझ्या क्लासमधे दोन मुली होत्या. दोघींचे घरं समोरासमोर. एक अभ्यासात खुप हुशार आणी दुसरीला चित्रकला, नृत्य, वेगवेगळ्या कला यात खुप रस होता. पण भारतीयांमधे अभ्यासाशिवाय/उच्च शिक्षणाशिवय (त्यात सुद्धा डॉ. किंवा ईंजीनीयर हेच प्रकार माहिती आहेत) मुलं पुढ जाउ शकत नाही ही एक मानसिकता आहे. मग काय दुसर्‍या मुलीला तिचे घरचे पहिल्याअ मुलीच उदाहरण देऊन सारखं टोर्चर करायचे. बिचारीने शेवटी बारावीचे रिझल्ट आले तेव्हा आत्महत्या केली. आणी आजकाल तर स्पर्धा फारच अवघड झाली आहे. ही झाली टोकाची गोष्ट. लहान मुलांत काही उपजत गुणदोष असतातच. माझ्या मते लहान मुलांना एखादी गोष्ट मी म्हणतो/म्हणते म्हणुन कर किंवा चुकीची आहे असे कधीच समजावु नये. उलट एखादी गोष्ट का चुकीची आहे किंवा एखादी गोष्ट त्याच्या/तिच्यासाठी कशी चांगली आहे हे पटवण्याचा प्रयत्न करावा. मुले ऐकतात. बाकी कोणत्याही प्रकारे न नमणारी अतिहट्टी मुलही आहेतच. त्यांचे नशिब ते स्वतः घडवतात. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

पण भारतीयांमधे अभ्यासाशिवाय/उच्च शिक्षणाशिवय (त्यात सुद्धा डॉ. किंवा ईंजीनीयर हेच प्रकार माहिती आहेत) मुलं पुढ जाउ शकत नाही ही एक मानसिकता आहे. मानसिकता नव्हे, तर वस्तुस्थिती आहे ती भारतात.

कितीही नाही म्हटले तरी होतेच. ती करताना आपले डोळे आणि डोके दोन्ही उघडे असतील तर पुरेसे आहे. ;) आमच्या घरात मुलीची तुलना स्वतःशीही होते. उदा. लहानपणी तू चांगली होतीस. सांगितलेलं सर्व ऐकत होतीस. आता ऐकत नाहीस. लहानपणी तुला अमुक गोष्ट आवडत असे. आता आवडत नाही. :)
खूपदा सांगूनही तिने काही दाद दिली नाही मग माझी चिडचिड, तिची रडारड होऊन एकदाची ती तयार झाली. पण शेवटी फोटोत ती रडवेली आणि माझा मूड ऑफ आणि गिल्टी .खूपदा सांगूनही तिने काही दाद दिली नाही मग माझी चिडचिड, तिची रडारड होऊन एकदाची ती तयार झाली. पण शेवटी फोटोत ती रडवेली आणि माझा मूड ऑफ आणि गिल्टी .
अजून काही वर्षे थांबा. तुम्ही तिला "आता तयारी पुरे झाली." असे सांगायची वेळ होईल आणि मनासारखं तयार होऊ दिलं नाही म्हणून तिचा मूड ऑफ होईल.

वरील चर्चा वाचून रविंद्र नाथांची एक कविता आठवली. फार संयुक्तीक आहे असे नाही, पण तरी डकवत आहे. मला 'ग्रेट फेअर ऑफ कॉमन ह्युमन लाईफ' ही शब्द रचना फार आवडली आहे, त्यामुळे कविता लक्षात राहिली आहे. The child who is decked with prince's robes and who has jewelled chains round his neck loses all pleasure in his play; his dress hampers him at every step. In fear that it may be frayed, or stained with dust he keeps himself from the world, and is afraid even to move. Mother, it is no gain, thy bondage of finery, if it keep one shut off from the healthful dust of the earth, if it rob one of the right of entrance to the great fair of common human life. -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.

