न्यूरेम्बर्ग
दुस-या महायुद्धाच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे युद्धगुन्हेगार या संकल्पनेचा उदय. आज जे युद्धगुन्हेगारीमध्ये मोडतात तसे गुन्हे दुस-या महायुद्धाआधी झाले नाहीत असं नाही. पण दुस-या महायुद्धाने ही संकल्पना स्पष्ट केली. एकतर या युद्धात लष्करी आणि नागरी (Military and Civilian) ही सीमारेषाच पुसून टाकली गेली होती. १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दोन किंवा अधिक देशांमधलं युद्ध हे लष्करापुरतं मर्यादित असे. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसा युद्धाचा आवाका वाढत गेला.
मिसळपाव