Skip to main content

लेख

गुरू शिवाय विद्दा कसली?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 16/11/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नृत्यकलेत योग्यते शारिरीक हावभाव करावे लागतात.त्या नृत्यातून नृत्यकरणार्‍याचं अविर्भावातलं सत्य विशद व्हावं लागतं.आणि त्याचं व्यक्तित्व प्रदर्शीत व्हावं लागतं.हे मी रोहिणीकडून ऐकलं. यशोधरा साखरदांडे आणि हिची मुलगी रोहिणी,जी आता रोहिणी गायतोंडे म्हणून ओळखली जाते ती नृत्यकलेत निपूण असून अलिकडे रंगमंचावर अभिनय करते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी अंधेरीतल्या एका नृत्यशाळेत तिचा अभिनय पहाण्यासाठी एका मित्रा बरोबर गेलो होतो.रोहणी त्यावेळी आपल्या विद्दार्थिनीबरोबर रियाज करण्यात दंग झाली होती. मी तिच्या आईवडीलांना चांगलाच ओळखतो. तिचे वडील माझ्या बरोबर टाटा इन्सस्टिट्युटमधे माझे सहकारी होते.

राजकुमार (?) साठ वर्षांचा झाला!

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 15/11/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार. आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते.

प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र असते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 14/11/2008 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई खूप दिवसानी आपल्या नवीन मित्राबरोबर तळ्यावर आले होते.माझी ओळख करून दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा करायला सुरवात केली.त्यांचा हा माझा नव्याने ओळख झालेला मित्र आपली नोकरीत असतानाचे काही अनुभव सांगण्याच्या ओघात एका मजेदार किस्याला त्यानी हात घातला.ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे सि.इ.ओ होते ते ओघाओघाने मला कळलं. ते म्हणाले, "कामानिमीत्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना बरेच वेळा त्या कंपनीची गाडी येऊन मला त्यांच्या मिटींगच्या जागी घेऊन जायची.पण कधी कधी मला एअरपोर्टवरचीच टॅक्सी करून जावं लागायचं.असंच एकदा बंगलोर एअरपोर्टवर टॅक्सीत बसल्यावर ड्राईव्हर बरोबर हलो-ह

घडता घडता घडेल ते घडेल

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 13/11/2008 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र अरूण ढवळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधे डिप्लोमा घेऊन झाल्यावर एका नावाजलेल्या वर्तमानपत्रात कार्टूनीस्ट म्हणून काम करायचा. धोबीतलावला त्याचा एक स्टुडियो पण आहे. आणि बरं चाललं आहे.मी मेट्रोसिनेमा जवळ बसची वाट बघत उभा असताना आमची नजरा नजर झाली.

"किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 12/11/2008 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा मिळाला.

दयाशील आणि परोपकारी हृदय

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 10/11/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
नंदा प्रधान मॉन्ट्रीयला गेल्यापासून बरीच वर्ष परत आलीच नव्हती.तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती हे मला नक्कीच माहित होतं.तिची मुलं लहान होती त्यावेळेला ती दोन एक महिने इकडे राहिली होती.तिचा मोठा मुलगा दिलीप का नाही आला असं मी विचारल्यावर तिचा चेहरा कावराबावरा झालेला पाहून मलाही थोडं धक्कादायी वाटलं. नंदाने सुरवात अशी केली की काहितरी अघटीत झालं असावं ह्याची मला खात्री झाली. ती मला म्हणाली, माझ्या मुलामुळे माझा दृढविश्वास वाढला.

माझा फिरून- डोकं- वर काढणार्‍यांवर विश्वास होता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 09/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावात आमच्या घराच्या समोर एक वाडा होता.त्याला अम्ही चांभारवाडा म्हणायचो.प्राथमीक शाळेत शिकण्याची त्यावेळी पण सक्ति असल्याने ह्या वाड्यातली बरीच मुलं आम्ही ज्या शाळेत जात असू त्या शाळेत शिकायला यायची.मी जवळ जवळ सातवी पर्यंत ह्या शाळेत शिकलो.आणि नंतर मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी आलो.माझ्या शाळेत त्यावेळेला ह्या चांभारवाड्यातल्या मुलां पैकी पांडूरंग मोची नावाचा मुलगा होता.तो खेळायला हुषार असल्याने शाळेत तसा प्रसिद्ध होता.त्याची माझी शाळेतली ही ओळख त्यादिवशी खूप वर्षानी परत उजळणीला आली. मी चर्चगेट स्टेशनवर पाचपस्तिसच्या विरार डबलफास्ट गाडीची वाट पहात उभा होतो.

कार्यरत राहिल्याने हिम्मत येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 08/11/2008 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं. "तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?" ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली, "माझा भाऊ एका अपघातात गेला.माझ्या आईला त्या घटनेचा एव्हडा धक्का बसला होता की तिचं सान्तवन करणं महाकठीण होतं.मी त्यावेळी फक्त चार वर्षाची होती.त्यामुळे माझ्या आईचा सुरक्षतेकडे बघण्याचा कल किती बदला ते माझ्या लक्षात आलं.