Skip to main content

लेख

एका मनीमाऊचा किस्सा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई एका गृहस्थाना घेऊन आले होते आणि माझी ओळख करून देताना म्हणाले, "हे गंगाधर अधिकारी,गेली वीस वर्ष हे कैदी म्हणून तुरंगात होते.साध्याश्या गुन्हाचं पुराव्याच्या आभावी,गाढव कायद्दाने आणि नियतीने त्यांच्यावर हा अत्याचार कला होता.सुटून आल्यावर ते स्वतः आता असिस्टंट जेलर म्हणून काम करीत आहेत.त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यानी मानसशास्त्रावर अभ्यास करून पीएचडी मिळवली आहे. आमच्या शेजार्‍यांचे ते नात्याचे आहेत.तुमच्या बरोबर ओळख करून देण्यासाठी मी मुद्दामच याना तळ्यावर घेऊन आलो." त्यांच्याकडे पाहून मला खरोखरंच कुतुहल वाटत होतं. पिळदार मिशी, घोगरा आवाज,मोठाले डोळे आणि चेहर्‍यावर किंचीतसं स्मित

"लळा जिव्हाळा शब्दच मोठे"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 09/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"रामभाऊ" असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला " रामा"म्हणायचे तर कुणी त्याला "रे,रामा "अशी साद घालायचे कुणी "रामा रे " असं पण म्हणायचे.सर्व साधारणपणे लोक त्याला "रामा" च म्हणायचे. तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना, त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि तिला म्हणाले, "हा माझा मुलगा तुझ्याकडे ठेव,शिक्षणात त्याचं लक्ष नाही,तुझ्या हाताखाली कामाला घे,आणि दोन घांस घाल.मला आता एव्हड्या मुलांना पोसायला जमत नाही." आणला त्यावेळा तो दहा वर्षाचा होता.आईने त्याला विचारलं, "तू शाळेत जाणार का?" पण तो,शाळेत जायला तयार नसल्याचं तिला दिसलं.

मारती तुकाराम भोईर -आद्यात्मिक गुरु

लेखक ब्रिटिश यांनी गुरुवार, 09/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मारती तुकाराम भोईर वय २७, रंग काला ,कडक हड्डी, बेरकी, गूनईशेश : पक्का बेवडा स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार माजा चुलतभाउ. अंगात रगत कमी दारु जास्त. आज्याचीच देन आनी म्हुन आज्याचा लारका. आज्यान ल्हानपनापासन बरोबर न्हेल्ता. आज्या टाईट झाल्याव उरलेली हा संपवाचा. पन पक्का हजरजबाबी.यकदा क बोलाय लागला क आयकाचा न्हाई. कूनालाबी आरवा करनार. यकदा सरपंचान त्याला समझवला व्हता "बाबा नूस्ता दारू पीवुन घरान परून रहातस जरा घरभायेर पड मंग समझल दुनया क हाय ती" तर हा म्हन्ला "सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला" तर असा हा मारत्या रोज दारु पीउन येनार न घरात तरास देनार.

डॉ. बंडूमामा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 04/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सत्येंद्र आजगांवकर म्हणजेच डॉक्टर बंडूमामा.माझ्या आईचा चुलत भाऊ.आईला सख्खे भाऊ नव्हते.बंडूमामा उंच,गहूवर्णी आणि लाघवी स्वभावाचा.मधूनच एक नाकाची पुडी दाबून दुसऱ्या नाकपुडीतून "सॉक,सॉक "असा आवाज काढायची संवय त्याला जडली होती. बंडूमामाची हजेरी त्यावरून ओळखावी.बंडूमामाची घरची गर्भश्रीमंती आणि घरच्या शैक्षणीक वातावरणाचा वारसा,यामुळे बंडूमामाला वैद्दकीय शिक्षण घेणं फारसं कठीण झालं नाही.शिक्षण पूरं झाल्यावर जे.जे.

"जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 03/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे ख

दिवस आजचा

लेखक शुभदा यांनी शुक्रवार, 03/10/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अंथरुणात असताना हलकेच सूर्याची तीरीप डोळ्यावर आली, मन आणि शरीर दोघांना खूप छान वाटले. जसे रात्री झोपताना चंद्राचा शीतल प्रकाश आणि वार्‍याची हलकी झुळुक छान झोप देऊन जाते तसेच अशी प्रसन्न सकाळ चांगल्या दिवसाची भेट देऊन जाते. श्रावणातला उन, पावसाचा खेळ चालू होता. मी उठणार तेवढ्यात आवाज कुठून आवाज आला. चक्क सूर्य देव माझ्याशी बोलत होते. "थांब माझीच दमछाक झाली आहे. रोज सगळ्याना वेगवेगळ्या रूपात भेटताना. पण, मला रोज तेजोमय तळपण्यासाठी कुठून ताकद आणतो मी. माझ्या अस्तित्वासाठी रोजचा रोज तळपतो मी" .

"काय करूं मी बोला,घरी बाळ ना पुन्हां"ललिताचं जीवशास्त्र

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 30/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"ते इवलंस मृत- शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते.मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?" गडकऱ्याना तिन मुली.त्यांची धाकटी मुलगी त्यामानाने हुषार होती.तिला पहिल्यापासून वैद्दकीय शास्त्राची आवड,आणि तिच्या मनासारखे परिक्षेत मार्कस मिळून ती कॉलेज मधून पहिली आली होती.गडकरी तिच्या बद्दल नेहमीच मोठ्या विश्वासाने बोलत असायचे.