भगीरथ अभियंता होता ?? एक विचार
लेखनविषय:
- Read more about भगीरथ अभियंता होता ?? एक विचार
- 25 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नुकतेच भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली. कादंबरी बरी वाईट हे लिहीण्यासाठी हा धागा नाही पण त्यात जो विचार लेखकाने मांडला होता तो मिपा वाचकांना समजावा हा उद्देश.
लेखकाने मांडलेल्या मतानुसार, आर्य हे टोळ्याने भारतात आले. त्यापैकी एका टोळीचा नायक विश्वामीत्र होता. भारतातील मुळ रहिवासी हे शेती, व्यापार करावयाचे. त्यानी गावे वसविली होती. ते सुस्थीतीत रहात होते. आर्य हे आक्रमक होते. मुळ रहीवाश्याकडे आर्यांसारखी आधुनीक शस्त्रे नव्हती. आक्रमक आर्यानी अन्नासाठी मुळ रहिवाश्यावर आक्रमण केले. त्याना दास (दस्यु) बनविले. त्यांच्याकडुन शेती शिकली. त्यांच्या बरोबर विवाह संबध जुळवले.