लिखाणातल प्रामाणिकपणा जाणवला. आपल्यामधे वसत असलेल्या काटेरी भागाबद्दल बोलू शकायला धैर्य लागते. स्पर्धा करणे, तुलना करणे , असूया हे सर्व आपल्या सर्वात आहे. ते "आहे" , "आपण स्पर्धात्मक वागतो आहोत" याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. जेथे ही जाणीव लोपलेली असते तेथे मग आंधळी स्पर्धा सुरू होते. मुलांच्या बाबतीत स्पर्धा करणे मात्र टाळण्याजोगे आहे. थोडासा असा विचार मला सुचतो : the analogy is a little tacky, but nevertheless. मुलांना आयुष्याच्या फ्रीवेवर आपण हळुहळू आणतो आहोत. त्यांच्या गाडीचा मेन्टेनन्स करणे, योग्य वेळी त्यात इंधन भरत राहाणे इत्यादि इत्यादि करणे आपले कर्तव्य आहेच. परंतु हा फ्रीवे आहे, रेसट्रॅक नव्हे. जे लोक त्याला रेसट्रॅक मानून मुलांना पळवत आहेत त्यांना तसे करू देत. तुम्हाला तुमच्या मुलाने योग्य वेळी आयुष्याच्या ध्येयपूर्तीकडे सुखरूप पोचावे असे वाटणे बरोबर आहे परंतु त्याने इतर कुणाच्या आधी-नंतर पोचणे याला काय अर्थ आहे ? आणि सगळ्यात महत्त्वाचे : (वापरून गुळगुळीत झालेले वाक्य ) : तुम्ही हा प्रवास मुलांबरोबर करणार तो आनंददायक व्हायला नको का ? रेसट्रॅक म्हणून धावणार्‍या आणि धावडवणार्‍याना हा प्रवास कसा एन्जॉय करता येत असेल ? आपल्या मुलाची स्पर्धा करायचीच तर त्याच्या स्वतःच्या पोटेन्शियलशी करावी. "इतर कुणाशी" हा मुद्दा आला तर तो दुर्दैवी आहे.

तुलनेचे विचार मनात येण हे नैसर्गिक आहे. स्वत:ची तुलना स्वत:शी होणे,इतरांशी होणे हे होत असते. तुलनेचे विचार मनात येणे आणी ते वारंवार प्रकट करणे यात जो फरक आहे तिथे तारतम्य दडलेले आहे.तुलना विश्लेषण प्रक्रियेचा अविभाज्य घटक आहे. साम्य व फरक हे तुलनेमुळेच समजतो.प्रत्येक व्यक्ति ही तशी एकमेवाद्वितीय आहे. युणीक म्हना हव तर. मुलांची तुलना केली तर ते पालकांची तुलना करणार. तुलनेतुन पुढे होणारी स्पर्धा ही वाटचाल असेल तर प्रवासाचा आनंद घेता येतो पण दमछाक करणारी असेल तर तो आनंद मिळण न मिळण हे सापेक्ष आहे. आसुरी आनंद ही कल्पना कदाचित यातुन आलेली असावी. स्पर्धा ही प्रेरणा निर्माण करणारी असते तशी असूया निर्माण करणारी पण असते. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात होणारी पालकांची लूडबूड ही कधी कधी अडथळा ठरते. माझ्या मुलीच्या शाळेत स्पर्धा/ तुलना अशा प्रकाराला जाणीवपुर्वक फाट्यावर मारले होते. अक्षरनंदन शाळेचे ते वैशिष्ट्यच होते.शाळेच्या बाहेर पडल्यावर या स्पर्धात्मक युगात मुलांचे कसे होणार ही चिंता अनेक पालकांना भेडसावत होती/आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी ही त्याच शाळेतला. ( तिथे श्रा. मो. यांच्या नोंदीमधल्या सुहासताई आम्हाला शिकवायला होत्या. ) स्पर्धात्मक वातावरण हवे होते असे मला वाटते. स्पार्टन लोकांनी त्यात एक टोक गाठले होते तर आमच्या शाळेने विरुद्ध. तुलना/स्पर्धा न करून कसे चालेल ? भाजी घेताना सुद्धा आपण निवडून घेतो तर माणसे कशी सुटणार त्यातून ? शाळेत प्रवेश/ नोकरी/ खेळ या आणि अशा सर्व गोष्टींमधे तुलनाच केली जाते आणि तेच तार्किकदॄष्ट्या योग्य आहे. जितकी लवकर मुले हे शिकतील तेवढा त्रस कमी. बाकी सर्व गोष्टींमधे आमची शाळा इतर शाळांपेक्षा काही पट चांगली होती. अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचा पुण्यातल्या बाकी शाळांमधे विचारही केला जाउ शकत नाही. ( पुन्हा तुलना आलीच :) )

कदाचित तिचा नवरा हे फोटो पुढे बघणार : )
माझ्या लग्नानंतर प्रथम जेव्हा मी माझ्या सासरी गेलो होतो तेव्हा आवर्जुन मेव्हण्या/पत्नी/सासुसासर्यांकडुन त्यांचे सगळे जुने अल्ब्म मागितले.मेव्हण्यानेही अद्यापपर्यंत अडगळीत गेलेले सगळे अल्ब्म मला काढुन दिले आणि बायकोचे लहानपणचे फोटो पाहताना फार मजा आली.विशेष म्हणजे पूर्ण घरच जुन्या आठवणींत रमुन गेले.फोटोंमध्ये बायकोचे चांगले/साधारण दिसणे हे त्यावेळी गैरलागु होते.उलट बर्याच फोटोत काहीही नट्टापट्टा नसणारी बायकोच जास्त आवडुन गेली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

प्रामाणिक कथन. रोजव्यवहारातले आवश्यक तत्त्वज्ञान.