लाल सिंग चढ्ढा

लेखनविषय:
लेखनप्रकार
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते.

माझे काही आवडते कम्प्युटर गेम

लेखनविषय:
लेखनप्रकार
खेळ अनेक कारणांसाठी भारी असतात. काही गेम खेळायच्या पद्धतीसाठी भारी वाटतात- उदा मॉरधाऊ हा तलवारी/धनुष्य/भाले यांचा द्वंद्व खेळ त्याच्या स्वतःच्या अश्या द्वंद्व पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. काही गेम्स अवर्णनीय ग्राफिक्स आणि भलीमोठी अद्भुतरम्य कथा असल्यामुळे भारी वाटतात. उदा.- प्रिन्स ऑफ पर्शिया मालिका, गॉड ऑफ वॉर मालिका इत्यादी. हे गेम्स हेवी ड्युटी असतात, संगणकांवर बहुदा चालत नाहीत. चालले तरी भारीतलं ग्राफिक कार्ड असेल तरच. काही खेळ त्यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेसाठी प्रसिद्ध असतात. उदाहरणार्थ माझा एक खूप आवडता गेम- पेपर्स प्लिज.

आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.

एक अपरिचित प्रकाशन - सैनिक समाचार

भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे. सुरुवातीला फौजी अखबारचे मुख्य कार्यालय सिमल्यात असले तरी त्याचे प्रकाशन अलाहाबादहून होत असे. भारतीय लष्करातील घडामोडींची माहिती जवानांना करून देता यावी या हेतूने फौजी अखबार सुरू करण्यात आले होते.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

तेनाली रामा: "सोनी सब" चॅनलवरील उत्कृष्ट मालिका

लेखनविषय:
लेखनप्रकार
जुलै 2017 ते नोव्हेंबर 2020 इतका कालावधी चाललेली आणि 804 एपिसोड्स असलेली "सोनी सब" चॅनल वरची "तेनाली रामा" ही मालिका मी त्या वेळेस जरी मी बघू शकलो नव्हतो तरी काही महिन्यांपूर्वीपासून पासून बघायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जसा वेळ मिळेल तसे जवळपास ५० एपिसोड बघून पूर्ण झाले आणि उरलेले सर्व एपिसोड बघायची माझी इच्छा आहे. "सोनी लिव्ह" या ॲपवर या मालिकेचा ऑडियो आणि व्हिडिओ थोडा पुढे मागे होत असल्याने (त्याचे कारण माहिती नाही) मी ही मालिका युट्युबवर बघत आहे. युट्युबवर पूर्ण लांबीचे सगळे एपिसोड उपलब्ध आहेत.

खतरनाक रोडवरच्या प्रवासाची "डिस्कव्हरी"

लेखनविषय:
लेखनप्रकार
हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेह हे अंतर तीन सेलिब्रिटीज् (संग्राम, वरुण आणि मंदिरा) एकेका अनुभवी ड्रायव्हरला सोबत घेऊन ट्रक चालवत नेतात, आणि त्यांना दिलेला सामान ठरलेल्या ठिकाणी डिलिव्हरी करतात, हे बघायला खूपच थरारक वाटते. समुद्रसपाटीपासून अंदाजे 6000 फूट, पासून ते अंदाजे 14000 फूट उंचीवर पोहोचतात. इंडियाज डेडलीएस्ट रोड्स (भारतातील खतरनाक/प्राणघातक रस्ते) सिझन एक मधील एपिसोड एक, दोन आणि तीन मध्ये आपण "डिस्कव्हरी प्लस" वर बघू शकता. बरीच भौगोलिक माहिती मिळते.

इजिप्तमधील "डिस्कव्हरी"

लेखनविषय:
लेखनप्रकार
माहितीच्या खजिन्यासाठी मी नेहमी डिस्कव्हरी चॅनेल बघत असतो. अशातच इजिप्तच्या अनेक प्राचीन गूढ गोष्टींबद्दल काहीतरी बघावे असे वाटले म्हणून काही महिन्यापूर्वी एका रविवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्कव्हरी प्लस मध्ये इजिप्तवर कार्यक्रम शोधले तेव्हा "एक्सपेडिशन अननोन: इजिप्त स्पेशल" हा कार्यक्रम बघण्यात आला. (अज्ञात मोहीम: इजिप्त विशेष) याची रूपरेषा थोडक्यात अशी आहे की, कार्यक्रमाचा अँकर जोश गेट्स हा इजिप्तमधील एका साईटवर क्रिसला भेटतो. तिथे डॉ. झाही हवास हे पुरातत्व संशोधक असतात. त्यांच्या देखरेखीखाली उत्खनन सुरू असते.

मंत्रपुष्पांजली

लेखनविषय:
मंत्रपुष्पांजली जेव्हा मन उदास असेल तेव्हा मनाला उभारी येण्यासाठी काही गोष्टी राखुन ठेवल्या आहेत. कधी तरी रविवारी ईस्कॉन मंदिरात जाणे, योगासने शिबीरात गेल्यानंतर शेवटी मंत्रोच्चार असतोच. मी काही आवडीचे दुवे तुम्हाला देत आहे. ----- माहीशासुर मर्दिनी : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=ryMzovUshtQ बौद्य हथा सुत्रा : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=FZ0w4B80uZA मधुरम : गैया संस्कृत https://www.youtube.com/watch?v=S42bzsc5R0g भरपुर गाणी आहे. पुर्ण संग्रह येथे पहा.

स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

लेखनविषय:
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत. तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा. १. बिग बँग थियरी (BBT) सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली.
Subscribe to माध्यमवेध