राजकुमार (?) साठ वर्षांचा झाला!
लेखनविषय:
- Read more about राजकुमार (?) साठ वर्षांचा झाला!
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार.
आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते.