वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान
१९७५ च्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपपासून २०१५ मधल्या वर्ल्डकपपर्यंत प्रत्येक वर्ल्डकपमध्ये अनेक थरारक आणि रोमांचक मॅचेस झाल्या. अशाच काही निवडक मॅचेसविषयी...
*************************************************************************************
११ जून १९७५
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
वॉरीकशायरमधल्या एजबॅस्टन मैदानात वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यात ग्रूप बी मधली मॅच होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पदरी पराभव पडल्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं पाकिस्तानसाठी अत्यावश्यक होतं. परंतु मॅचच्या दिवशी सकाळीच पाकिस्तानचा कॅप्टन आसिफ इक्बाल दुखापतीमुळे मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला.
मिसळपाव