मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मत

भगीरथ अभियंता होता ?? एक विचार

आप्पा ·
नुकतेच भगीरथ ही रविंद्र भट लिखीत कादंबरी वाचली. कादंबरी बरी वाईट हे लिहीण्यासाठी हा धागा नाही पण त्यात जो विचार लेखकाने मांडला होता तो मिपा वाचकांना समजावा हा उद्देश. लेखकाने मांडलेल्या मतानुसार, आर्य हे टोळ्याने भारतात आले. त्यापैकी एका टोळीचा नायक विश्वामीत्र होता. भारतातील मुळ रहिवासी हे शेती, व्यापार करावयाचे. त्यानी गावे वसविली होती. ते सुस्थीतीत रहात होते. आर्य हे आक्रमक होते. मुळ रहीवाश्याकडे आर्यांसारखी आधुनीक शस्त्रे नव्हती. आक्रमक आर्यानी अन्नासाठी मुळ रहिवाश्यावर आक्रमण केले. त्याना दास (दस्यु) बनविले. त्यांच्याकडुन शेती शिकली. त्यांच्या बरोबर विवाह संबध जुळवले.

मिपा पाककृती..

मनि२७ ·
मिपाचा पाककृती हे सदर खूप छान आहे..अगदी त्याला कसलीच तोड नाही हे नक्कीच!! . मी मिपा ची नियमित वाचक आणि आता सदस्य पण आहे. पण आज कालच्या पाकृ मध्ये मला फोटो session जास्त आणि पाकृ मधला लेखकाचा रस कमी वाटतोय. फोटो शिवाय मजा नाही मान्य !!! अगदी १०१ % ... पण काही फोटो प्रकाशित केले नाहीत तरी काही हरकत नाही.(उदा. चिरलेले कांदे किंवा टोमाटो) मोजकेच आणि गरजेचे फोटो द्यावे आस माझ मला वाटतय त्यामुळे पाकृ सुटसुटीत आणि नीट वाटेल.. त्यामुळे पाकृ ची चव काही कमी होणार नाही आणि वाचकांचा प्रतिसाद हि नाही .... हे सगळ मी निर्मल मनाने सांगतेय..ह्यात मला काही कोणाला उद्देशून म्हणायचे नाही...आणि konach मन हि दुखवायचा नाही.. तुम्हाला काय वाटत मिपाकरांनो? टीप:- हे सगळ मला वाटलं म्हणून लिहलय......... मिपाकारांचा मत हवाय.

एसटी पुराण

पाषाणभेद ·
एसटी पुराण एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली.

विरासत

लॉरी टांगटूंगकर ·
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.

IT WIFE आणि स्वयंपाक

सुजय कुलकर्णी ·
लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला.

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

इंटरनेटस्नेही ·
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती

पाषाणभेद ·
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्‍याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

परिकथेतील राजकुमार ·
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

योगायोग

आनंद घारे ·
योगायोग म्हणजे 'कोइन्सिडन्स' या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या वाटणार्‍या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला 'योगायोग' असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सूर्य उगवला आणि सकाळ झाली याला योगायोग म्हणत नाहीत, कारण सूर्योदयाच्या वेळेलाच सकाळ असे नांव दिले आहे.