मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya ·
लेखनप्रकार
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

परदेशातील समाज जीवन

खटपट्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी माझं काम गुण्या गोविंदाने करत असताना, सर्व व्यवस्थित सुरळीत चालू असताना. (मी कितीही कठीण काम असलं तरीही ते सुरळीत च करतो. आरामात च करतो, यामुळे काही वेळेला काही लोक नाराज होतात पण मी नेहमी क्लायंट आणि अंतिम आउटपुट चा विचार करतो, असो) एक दिवस मला गोऱ्या बॉस चा फोन येतो, मी एक माणूस पाठवतो आहे, मी - कशाला? बॉस - त्याला "ठेवून घे" मी - म्हणजे? बॉस - नंतर सांगतो, आयला लोक बाई ठेवतात, माझा बॉस मला एक जरड 63 वर्षाचा म्हातारा ठेवायला सांगत होता, सांगितल्या प्रमाणे हा अमेरिकन म्हातारा आला, ठोंब्यासारखा समोर बसला, त्याला विचारले - काय येतं तुला? म्हातारा (त्याचे नाव जॉन) - तू देशील ते काम करेन!

सामाजिक संकल्पनांची घटनात्मक वैधता

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सामाजिक संकल्पनांची घटनात्मक वैधता ===================== -राजीव उपाध्ये निसर्ग बौद्धिक क्षमतेची देणगी सर्वांना समान देत नाही. त्यामुळे असे असमान बौद्धिक क्षमतेची वाटणी झालेल्या सदस्यांचे मानवसमूह भावनिक, आर्थिक, शारीरिक इ० गरजांच्या पूर्ततेसाठी कळप करून एकत्र राहतात. अशा कळपात राहताना कळप एकत्र ठेवण्यासाठी, तसेच कळपांतर्गत हितसंबंध अनेक ’सामाजिक संकल्पना’ (सोशल कंस्ट्रक्ट्स) सहसा कळपातले बलिष्ठ सदस्य निर्माण करतात. अशा सामाजिक संकल्पना रुजविण्यासाठी बळ, दंतकथा, भीति अशी वेगवेगळी साधने वापरली जातात.

चित्रपट परीक्षण-फ्री गाय

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार् मंडळी!! मध्यंतरी स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण पणे अशी---- फ्री सिटी हा एक ऑनलाइन व्हिडिओ गेम आहे जो सुनामी गेम्स नावाच्या कंपनीने विकसित केला आहे. पण त्याचा सोर्स कोड वॉल्टर "कीज" मॅकी आणि मिली रस्क यांनी विकसित केलेल्या लाइफ सेल्फ नावाच्या अप्रकाशित गेममधून चोरला गेला आहे. सुनामीचा मुख्य डेव्हलपर अँटवान होवाचेलिकने फ्री सिटी तयार करण्यासाठी तो कोड वापरला आहे.

निशानची (हिंदी सिनेमा)

मन ·
लेखनविषय:
‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

आले- बदाम वडी

नूतन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी. यंदा मुंबईत कधी नव्हे ती किती मस्त थंडी पडली आहे ना? थंडीच्या मोसमात बाजारात गेलं की अगदी हावरटासारखं होतं. कल्पनेला पंख फुटतात. डोळ्यासमोर गाजर हलवा, गाजराच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, भोगीची भाजी, उंधियु, मटार करंजी, मटार पॅटीस......( आणखी काही न आठवलेलंच बरं!) असे नानाविध पदार्थ तरळू लागतात. पण पूर्वी माझ्या माहेरी आणि सासरी थंडीच्या दिवसात हमखास होणारे पदार्थ म्हणजे मेथी लाडू, डिंकाचे लाडू आणि आले-बदामाच्या वड्या! सद्य परिस्थितीत,हे पदार्थ (घरी) करणारे आणि खाणारे , दोघांचीही तशी वानवाच.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

Bhakti ·
लेखनविषय:
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.

चित्रपट परीक्षण -लूसी

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला आणि हैराण झालो. त्याची ही ओळख.(स्पॉयलर-ज्यांना साय फाय किवा तत्सम चित्रपट बघायला आवडतात त्यांनी थेट बघा, नाहीतर म्हणाल स्टोरी फोडली) तर चित्रपटाची नायिका लूसी ही एक सामान्य मुलगी आहे आणि चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिचा काही दिवसांपूर्वीच ओळख झालेला बॉयफ्रेंड तिला एक काम सांगतो. तो म्हणतो की त्यांच्याकडची सुटकेस समोरच्या हॉटेलातील काउंटरवर नेऊन दिलीस तर तुला एक हजार डॉलर मिळतील. अर्थात हा काहीतरी झोल असणार असे वाटून ती नकार देते.

पहिले ‘काव्य’ प्रसवताना . . .

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वयाचे एकविसावे वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि नुकताच मतदानाचा अधिकार मिळाला होता (तेव्हा तो 21व्या वर्षी मिळायचा, 18व्या नव्हे). त्यामुळे झालो बाबा आपण एकदाचे प्रौढ, ही मनात सुखद भावना. पदवी शिक्षण शेवटच्या टप्प्यात आलेलं. त्याच दरम्यान लेखन उर्मी अगदी उफाळून आली. तशी ती त्यापूर्वीच्या काही वर्षांत मनात धुमसत होतीच परंतु लेखणीपर्यंत काही पोचत नव्हती. वसतिगृहाच्या एकंदरीत सामाजिक वातावरणातून लेखनाची ठिणगी पडायला चांगली मदत झाली. मग सुरुवातीस वहीतच काही खरडकामे झाली आणि त्यानंतर सार्वजनिक लेखनात पदार्पण केले ते वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रांमधून.

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

गवि ·
लेखनप्रकार
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता. आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका. आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा.