धावते विचार :)
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------
पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस.
.
.
एशियाडच्या साडे तीनशे ऐवजी जवळपास दुप्पट... म्हंजे सातशे रुपये भाडं शिवनेरीचं.
मिसळपाव