साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !
- 29 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले.
चकाचक इमारत,
२ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा..
प्रशस्त हॉल ... सॉरी सॉरी - लिविंग रूम... मोठाल्या बेडरूमस ....
वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर सहज बसेल आणि तरीही जागा उरेल असे स्वयंपाकघर ... सॉरी सॉरी - मॉड्युलर किचन ...
प्रत्येक बेडरूमला मध्यम बाल्कनी ..
लिविंग ला मोठ्ठी गॅलरी ...