मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)

Bhakti ·
१ कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे दिसते सुनीळ तेज गे मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । उमटताली सहज गे बाईजे ।। ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.

देव आणि धर्माचे चेताविज्ञान

युयुत्सु ·
देव आणि धर्माचे चेताविज्ञान =============== -राजीव उपाध्ये "देवदानवा नरे निर्मिले हे मत कळवू द्या काठोकाठ भरूनी द्या पेला फेस भराभर उसळूं द्या" - केशवसुत, स्फूर्ति  एका नव्या चेता शास्त्रीय अभ्यासा नुसार लोक देव-देव का करतात या वर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासानुसार periaqueductal grey नावाचा एक विशिष्ट मेंदूचा भाग (brain region) या देव आणि धार्मिक भावनांशी (feelings) संबंधित आहे. हा भाग भीती, वेदना आणि परोपकार (altruism) यांसारख्या भावनांवर प्रक्रिया करतो.

अनवधानातील गमतीजमती . . .

हेमंतकुमार ·
डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या.

खरडवहीतील ‘भेळ’ !

हेमंतकुमार ·
शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही.

इतिहास्यास्पद (१) स्वातंत्र्यदिनाची कल्पना

कुमार जावडेकर ·
समजा, मैफिलीची सुरुवात भीमसेन, तानसेन, मेहदी हसन, आमिर खुसरो आणि सुधीर फडके यांनी ‘यमन रागाचे प्रकार’ गाऊन केली तर? आमचा कार्यक्रम संस्मरणीय असण्याचं हे कारण होतं. त्याला खास उपस्थिती होती. नाही तर ‘स्वातंत्र्यदिन’ या विषयावर कार्यक्रम करणं यात आता नवलाई राहिली नाहीये. अगदी तो परदेशात साजरा झाला तरी त्यात विशेष असं काही वाटत नाही आजकाल. पण हे स्थळ अनोळखी होतं. उर्वरित जगाला (म्हणजे आम्ही उपस्थित आणि ‘यम टी.व्ही.’ दर्शकांव्यतिरिक्त कुणाला) हे कळणार नव्हतं. असे उपक्रम कुठे योजले जातात ते आता सांगणं आवश्यक आहे. आमच्याकडे तीन महादरवाजे आहेत. एकावर ‘स्वर्ग’ असं लिहिलंय. दुसऱ्यावर ‘नरक’.

किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ?

युयुत्सु ·
किमेरा संशोधन: निसर्गातील ढवळाढवळ? --राजीव उपाध्ये ए०आय० या तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. जी राष्ट्रे अशा तंत्रज्ञानाला लवकर स्वीकारतील त्यांना एकूणच जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ’अनफेअर ॲडव्हाण्टेज’ मिळणार हे निश्चित आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच आणखी एक विज्ञानशाखा चीन सारख्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रांमध्ये वेगाने विकसित पावत आहे. ती म्हणजे कृत्रीम जीवशास्त्र. अलिकडेच वाचनात आलेल्या काही बातम्यावरून असे लक्षात येते की कृत्रीम जीवशास्त्रातील प्रगती काही राष्ट्रांना असाच अमर्याद फायदा मिळवून देईल.

रेकमेंडेशन लेटर

युयुत्सु ·
रेकमेंडेशन लेटर ========== पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४ माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं... हे गुण कोणते? - कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा हे तीन गुण तुमच्यामध्ये असतील तर नैतिक प्रश्नांचे त्रांगडं सोडविणे फारसे त्रासदायक होत नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका अत्यंत बुद्धीमान मित्रामुळे आलेला एक गमतीदार अनुभव आजही स्मृतीमध्ये ताजा आहे. तर झालं असं की हा माझा मित्र आय० आय० टी० मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता होता.

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

विवेकपटाईत ·
ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले.

फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी ·
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!

रिकामी चौकट

चक्कर_बंडा ·
Chaukat1 पहाटेच्या धुक्याने जणु अंजिरी रंगाचं पांघरून घेतलं आहे व बांधावरील साखरझोपेची ग्लानी सरून जंगलाला जाग येऊ लागलीय. अशा कातरवेळी का कुणास ठाऊक पण दूर चुटिया पहाडीच्या बाजूने जोडीदाराला साद घालणाऱ्या एकाकी वाघिणीची अस्वस्थ गुरगुर ऐकत मी 'मनोलीत' अगदी एकटा उभा आहे. बांधाच्या काठावर वसलेल्या 'मनोली'तून बांधाचा विस्तीर्ण असा पाणपसारा नजरेत मावत नाहीये.