Skip to main content

लेख

बेपत्ता बायको, आरोपी नवरा आणि शून्य खून-पुरावा !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 10/12/2025 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
15 डिसेंबर 2020 . . . जगभरात कोविड-19ने थैमान घातलेले, बहुतेक देशांत अधूनमधून टाळेबंदीचे वातावरण आणि जनता हवालदिल झालेली. त्या दिवशी मध्यरात्री फ्रान्समधील एका गावात एक चक्रावून टाकणारी अन् मती गुंग करणारी घटना घडली. चाळीशीतल्या Jubillar जोडप्यातली पत्नी त्या मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. पुढील पाच वर्षात तिचा ठावठिकाणा लागलेला नव्हता आणि तिचे प्रेतसुद्धा मिळाले नाही - अगदी आपल्याकडचा ‘दृश्यम’ आठवला असेल ना? मात्र पोलिसांनी त्या बाईच्या नवऱ्याला अटक करून ठेवली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 09/12/2025 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड ============= --राजीव उपाध्ये कर्वेरोडवर मेट्रो झाल्यानंतर पुलाखाली लावलेले अनेक साहित्यिकांचे फोटो दृष्टीस पडतात आणि काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं? थोडी फार प्रसिद्धी मिळाली असती, ठराविक सामाजिक वर्तूळात ऊठबस झाली असती. पण माझ्या आई-वडीलांचे सामाजिक वर्तूळ माझ्या सामाजिक वर्तूळापेक्षा खुपच मोठे होते. नको ती अक्कल शिकविणारे कमी होते, मर्यादांचा आदर ठेवणारे, आनंदात सहभागी होणारे खुप होते. १ल्या लोकसभेतील एकुलत्या एक महिला खासदार इंदिराबाई मायदेव आमच्या घरी अनेकवेळा येऊन गेल्या आहेत.

खजुराहो-बनारस सोलो ट्रिप

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 06/12/2025 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी अप्रवासी फार कुठे गेलो नाही.पण नुकताच खजुराहो- वाराणसी अशी दहा दिवसांची स्वैर व सोलो टूर करुन आलो. अंशत: नियोजित पण बरीच स्वैर. IRCTC वरुन trial and error बेसीस वर तात्काळ ट्रेन बुकिंग केले. 25 नोव्हे ला सकाळी सोलो बॅग पाठीवर घेउन ट्रेन PUNE GCT SPECIAL ने भोपाळ ला गेलो. तिथे रात्री 12 ला पोचलो. रात्री IRCTC च्या एका दुर्लक्शित ठिकाणी फलाटा बाहेर असलेल्या एका रिटायरिंग रुम इमारतीत अनेकांना विचारत पोचलो. तिथे सामसूम होती. ऒफिस नाही. मग तिथे एका ठिकाणी एका बाईने एक जळमट व धूळीने माखलेली खोली दिली. तोपर्यंत चौकशी करण्यात माझे सर्व भोपाळ स्टेशन फिरुन झाले होते.

गडद अंधार, धुमकेतू आणि तारेच तारे

लेखक मार्गी यांनी बुधवार, 12/11/2025 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
✪ लेमन धुमकेतूचं दर्शन- अविस्मरणीय अनुभव ✪ आकाशगंगेचं पिठुर चांदणं आणि देवयानी आकाशगंगेचा झगमगाट ✪ सौर डाग बघताना सूर्यावरून जाताना दिसलेलं विमान! ✪ डोंगराआडून वर येणारे तारे ✪ जणू विमानाने केलेला कृत्रिम उपग्रहाचा पाठलाग ✪ निबीड अंधारात जणू सावली पाडू शकेल इतकं चमकणारं तेजस्वी ISS ✪ विशेष धुमकेतू आणि उल्का वर्षाव सत्राचं १४- १५ नोव्हेंबरला आयोजन तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे कोणत्याच दिव्याचा प्रकाश येत नाही. आणि हळु हळु रात्र होते आहे. सूर्य मावळून गेला आहे. संधीप्रकाश कमी होतोय. दूरवर दिसणारा तिकोना आणि इतर डोंगर हळु हळु फिकट होत आहेत. अगदी डोंगराच्या मधोमध असलेली ही जागा.

~ गंध धुंद ~

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 06/11/2025 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 04/11/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 31/10/2025 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच

लेखक मार्गी यांनी बुधवार, 08/10/2025 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार! ✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात ✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा! ✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश! ✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस ✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे ✪ सितारों की महफील में कर के इशारा ✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत ✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती ✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर नमस्कार.

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 30/09/2025 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात.

खपली

लेखक देवू यांनी शुक्रवार, 19/09/2025 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला. फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले. ताईच्या सासर्‍यांची तब्येत बरी नसल्याने, ती मागील दोन वर्ष माहेरी आली नव्हती.